Please download here !!
प्रकाशन: सिध्दिी टार्इम्स 2008
नाते
परवा सहजच एक जुने विनोदी मासिक हाती आले| त्यातील विविध विनोदी गोष्टी व चुटकुले वाचत होतो| वेL जात होता| मनाची करमणूक होत होती| वाचता वाचता एक विनोदी चुटकुला वाचण्यात आला| तो असा|
“ एक खवचट तरूण आपल्या पत्नीसह जात असतांना समोरून पाच पंचवीस म्हशींचा तांडा दॄष्टीस पडला| त्यंाच्याकडे पाहत तो पत्नीला म्हणाला‚ ‘ती बघ तुझी नातेवार्इक मंडLी|’ पत्नीे सत्वर आपली प्रतिक्रीया व्यक्त करित उत्तरली| ‘अय्या खरंच Ñ एवढया नातेवार्इकांना एकदम भेटण्याचा आज छान योग आला|’ त्यावर पतिमहाशय म्हणाले‚ ‘म्हणजे त्या सर्व तुझ्या नात्यातल्या असल्याचे तु कबुल करतेस तर Ñ ’ हजर जबाबी पत्नी म्हणाली‚ ‘होय‚ केलच पाहिजे| कारण, सासरच्या सर्व नातेवार्इकांना मी आता चांगलीच ओLखू लागली आहे|”
असो‚ यात विनोदाचा भाग सोडला तर विषय गहन आहे| गंभीरपणे विचार करण्या जोगा आहे| नाते कोणतेही असो पती–पत्नी‚ भाउ–बहिण‚ पिता–पुत्र‚ दोन भाउ‚ दोन मित्र किंवा मैत्रिणी इत्यादी| एकमेकाचे मनात एकमेकाबद्दल आदर‚ प्रेम‚ माया असणे फार जरूरीचे आहे| या वरच नाती गोती टिकून असतात| जो पर्यंत आपल्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम‚ आपुलकी निर्माण होत नाही, तोपर्यंत ती नाती कीतीही जवLची असली तरी मनाने जोडली जात नाही| नाते दुरावण्यास अनेक छोटी मोठी कारणे कारणीभूत ठरतात| कधीतरी छोटया कारणाने पण आपसी कलह निर्माण होतात, त्यांचे रूपांतर मन मुटाव व नाते दुरावण्यावर होते| नाते हे ऋणानुबंधांनी जुLलेले असते| ते सहजासहजी तोड म्हणता तुटत नाहीत, सोड म्हणता सुटत नाहीत| काही झाले तरी ओLख करून देतांंना अमक्याचा तमका किंवा तमक्याचा अमका असे नाते सांगतच ओLख करून दिली जाते|
पती पत्नीच्या नात्याबद्दल सांगायचे झाल्यास, हे नाते फार नाजुक असते| एकमेकांवर प्रेम व पूर्ण विश्वास असणे फार गरजेचे आहे| या व्यतिरिक्त उभयतांचे नातेवार्इकाबद्दल प्रेम‚ आदर‚ माया त्याचा पाया आहे| यावरच पती पत्नीचे नाते टिकून असते व संसार सुखाचा होतो| कटू बोलाने वाद निर्माण होतात| त्याचे पडसाद सुखी संसारामध्ये उमटतात| वाद वाढले तर नाते दुरावून संसार मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही| प्रसंगी कटू बोल टाLणे व सामंजस्याने वागणे हा नाते टिकविण्याचा गुरूमंत्र ठरू शकेन|
रक्ताचे नाते व मानलेले नाते अशी दोन प्रकारची नाती असू शकतात| रक्ताची नाती अ्रर्थात पिता–पुत्र‚ माता–पुत्र‚ दोन सख्खे भाउ किंवा दोन सख्ख्या बहिणी इत्यादी| आजकालच्या विभक्त कुटुंब पध्दती मुLे रक्ताची नाती एकत्र सापडणे जरा कठीणच आहे| जो तो आपापला व्यवसाय धंद्याच्या निमित्ताने वेग वेगLया शहरात अथवा वेगLा घरोबा करून राहतो| कठीण समयी अथवा अडी अडचणीस सर्व नातेवार्इक मंडLी एकत्र येण्यास थोडा कालावधि लागतो| तोपर्यंत शेजारचे मानलेले काका–काकू‚ मामा–मामी‚ भाउ–वहिनीच नातेवार्इक बनून मदतीस धावून येतात| ही मानलेली नाती सदैव आपल्या समवेत असतात| केवL त्यांना आपल्याकडून मिLालेले प्रेम व आदर यामुLेच ते मदतीस धावून येतात| त्यांची मदत हे एक प्रेमाचे द्योतकच नाही काÆ
नाती रक्ताची‚ प्रेमाची अथवा मानलेली कोणतीही असोत, मनाशी जुLलेले असावे, अन्यथा सारा गाव मामाचा पण एक नाही कामाचा| प्रेम दिल्याने प्रेम मिLते| प्रोम द्यावे तैशे घ्यावे| प्रोमाचा हा दीप घरोघरी कायम जLत रहावा|