Menu

पुनरारंभ

199248

सुख

Please Download here !!

पकाशन : कुंभश्री दिवाळी  अंक 2011  |  अक्षर सिद्धी दिवाळी अंक २०१४ 

                                                                          

        सुख

                 सुख ही अशी गोष्ट नाही की, बाजारातून विकत आणता येते अथवा कोणाकडून उधार उसनवार घेता येते| कोणी कीतीही म्हटले की, मी सुखात आहे, ते त्याच्या चेह–यावरून व वर्तणुकीवरून दिसून येते तो किती सुखात आहे व त्याच्या बोलण्यात किती सत्यता आहे| सुख मानले तर सुख आहे अन्यथा दु:खच दु:ख आहे| जिवनात सुख कमि तर दु:ख जास्त आहे| दु:खाचा डोंगरच पुढे उभा आहे त्यात सुख शोधून सुख मानण्यातच खरे सुख आहे| म्हणतात ना “सुख पाहता जवा पाडे, दु:ख पर्वता एवढे|”

                 सुखाची व्याख्या करायची झाल्यास सुख म्हणजे एखादी वाचिक अथवा अभिनयात्मक कॄति जी आपणास मनस्वी निखL आनंद देते| वाचिक अर्थात शब्दात केलेली क्रीया जसे विनोद सांगणे वगैरे वगैरे तर अभिनयात्मक म्हणजे विविध व्ेाशभूषा करून हावभाव केलेली क्रीया| जसे नकला करणे वगैरे वगैरे| सुखाचे प्रकार म्हणाल तर अनेक प्रकार आढLतील जसे ऐहिक सुख, भौतिक सुख, सामाजिक सुख, पारिवारिक अथवा कौटुंबिक सुख, शारिरिक सुख इ|इ|अशी सर्व सुखे एकाच वेLी भोगणारा फार क्वचितच आढLेल| कदाचित यास अनुसरूनच सुखी माणसाच्या सद–याची गोष्ट सांगितली जात असावी| असा सर्व सुखी मानवप्राणी या भुतलावर आढLणे दुरापास्तच| सबब गोष्ट ही गोष्टच राहते| समर्थ आपल्या मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात “ जगी सर्व सुखी असा कोण आहे| विचारी मना तुचि शोधून पाहे|” ते उगाच नव्हे|                                                                        

            सुखी  आयुष्याची पाच सुत्रे संागीतली गेली आहे| ती अशी

1|           उत्तम प्रकॄति

2|           पुरेशी संपत्ती

3|           मर्यादित संतति

4|           संतांची संगती

5|           र्इश्वराची भक्ती

 

        शरीराला कोणतीही व्याधी अथवा कष्ट नसल्यास व शरीर निरोगी असल्यास सुखाची अपेक्षा करायची नसते सुख आपोआप लाभते| कारण शरीर सुखावले की मन प्रसन्न होते व सुखपण आपोआपच प्राप्त होते| शरीर दु:खी असल्यास संपूर्ण लक्ष त्या दु:खाकडे जाते व सुख लोप पावते| नुसतेच शरीरा किंवा मन सुखावुन सुख मिLते असे नाही तर त्याच्या जोडीला पुरेशी संपत्ती असल्यास सुखास जोड मिLते| संपत्तीने देशभ्रमण करून आनंद मिLवू शकता दान धर्म करून आनंद मिLवता येतो| मन आनंदले म्हणजे सुखाची वाट अजून मोकLी होते| उत्तम प्रकॄति आहे पुरेशी संपत्ती आहे म्हणून काय झाले जर संतति अधिक असल्यास संपत्ती त्यांच्या पालन पोषणामध्ये खर्ची पडते मग कुठले आले देश भ्रमण व दान धर्म| संपत्ती बरोबर आपला वेL देखिल त्यांच्या देखभालीमध्ये खर्ची पडतो| पण हेच जर मर्यादित संतति असल्यास त्यांचे  योग्य पालन पोषण करून उरलेला वेL मुलाबाLांसहा देशभ्रमण करून सांसरीक व प्राकॄतिक सुख उपभोगता येते| म्हणतात “सत्संगति सदा घडो सॄजन वाक्ये कानी पडो” संसारात संसार सुखाला जेवढी किंमत आहे तेवढीच अध्यात्माला देखिल आहे व संसारात राहून संसार सुखा बरोबर अध्यात्म सुख हवे असल्या संतांची संगत आवश्यकच आहे|संत  हितोपदेश करतात सुखाचे प्राप्तीचा सरL सोपा मार्ग म्हणजे इश्वर भक्ती तो आपल्या किर्तन प्रवचनातून सांगतात| आपल्या दैनंदिन जिवनात थोडासा वेL काढून परमेश्वराचे नामस्मरण केल्यास या जिवन मरणाच्या फे–यातून सूटका होउन मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकLा होते ज्याला परमानंद अथवा परमसुख म्हणता येर्इल|  

 

              संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात

 

              “ सुखी संतोषा न यावे ¦ दु:खी विषादा न भजावे ¦

                आणि लाभालाभ न धरावे ¦  मनामाजी ¦”              ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा श्लेाक 26

 

अर्थात सुख प्राप्त झाले तर संतोष मानू नये( सुखाने हुरLून जाउ नये )व दु:ख प्राप्त झाले तर त्याबद्दल खेद मनू नये| लाभ हानीचा विचार मनात आणू नये|

 

सुख व दु:ख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत|सुख आले म्हणजे त्यापाठोपाठ दु:ख देखिल येते हे गॄहित धरूनच चालावे| या बाबतीत अशी छोटीशी कथा सांगितली जाते|ती अशी|

 

नियती ही आर्इ आहे| सुख व दु:ख ही तिची दोन जुLी मुले आहेत| ती लहान असतांना त्यांचे सर्व सवंगडी फक्त सुखाशीच खेLत असत| दु:खाशी कोणी खेLण्यास तयार नसे| याचे दु:खाला फार वार्इट वाटत होते| एक दिवस दु:ख रडत रडत घरी आर्इ जवL आले व म्हणाले, “आर्इ सर्वजण सुखाशीच खेLतात माझ्याशी कोणी खेLतच नाही|” आर्इला पण वार्इट वाटले| तिने एक युक्ती केली| सुखाचे कपडे दु:खाला घातले व दु:खाचे कपडे सुखाला घालून दोघांना खेLायला पाठविले तर सर्वजण दु:खाला सुख समजून त्याचेशी खेLू लागले| सुखाशी कोणी खेLण्यास तयार होर्इना| मग सुख रडत आर्इजवL आले व म्हणाले, “सर्व दु:खाला सुख समजून दु:खाशी खेLतात माझ्याशी कोणीच नाही”| आर्इची ही मात्रा लागू पडली व रोज सुख दु:खाला खेLावयाला पाठवतांना कधी सुखाचे कपडे दु:खाला तर दु:खाचे कपडे सुखाला असे करून पाठवित असे| यामुLे सर्व सवंगडी आता सुख दु:खाशी दोघांशी खेLू लागले| 

 

          हल्लीच्या जगात खरा सुखी तोच, जो दर आषाढी एकादशीला न चुकता पंढरपूरच्या पंढरीला भेटावयास पायी वारीने जाणारा वारकरीच म्हणावा| वारी करतांना तो आपले सर्व देहभान, प्रपंच, समाज सर्व काही विसरून वि{लमय होतो,| त्यास फक्त एकच आस असते, तीे पंढरीच्या पांडूरंगाच्या दर्शनाची| त्यातच त्याचे सर्व सुख सामावलेले असते| त्यासाठी तो देहभान हरवतो त्याला उनÊ पाउसÊ वारा याची तमा नसते| जस जशी पंढरी जवL येते तसतसे त्याचे मन भक्तीरसाने ओत प्रोत भरून वाहू लागते| एकदा का लाडक्या विठूरायाचे दर्शन झाले की, तो आन्ंादे नाचू लागतो| वि{लमय होउन सारे जिवनाचे सुख अनुभवतो व सहजच मुखातुन अभंगाच्या पंक्ती येतात “ मुख पाहता लोचनी सुख झाले हो साजणी”|

 

                 शेवटी वारकरी हा पण मानवी देहच आहे| प्रपंचात अडकलेला प्रापंची| वारी संपली की तो परत आपल्या प्रपंचात पडतो व सुख दु:खाच्या भोव–यात अडकतो| सर्वांच्या सुखासाठी आपण परमेश्वराकडे फक्त एकच मागणे मागू या²   “ सर्वेत्र सुखी न:सन्तु सवे सन्तु निरामया ¦ सर्वे भद्राणी पश्य्ंातु मा क:श्चित दु:ख माप्नुयात ¦¦”

                                                                                                                        

Go Back

Comment