Menu

पुनरारंभ

199275

मीच माझा झालो चोर

Please download here !!

प्राकाशन : प्रसाद  दिवाळी अंक 2008|

  मीच माझा झालो चोर       

                        सन 1982 मधील प्रसंग| मी तत्कालीन विदेश संचार सेवा व हल्लीचे टाटा समुहाने अंगिकारलेले विदेश संचार निगम लिमिटेडच्या सेवेम्,ाध्ये होतो| माझी नियुक्ती उत्तर प्रदेशातील देहरादून शाखेत रोखपाल पदावर झाली होती| आमचे कार्यालय (अहमद उपग्रह भुमि केंद्र) देहरादून शहरापासून साधारण 25 कि|मी|अंतरावर हरिद्वार रोड पासून आत लच्छिवाला जंगलात होते| कार्यालयाचा सर्व आर्थिक व्यवहार नवी दिल्ली स्थित सी|पी|ए|ओ|येथून होत असे| तिकडून आलेले धनादेश आम्ही देहरादून शहरातील स्टेट बँक आ^फ इंडियाच्या मुख्य शाखेत वटवून रोख रक्कम लच्छिवाला येथे कामगारांमध्ये वाटप करित असत|  स्टेट बँक आ^फ इंडियाची मुख्य शाखा देहरादूनचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात होती| 

                 मी नेहमी प्रमाणे महिना अखेरीच्या दिवशी कामगारांचे मासिक वेतन व ओव्हरटाइम पेमेंट मिLून मोठया रकमेचा चेक वटविण्यासाठी कार्यालयाचे गाडीने मदतनीस व दोन सशस्त्र पोलिसांसह बँकेमध्ये सकाLी अकराचे सुमारास गेलो| त्या दिवशी स्वतंत्र उत्तरांचल मागणी साठी स्थानिक लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठया प्रमाणात मोर्चा ने}न आंदोलन छेडले होते| नेहमीचे सवयीप्रमाणे मी एकनेहमीची साधारण आकाराची सूटकेस व एक लेदरची हँड ब^ग क^श आणणे साठी बरोबर घेतली| परंतु दुर्दैवाने नेमके त्याच दिवशी मला बँकेकडून माझे मागणी प्रमाणे मोठया रकमेच्या 100‚50 व 20 रूपयांच्या नोटा मिLाल्या नाहीत तर सुमारे दोन अडीच लाखाचे पेमेंट 5‚ 10 व 20 चे रकमेच्या नोटांनी मिLाले| महिना अखेर असल्याने वेतन वाटप करणे आवश्यक होते| चेकवर पेमेंट मिLाल्याची सही केल्यामुLे मला मिLेल तशी रकम स्विकारणे क्रमप्र्राप्त होते| मिLालेली रकम ब^गेमध्ये बसत नव्हती, म्हणून नार्इलाजास्तव पुष्कLसे 5 व 10 रू|चे बंडल मी इनशर्ट करून पोटाभोवती ठेवले| या माझ्या बँकेतील व्यवहारा दरम्यान बाहेर आंदोलनाने उग्र रूप धारण केले| चौकात दुकाने फोडली जात असल्याची बातमी आली| सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे हेतूने केवL सरकारी वाहनांवर हल्ला केला जाण्याची शक्यता होती|

 सुरक्षिततेच्या दॄॄष्टीने जिल्हाधिका–यांचे वाहन वगLता अन्य कोणत्याही वाहनास जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात बंदी असलेमुLे आमचे वाहन देखिल बँके पासून सुमारे अर्धा कि|मी|अंतरावर उभे करण्यात आले होते| माझे हातात ब^ग व पोटाभोवती 5 व 10 रू|ची अनेक बंडले असल्याचे फक्त मलाÊ सहायकास व सोबतच्या पोलीसास माहित होते|

 

बाहेर चालू असलेल्या गोंधLापासून स्वसंरक्षणार्थ शक्कल लढवित एकाद्या मोठया गुन्हेगारास ज्याप्रमाणे बंदुकीच्या धाकाखाली घेउन जातात त्या प्रमाणे माझे पाठीला बंदुकीचे टोक लावून पोलीसास माझ्या पाठीमागे चालण्यास सांगितले व पोलिसही परिस्थिती लक्षात घेउन त्या गोष्टीस तयार झाले| त्यावेLी स्वत: चोरÀगुन्हेगार बनण्या पलिकडे मजजवL कोणताही पर्याय नव्हता| गाडीत बसताच क्षणाचा विलंब न करता व मागे न पाहता वेगाने लच्छिवालाकडे प्रयाण केले व सुटकेचा श्वास सोडला|

 

                तेथे गेल्यावर पोटाभोवती ठेवलेले नोटांचे पुडके पाहून माझे अधिकारी अचंभित झाले बेजबाबदार वर्तणुकी बद्दल मजवर भडकले परंतु खरी परिस्थिती कथन केल्यावर राग शांत झाला व कौतुकास्पद उदगार निघाले|   

               

          ऐकून थोडेसे नवल वाटले ना² पण खरंय ते| कारण त्यावे वेLेची परिस्थिती व मजवर आलेला प्रसंगच तसा फार मोठा होता| दुर्दैवाने काही घडले असते तर माझे फार मोठे नुकसार झाले असते|

 

Go Back

Comment