Menu

पुनरारंभ

199235

गप्पात रंगले ‘विदेश संचार’ चे मित्र

Please download here !!

प्रकाशन: महाराष्ट्र टाइम्स ३१ मार्च २०१५

गप्पात रंगले  ‘विदेश संचार’  चे मित्र    

             साधारण जानेवारी उजाडला की आम्हा विदेश संचार सेवा/विदेश संचार निगम लिमिटेड च्या सेवा निवॄत्त कर्मचा–यांचे मोबार्इल वाजू लागतात.  सर्वांचा एक मेकास एकच प्रश्न असतो, स्नेह मेळावा कधी व कोठे आहे ? आमचेसाठी स्नेह मेळावा एक पर्वणीच असते. वर्षातून एकदा सर्वांनी एकत्र भेटायचे. गप्पा गोष्टी करायच्या, आपली सुख दु:खे आपसात वाटून घ्यायची. जुन्या गोष्टींना, आठवणींना पुन्हा नव्याने उजाळा द्यायचा व पुन्हा भुतकाळात रमायचे. दिवस आनंदात घालवायचा हा स्नेहमेळाव्याच मुख्य उद्देश.          असा हा स्नेहमेळावा नुकताच हिंजवडी येथे डी.व्ही.सुबय्या यांच्या नियोजनात झाला.  विशेष म्हणजे  सुब्बय्या यांनी कोणाकडून एक पैशाची मदत न घेता स्नेह मेळाव्याचा सर्व अर्थिक भार उचलला. कार्यक्रमाचे आयोजन विदेश संचारचे माजी सेवानिवॄत्त कर्मचारी एस.व्ही. उदास, अशोक कानिटकर, निजाम तांबोळी, एस.एस.वेदपाठक तसेच अंकूश बागल या उत्साही मंडळींनी केले. कार्यक्रमास फार छान प्रतिसाद मिळाला. सर्व सेवानिवॄत्त अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. पी.जी.सरपोतदार, व पी. एम. नारखेडे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. वर्षभरात दिवंगत झालेल्या कर्मचा–यांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमास सुरवात झाली. आर.एम.कुंभार, ए.व्ही. जॉर्ज, अशोक बनसोडे हे विदेश संचारचे माजी अधिकारीही उपस्थित होते.

          अधिका–यांनी आपल्या भाषणातून भूतकाळातील आठवणीना उजाळा देत, त्यांना त्यांच्या कार्यकाळात सर्वांकडून कसे सहकार्य मिळाले व कार्यकाळ गोड कसा झाला हे थोडक्यात, मुद्देसुदपणे सांगितले.  उपस्थितांनी पण आपली मनोगते प्रकट केली.  या स्नेहमेळाव्यात भेटीगाठी व गप्पांव्यतिरिक्त इतर विषयावर पण चर्चा झाली. निजाम तांबोळी यांनी सूत्र संचालन केले. एस. जी. सिन्नरकर यांनी आभार प्रदर्शन केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.                                                                                                                 

           या स्नेहमेळाव्याची एक वाखणण्या जोगी गोष्ट म्हणजे येथे उतारवयातील व्याधी, दु:ख, वेदना विसरून नुकतीच हॄदय शस्त्रक्रीया झालेले कर्मचारी पण ५ मजले जिना चढून कार्यक्रमास उपस्थित होते. सकाळी घरच्या चिंतांनी त्रासून आलेली सर्व मंडळी संध्याकाळी कळी खुलावी किंवा शक्तीवर्धक डोस मिळाल्यावर चेहरा उजळावा तसा प्रसन्न, हसरा चेहरा घेउन परत पुढच्या स्नेहमेळाव्याला भेटण्याची उमेद ठेवत घरी परतले.    

 

         

   

 

                                                                                          

Go Back

Comment