Menu

पुनरारंभ

199249

२१व्या शतकातील स्त्रीचे स्थान

Please download here !!      

प्रकाशन : साहित्य सॄष्टी दिवाळी अंक 2012. 

                                             २१व्या शतकातील स्त्रीचे स्थान

      पूर्वा पार पाहता पूर्वी पासूनच भारतीय संस्कॄतिमध्ये स्त्रीला मानाचे स्थान आहे. परंतु तत्कालीन समाज रचने प्रमाणे काही मान मर्यादे पर्यंत सिमीत होते, तत्कालीन स्त्रीला घरात देखिल मान असे. घरातील सदस्यांकडून तिला मानाने अहो जाहो करून मानाने बोलाविले जात असे. एकत्र कुटुंब पध्दती असल्यामुळे तिच्याकडून घरातील लहानां पासून थोरामोठा पर्यंत सर्वांचा यथा योग्य मान ठेवला जात असे. ती घरची गॄहलक्ष्मीच समजली जात असे. सीमीत मान मर्यादांमुळे ती आपल्या घरात डांबून ठेवली गेली होती. आपला संसार चूल आणि मूल यातच ती गुरफटेली गेली होती. किंबहुना तत्कालीन समाजाने तिच्यावर बंधने लादून तिला घरात बंदिस्त केले होते. सकाळी लवकर उठून दळण कांडण करणे, सडा सारवण करणे, स्वयंपाक करणे, मुले सांभाळणे, घराण्यातील रूढी परंपरा याचे जतन करणे, हेच तिचे जग होते. कदाचित एवढे सगळे करता सवरता तिला बाहेरचे जग बघण्यास वेळच मिळत नसावा. लग्न सोहळा, श्रावण महिन्यातील नागपंचमी, गौरी गणपती सारखे सण, मंगळा गौर व चैत्रातले हळदी कुंकु असे प्रसंग म्हणजे स्त्रियांसाठी त्याकाळी एक पर्वणी असायची. केवळ या कारणास्तवच त्यांना बाहेर पडणे शक्य असे. अशा कार्यक्रमातच एकमेकीची गाठ भेठ होत असे तेवढीच अन्यथा पुर्वीच्या स्त्रिया एकमेकींना फारशा भेटत पण नसत. सहाजिकच बाहेरच्या जगात काय चालले आहे याची फारशी कल्पना नसे.  येथे एक नमुद करावेसे वाटते रोजच्या दैनंदिन विविध प्रकारच्या कामामुळे शरीराला पूरेसा व्यायाम मिळून त्याचे आरोग्य चांगले राहत असे. शरीर स्वास्थ्यासाठी तिला काही वेगळे करण्याची गरज भासत नसे. आज 21व्या शतकात देखिल समाजात स्त्रीचे स्थान खचितच तेवढेच मोठे आहे व मोठेच राहील.

         पण काळ बदलला सावित्रीबार्इ फुले, रमाबार्इ रानडे, आनंदीबार्इ गोपाळ या सारख्या महिला समाज सुधारकांनी पुढारकार घेउन स्त्रीला तिच्या चूल आणि मूल या जगातून बाहेर काढले. शिक्षण देउन तिच्या हक्कांची जाणीव करून दिली. तिच्यात परिवर्तन घडवून आणले. त्यांनी केलेल्या महिला शिक्षण चळवळीचा स्त्रियांना फायदा झाला व महिला कर्तुत्ववान व कर्तबगार झाल्या.

    अलीकडच्या काळातील उदाहरणे द्यायची झाल्यास माजी दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, राष्ट्रपती पदापर्यंत पोचलेल्या प्रतिभा तार्इ पाटील सारख्या महिलांनी देशाचे नेतॄत्व करून देश चालविला. विज्ञान जगतात प्रगति करित कल्पना चावला या महिलेने अंतराळात उंच भरारी घेतली. किरण बेदी, सरोजिनी नायडू, मेघा पाटकर, मॄणाल गोरे, पी.टी.उषा, सानिया मिर्झा सारख्या अनेक महिलांनी वेगवेगळया क्षेत्रात आपली कामगिरी दाखवून जागतिक व राष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव कमविले. देशाची प्रतिमा उंचावली.         

      हल्ली देखिल अनेक स्त्रिया उच्च शिक्षण प्राप्त करून डॉक्टर, वकिलीचा व्यवसाय करित आहेत तसेच इंजिनियरींग व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. एवढेच नव्हे तर पदवी प्राप्त केलेल्या साधारण महिला पण विविध बँका व कार्यालयामध्ये सेवा करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावित आहेत. शिक्षिकेचा पेशा धारण करून शाळा, महाविद्यालयांमध्ये ज्ञानार्जनाचे महान कार्य करित आहेत. अशिक्षित महिला पण काही मागे नाहीत. त्या बांधकाम क्षेत्रासारख्या ठिक ठिकाणी पुरूषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून अंग मेहनतीची कामे करित आहेत. सर्वात महत्वाचे हे सर्व करतांना ते कुटुंबाची पण तेवढीच काळजी घेत आहेत. अशा सर्व कर्तबगार कर्तुत्ववान स्त्रियांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

      ही झाली नाण्याची एक बाजू| आता दूसरी बाजू पाहवयाची झाल्यास.

असे म्हटलं जाते, चार पुरूष एकत्र राहू शकतात परंतु दोन स्त्रीया एकत्र राहू शकत नाही कारण स्त्री हीच स्त्रीची दुश्मन समजली जाते. सासू–सून. नणंद–भावजय, जावा–जावा ही नाती नेहमीच वादग्रस्त समजली जातात. अपवाद सोडल्यास अजूनही काही ठीकाणी यांच्यातील वाद दिसून येतात. पूर्वापार चालत असलेले हे वाद कमि की काय म्हणून टीव्ही वरील अनेक कौटुंबिक मालिका यास पूरक ठरत आहेत व या वादांना संपविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्याला खत पाणी घालून वाढविण्याचा घाट घातला जात असल्याचे दिसते. हल्ली टीव्ही वरील कोणतीही कौटुंबिक मालिका बघीतली असता त्यात एका स्त्री कडून दूस–या स्त्रीचा होणारा छळ, मत्सर, क्रोध, हेवादावा याशिवाय काही पाहावयास मिळतच नाही आणि हे दाखविल्या शिवाय मालिका पूर्णच होत नाही. अशी कथानके जणू मालिकाचे अविभाज्य अंगच झाले आहे आणि कहर म्हणजे स्त्री दर्शकच मोठया प्रमाणात अशा मालिका मोठया आन्ंदाने त्यात विशेष रस घेत पाहत असतात. काही कारणास्तव एखादा भाग पाहण्याचा चुकल्यास त्यांना हळहळ वाटते.  अशा मालिकंमुळे समाज किती बिघडत चालला आहे? किती संसार मोडता आहेत?  वर्तमान पत्रात या बाबत किती आरडा ओरडा चालू आहे? कोण काय म्हणते ? याचे मालिकांचे लेखक, दिग्दर्शक व  कलाकार यांना काहीच सोयरे सूतक नाही. त्यांना केवळ आपला टी.आर.पी. वाढविण्याशी मतलब. ‘कुणी निंदा, कुणी वंदा, आमचा आपला एकच धंदा’ या अविर्भावात मालिका अखंड व अव्याहत चालू असतात. हे कमि की काय टीव्ही वरील जाहिराती पाहिल्यास प्रत्येक जाहिराती मध्ये स्त्रीचे अंगप्रदर्शन दाखविणे जाहिरात दारांना आवश्यक वाटते त्याशिवाय जाहिरात होतच नाही असा अलिखित नियमच झाल्याचे वाटते.

            टीव्ही वरील अशा मालिकां द्वारे मिळत असलेले धडे, घेतलेल्या शिक्षणाचा वॄथा अभिमान, कायद्याने स्त्रीला मिळालेले संरक्षण, तसेच गॄहकलह, आपसी मतभेद, संबंधितांकडून मिळणारे चुकिचे मार्गदर्शन अशा अनेक कारणामुळे, हल्लीच्या तरूणी, (काही अपवाद सोडल्यास) हट्टी व हेकेखोर झाल्याचे वाटतात. कायद्याचे मिळालेले संरक्षण म्हणजे अधिकॄत वापराचे अस्त्रच आहे, असा गोड गैरसमज त्यांच्यात निर्माण झाला आहे. परिणामी घटस्फोटाचे प्रमाण पण वाढले आहेत. विवाह उपरांत मुलीची प्रापंचिक जबाबदारी वाढते. विवाहापुर्वी फक्त आपल्या माता पित्याची जबाबदारी असते तर विवाह उपरांत सासु सास–यांची पण जबाबदारी कळत न कळत आपल्या वर येत असते. माहेरची माणसं व सासरचे सर्व नातेवार्इक यांची मर्जी व मने सांभाळीत तिला संसार फुलवायचा असतो. हे आपले एक कर्तव्यच आहे हे त्या विसरतात किंवा याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मी माझा नवरा व मुले एवढयापुरता त्यांचा संसार सीमीत ठेवण्याकडे अधिक कल असतो. घरात सासू–सास–यांची अडचण वाटते. आपसी वाद व बेबनाव यामुळे ते कुटुंब विभक्त होते. अशा क्षुल्लक व अवाजवी कारणांनी घरातील पर्यायी समाजातील स्त्रीचे स्थान डळमळू शकते.

      महिलांनी आपली कौटुंबिक जबाबदारी व कर्तव्ये लक्षात घेउन व्यवस्थित यशस्वीरित्या पार पाडलीत तर निश्चितच समाजाला पण तिचा अभिमान वाटेल| तसेच उपरोक्त गोष्टीकडे बारकार्इने लक्ष देउन जर आपली मानसिकता बदलली व पूर्वीच्या स्त्रियांचा आदर मनात ठेउन त्यांची शिकवण घेतली तर सुरवातीला सांगितल्याप्रमाणे 21व्या शतकात देखील समाजात स्त्रीचे स्थान खचितच मोठे आहे व मोठेच राहील यात तीळमात्र शंका नाही.

Go Back

Comment