Menu

पुनरारंभ

215961

हसमुख सेवेचे व्रत

Please Download here !!

 

                                                                                                                   हसमुख सेवेचे व्रत

        मानवी आयुष्यात अशा काही व्यक्ती येतात कीÊ त्यांचा जवLून अथवा दुरान्वये कसाही संबंध आला तरी त्या कायम स्मरणात राहतात| मला जसे समजू लागले तसे माझ्या बालपणातील स्मरणात राहिलेल्ल्या काही अशाच अविस्मरणीय व्यक्तीÊ त्यांचा तो वेश त्यांच्या सवयीÊ लकबी इ|अजूनही जशाच्या तशाच ताज्या आहेत|

                 माझा जन्म व बालपण नगर जिह्मात कोपरगांव तालुक्यात साकरवाडी येथे गेले| आमचे कडे तत्कालीन दि गोदावरी शुगर मिल्स लि|साकरवाडी च्या वसाहतीमध्ये रोज सकाLी पाव बटर बिस्कीट विकणारा शंकर पाव वाला यायचा| जवLच वारी गावात त्याची बेकरी असल्यामुLे रोज ताजा व चवदार माल त्याचे कडे असे| आम्हाला जाग यायची ती त्याच्या खणखणीत व दमदार “ पाऽऽव बटर बिस्कीऽऽऽट” या आरोLीनेच| त्याच्या आरोLीमध्ये एवढा दम होता व आरोLी देण्याची लकब अशी वैशिष्टय पूर्ण होती कीÊ तो जर दोन चाLी सोडून मागील चाLीत कोठेतरी कोप–यात असला तरीÊ पुढच्या चाLीतील लोकांना अगदी जवL असल्याचा भास व्हायचा| वयाची पन्नाशी गाठलेलाÊ सड सडीत बांधाÊ पूर्ण सहा फूट उंचीÊ पांढरा पूर्ण बाहीचा शर्टÊ गुडघ्याच्या खाली येर्इल असे नेसलेले दोन टांगी पांढरे धोतरÊ पायात जाड चपलाÊ डोक्यावर टोपलीÊ टोपलीत निरनिराLया प्रकारची बिकिस्टे व क्रीमरोल च्या पिशव्या नीट व्यवस्थित ठेवलेल्याÊ खांद्याला शबनम ब^ग त्यात पाव बटरच्या लाद्या रचलेल्या| अंगात शर्टखाली बंडी| बंडीला छातीजवL वर दोन्ही बाजूला पोटापर्यंत पर्यंतचे तिरपे खिसे व खालीे दोन सरL खिसे| माल देण्या घेण्या साठी कीती जरी वाकले तरी त्यातील एक पैसा ही खाली पडत नसे| त्याची पैसे देवाण घेवाण करण्याची व बंडीत पैसे ठेवण्याची लकब अजब न्यारी होतीÊ जी शब्दात वणर््ान करणे अशक्य आहे|

               शंकर पाववाला वारी गाव व साकरवाडी येथे नावाजलेला गॄहस्थ होता| स्वभावाने तो जेवढा कठोर तेवढाच मॄदु| आपल्या व्यवसायाशी अतिशय प्रामाणिक| कधी कोणास उधार माल देत नसे| लहान मुलंावर त्याचे फार प्रेम होते| त्याला  लहान मुले फार आवडायची|  एखादे मुल पाव बटर घेण्याच्या ह+ास पेटले व पालकांची विकत घेण्याची इच्छा नसली तर पैशाची अपेक्षा न करता “घे बाLा रडू नको” म्हणत त्या मुलास टोपलीतून पाहिजे ती वस्तू हाताने उचलण्यास सांगायचा व बालह+ पूर्ण करायचा| बिस्किट मिLाल्यावर बालकाच्या  चेह–यावरील समाधान पाहून त्याचा चेहरा उजLलेला दिसायचा|

              याच समान वसाहतीला दुध पुरवठा करणारे कंपनीचे समवयस्क दुधवाले कामगारÊ नामे हनु,मंत चैाधरीÊ मामु रबारी व त्याचा मोठा भाउÊ देवा| पहाटे पाच वाजताच रेल्वे लार्इनच्या पलिकडे भरतवाडीहून खांद्यावर कावड घेउनÊ कावडीस दोन्ही बाजूला चाLीस चाLीस लिटरच्या दोन पितLी क^न लावून रोज सकाL संध्याकाL साधारण 2|5 किलोमिटर अंतर चालत यायचे व चाLी चाLीतून “ दूऽऽध ” अशी आरोLी देत दूध वाटप करावयाचे| आरोLी ऐकताच आर्इ बरोबर घरात मिLेल ती वाटीÊ फुलपात्र अथवा कप घेउन आम्ही दूध घ्यावयास धावायचो| दुधवाले काका आमच्या भांडयात पण साधारण अर्धा कप दुध तोटी वाटे सोडायचे| त्या अर्धाकप दुधाचे आम्हास फार अप्रुप वाटायचे| एक वेLेस आर्इने दिलेले दुध आम्ही नाकारत असू पण ते अर्धा कप दुध आनंदाने पित असू|  या तिघांचे व्यक्तिमत्व त्यांच्या अंगमेहनतीला शोभेल असे आडदांडÊ धष्टपुष्टÊ उंच व कणखर होते| मामु रबारी व त्याचा मोठा भाउÊ देवा दोघे मुLचे काठेवाडचे  असल्यामुLे त्यांचा पेहराव आकर्षक होता| पोटापर्यंत उंचीचाÊ शिलार्इने डिझाइन केलेलाÊ बिनबाही व लहानशा प+ीची का^लरचा पांढरा बंडीवजा बुशशर्टÊ  घोटयापर्यंत नेसलेले पांढरे धोतरÊ डोक्यात मुंडाश्या प्रमाणे पीL घालून घातलेला फेटाÊ कानात भिकबाLीÊ मनगटात चांदीचे कडे|                     

                                                                           

               सर्व चाLी फिरून माल विकणे व दूध घालण्यास त्यांना साधारण सकाLचे आठ वाजायचे| घरी जाण्याच्या आधी आमच्या घरासारखे वसाहतीत त्यांची काही ठराविक घरे होती| शंकर पाववाला दारात येताच डोक्यावरील पाटी खाली उतरवित व गLयातील पिशवी दाराला अडकवित हक्काने आर्इला आवाज द्यायचा  “तार्इ मी आलोय एक कप चहा दे|” याच वेLेस हनु,मंत चैाधरीÊ मामु रबारी व त्याचा मोठा भाउÊ देवा पण आपले दुध वाटपाचे काम संपवून यायचे| चहा येर्इपर्यंत दुधवाले डेअरीतून मिLालेले दुध व वाटपानंतर त्याबदल्यात गोLा झालेली कुपने याचा हिशेब करित तर शंकर मिLालेल्या पैशाचा हिशेब लावित बसे|  या सामुहिक चहापानामध्ये दुधवाल्यंाचा वाटप करून उरलेले आतपावÊ पावशेर दुध तर शंकरचा पावÊ खारीचा सहभाग असायचा| चहाचा घोट घेत घेत आपसात थोडीशी चेष्टा मस्करी व सुख दु:खाच्या गोष्टी करित चहापानाचा कार्यक्रम व्हायचा| चहापान झाल्यावर सर्वजण पुन्हा प्रसन्न चेह–यानेÊ हसत मुखे नउच्या दरम्यान आपापल्या घराकडे मार्गस्थ व्हायचे|

              उतार वयातील थकलेला चेहराÊ कपाLावरचा घाम व अंगमेहनतीचे कष्ट करित असतांना देखिल संपर्कात येणा–या प्रत्य्ेाक लहान अथवा मोठया व्यक्तींशीÊ कोठलाही त्रागा अथवा राग राग न करता हसतमुखे सेवा देणेÊ हा त्यांचा गुण वाखाणन्याजोगा होता| अजूनही जेव्हा जेव्हा मी साकरवाडीला जातो तेव्हा मला त्यांची प्रकर्शाने आठवण येते व लोटला तो काLÊ सरले ते दिवस व राहिल्या त्या आठवणी म्हणत त्यांचे स्मरण होते| आयुष्यात जणू त्यांनी हस मुुख सेवेचे व्रतच स्विकारले होते|

 

                                                                                                    

Go Back

Comment