Menu

पुनरारंभ

199213

सहज

Please download here !!

                                                              सहज

                 सहज सुचले म्हणून लिहावयास घेतले| सहज या शब्दाची रचना अगदी सहज “स” “ह” आणि “ज“ या तीन मुLाक्षरांनी झालेली आहे| याला कोठेही काना‚ मात्रा , विलांटी अथवा उकारासारखे स्वरालंकार नाही| तसेच व्याकरणीक अलंकार पण नाही| यामुLे सहाजिकच सहज हा शब्द नवशिक्या बालकास लिहावयास सांगितला,  तर तो पण सहजा सहजी सहजपणे लिहू शकेल| असा हा तीन अक्षरी सहज सोपा शब्द|

 

सहज अर्थात सुकर‚ सोपा, सुलभ| एखादी सहजपणे केलेली गोष्ट अथवा ताण तणाव विरहित केलेली क्रीया जितकी आनंदमयी ठरते तितकी ताण तणावाखाली अशांत मनाने राहून केलेली क्रीया आनंद देउ शकत नाही| अशा केलेल्या कामाचे सुख समाधान प्राप्त होत नाही| या उलट जेव्हां एखादी गोष्ट जाणून बुजून अथवा हेतु पुरस्सर करायची झाल्यास मनावर ताण येतो| हे करू का नकोÆ केल्यास  शोभेल काय Æ हे बोलू का नकोÆ असे बोलणे योग्य ठरेल काय Æ अशा एक ना अनेक शंका कुशंका मनी येतात| सहाजिकच असे कार्य करावयास बोजड जाते व प्रसंगी अपयश पदरी पडते|

 

                                उदाहरणा दाखल सांगायचे झाल्यास मुर्तीकारास आपल्या मनातील घडवायच्या मुर्तीची पूर्व कल्पना देउन बनविण्यास सांगितले तर मुर्तिकार त्यात आपला जीव ओतून दिलेल्या सूचनांचे पालन करित  सहजा सहजी आकर्षक, सुंदर व रेखीव मुर्ती बनवेल| परंतू त्याचेवर कोणत्याही प्रकारचे दडपण आणल्यास अगर आल्यास कLत न कLत मनावर ताण येउन मुर्ती बनविण्यास विलंब होर्इल| कदाचित या मुर्तीमध्ये जिवंतपणाचा आभास कमि असेल अथवा अन्य काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही| मग तो कितीही कसबी मूर्तीकार असो| हीच गोष्ट वक्तयाची| स्वत:चा विषय घेउन जितके व्यवस्थित भाषण करेन ते प्रभावी असेल| परंतु मर्यादा टाकल्यास त्या तणावाखाली राहून केलेले भाषण कदाचित प्रभावी ठरणार नाही| कारण मनावर येणारा ताण व सहजतेचा अभाव| सहजा सहजी तणावरहित मनाने केलेले काम मनास सहज आनंद दे}न जाते| त्याच्या आनंदास सीमा नसते|

 

                मनावर कोणताही ताण तणाव अथवा दडपण असू नये| विद्याथ्र्यांनी परिक्षेच्या वेLी पेपर सोडवितांना मनावर कोणताही ताण ठेउ नये| मन व चित्त शांत ठेउन सोडविलेले प्रश्न सहजच यश देउन जातील यात शंका नाही| मनावर ताण असल्यास सहज सोपे असलेले प्रश्न देखिल किचकट व कठिण वाटू लागतात|  मानवी आयुष्य अनेक सुख दु:खाच्या खाच खLग्यांनी भरलेले आहे|वेLो वेLी येणा–या सुख दु:खाच्या क्षणांना निग्रहाने व धैर्याने न डगमगता प्रसंगांना सामोरे जात आयुष्य जगायचे असते| आयुष्यात वेLोवेLी घडणा–या अनेक ब–या वार्इट घटनांचा वेLीच सहजपणे  विचारपूर्वक यथा योग्य निर्णय घेतल्यास भविष्यातील ताण तणाव कमि होण्यास मदत होते व जिवन सुखकर होते|  थोडक्यात सांगायचे झाल्यास आयुष्याची खरी मजा चाखायची असेल तर कोणतेही काम करतांना सहजता असावी|

 

Go Back

Comment