Menu

पुनरारंभ

199219

संत चोखामेळा

Please download here !!

संत चोखामेळा  

संत चोखामेLा एक अविरत भक्ति रसाचे प्रतिक| पंढरीच्या पांडूरंगावर त्यांची अपार भक्ति, अपार श्रथ्दा होती| त्यांचा जन्म नीच कुLात झाला होता| मंगLवेढा ही त्यांची जन्म भुमि|
चाखोबांच्या अयोजिन जन्माबाबत एक विलक्षण कथा सांगितली जाते| कोरेगावातील विठ्ठल भक्त पाटलांनी आपल्या बागेतील सव्वाशे आंबे येसकराबरोबर पंढरपूरच्या पंढरीरायाला पाठविले| पंढरपूर दोन कोसावर असतांना एका वॄध्द ब्रााम्हणाने त्यांना अडवून काही खायला मागितले| यावर सुदामा येसकर म्हणाला, “हे ब्रम्हणा, मी अंत्यज व आपण द्विज मी आपणास कसे व काय खायला देउ| माझ्या डोक्यावर असलेले आंब्याचे ओझे देखिल माझे नाही| त्यामुLे मी आपणास काही खायला देउ शकत नाही| मला माफ करा|” त्यांचे सोबत असलेली सुदामाची पत्नी सावित्री बार्इला वॄध्द ब्रााम्हणाची दया आली आणि तिने त्यातला एक आंबा वॄध्द ब्राांहणास चोखावयास दिला| ब्रााम्हणाने आनंदाने आंबा चोखला परंतु आंबट लागल्याने लगेच परत केला| चोखलेला आंबा परत पाटीत ठेवणे अयोग्य होते म्हणून तो आपल्या ओटीत ठेवला|्र पंढरपूरला पोचल्यावर बडव्यांनी सर्व आंबे मोजले तेव्हा कमि भरलेल्या आंब्याची गोष्ट सावित्रीबार्इंनी बडव्यांना कथन केली व ओटीतला आंबा दाखवू लागली| परंतु ओटीत आंब्याच्या ऐवजी बाL नजरेस पडले| देवाने आंबा चोखला व बाLरूपी प्रसाद दिला म्हणून बाLाचे चोखा मेLा असे नामकरण केले|
चोखोबा व त्यांची पत्नी सोयरा दोघेहीे वि{ल भक्त| त्यांची पंढरपूरला पांडूरंगाच्या दर्शनाला जाण्याची तीव्र इच्छा होती| संत नामदेव महाराजांची दिंडी पंढरीच्या दर्शनाला चालली असता त्यंानी त्यामध्ये सामिल होण्याची इच्छा त्यांच्यापुढे प्रगट केली| दिंडीतील इतर भक्तांनी ते नीच कुLातील असल्याचा आक्षेप घेत नाकारली| परंतु नामदेवांनी सर्वांना समजाविलेÊ “बाबांनो जातपात ही देवाने केलेली नाही तर स्व स्वार्थासाठी मानव निर्मित आहे| देवापुढे सर्व सारखे| देव हा भावाचा भक्तिचा भुकेला आहे| उच नीच नाही तिथे भगवंत È जिथे भावभक्ती देखोनिया ÈÈ मग आपण हा भेदभाव का मानावा|”
त्यांना नामदेव महाराज गुरू भेटले| नामदेवांनी आपल्याला कॄतार्थ केले म्हणून चोखोबा म्हणतात,
“धन्य धन्य नामदेव È माझा निरसला भेद È”
परंतु पंढरपुरला बडव्यांनी त्यांना नीच कुLातले हिणवित मंदिरात प्रवेश नाकारला| ते विना दर्शन घरी परतले| या वेLी चोखोबा म्हणतातÊ
“उस होये डोंगाÊ परी रस नोहे डोंगा È
नदी होये डोंगीÊ परी जल नोहे डोंगे È
कमान होये डोंगीÊ परी तीर नोहे डोंगा È
चोखा होये डोंगाÊ परी भाव नोहे डोंगा È

देव सर्वांच्या अंगी आहे तो फक्त जाणावा लागतो|

चोखोबांच्या कडून मिLालेल्या प्रेरणेने यास अनुसरून सोयराचा पण एक अभंग आहे| सोयरा
म्हणते| 

अवघा रंग एक झालाÊ रंगी रंगला श्रीरंग È
मी तू पण गेले वायाÊ पाहता पंढरीचा राया È
नाही भेदाचे ते कामÊ पLून गेले क्रोध काम È
देही असूनी तुही देहीÊ सदा समधीया पाठी È
पाहा पाहारे गेले दूरीÊ म्हणे चोखियाची महारी È

पंढरीचा पांडूरंग त्यांच्या वर प्रसन्न झाला| रात्री त्यांच्या झोपडीत जाउन त्यांना दर्शन दिले व गLयातील रत्नहार काढून दिला| देवाच्या गLयातील हार दिसेनासा झाला म्हणून बडव्यांनी त्याच्या वर चोरीचा आरोप करित त्यांना मारू लागले| शिक्षा म्हण्ूान चोखोबांना बैल जोडीला बांधुन बैल जोडी हाकू लागले| पण पांडूरंगाची दया एवढे मारून देखिल बैलं जागची हालेनात|

यावेLी पांडूरंगाचा धावा करित ते म्हणाले,

“धाव घाली विठू आता चालू नको मंद È
बडवे मज मारिती एैसा तरी काय अपराध
वि{लाचा हार तुझ्या कंठी कसा आला
शिव्या देउनी म्हणती महारा देव बाटविला
कर जोडोनी चोखा विनवितो देवा
बोलिलो उत्तरे परी राग नसावा|

आपल्या अभंगात पांडूरंगाची क्षमा मागत ते म्हणतात| हेे विठ्ठला मला माफ कर| खरेतर मी तुझ्या पायाशी यायला पाहिजे| पण मी तुलाच येथे बोलवितो आहे| मला क्षमा कर|” त्यांच्या हाकेला पांडूरंग धाउन आले व त्यांना सोडविले|

एकवेLा पांडूरंग ब्रााम्हणाच्या वेशात सोयराच्या दारी भिक्षा मागण्यास आले| “आम्ही नीच कुLातील| तुम्हास कशी भिक्षा देणारÆ” असे सोयरा म्हणता मी फार भुकेला आहे काहीतरी दे असा अ+ाहास पांडूरंगानी धरला तेव्हा सोयराने त्यांना भाकरीची भिक्षा दिली| ब्रााम्हण रूपी पांडूरंग प्रसन्न झाले जे काही मागायचे ते माग म्हणाले| सोयराने पुत्र प्राप्तीची इच्छा केली| ब्राम्हणाने ताटातील भाकरीचा तुकडा प्रसाद म्हणून दिला| कॄपा प्रसादे सोयराची इच्छा पूर्ण झाली| सोयरा गर्भवासी झाली| दिवस भरले| बाLंतपण करायला चोखोबा आपल्या बहिणीला बोलावण्यास गेले| त्याच वेLी इकडे सोयरा बाLंत झाली| नणंदेच्या वेशात पांडूरंग अवतरले व तिचे बाLंतपण केले| पुुत्र रत्न जन्मा आले त्याचे नाव कर्म मेLा ठेविले| बाL बाLंतीण सुखरूप झाले|

नंतर चोखोबा बहिणीसह परतले तेव्हा त्यांना कLले कीÊ पांडूरंगं येउन गेलेत व सोयराचे बाLंतपण करून गेले

या संदर्भात विठ्ठलाची महती सांगणा–या अभंगातील काव्य पंक्तीत म्हटले आहे 
लेकरांची सेवा केलीस तू आर्इ
कसा पांग फेडू कस होउ उतरार्इ
तुझ्या उपचारा जगी तोड नाही
ओवाLीन जीव माझा सावLे विठार्इ
जन्मभर पूजा तुझ्या पा}लंाची
मा}लीच मुर्ती विठ्ठलाची

संत चोखोबांच्या मते विटाL म्हणजे, जो टाLता येत नाही तो विटाL| ते आपल्या अभंगात म्हणतात,

जन्मता विटाL, मरता विटाL È
चोखा म्हणे विटाL आदिअंति ÈÈ
आदिअंति अवघा, विटाL साचला È
सोवLा तो झाला कोण न कLे ÈÈ
चोखा म्हणे मज नवल वाटते È
विटाLा परते आहे कोण ÈÈ

बालक जन्मास आल्यास विटाL म्हणून 10 दिवस सोयरं पाLतात| त्यामागे खरे कारण तर नवजात बालकास संसर्ग होउ नये हाच उदात्त हेतु असतो| तसेच मॄत्युउपरांत विटाLाचे कारण पुढे करित 10 दिवस सुतक पाLले जाते| खरेतर मॄतदेहापासून किंवा त्याच्या स्पर्शाने जंतुसंसर्ग टाLावा यासाठी मॄतदेहाच्या नाका तोंडात कानात कापसाचे बोLे लावतात| यात कसला आला विटाL|

स्त्रीयांचे बाबतीत मासिक धर्म पालन म्हणजे शरीर शुथ्दीच होय| अशाप्रकारे मानव शरीर विटाLाने ग्रासले आहे| जर जन्मापासून मॄत्युपर्यंत विटाL आहे तर त्यात अशौच काय मानायचेÆ चोखोबा नवल करित म्हणतात, असा कोणता माणूस विटाLा वाचून सोवLा आहे|

चोखोबाची पत्नी सोयराजी ही स्वयंप्रज्ञा स्पष्टवक्ती होती| तिच्याकडे भगवद्भक्ताची आर्तता होती| विठ्ठलनामाचा महिमा सांगतांना ती म्हणते, “विटाLाचे होते जाLे È तुटले बLे नामाच्या ” केवL नामाच्या घोषाने विटाLाचे जाLे तुटले| देहाचा विटाL हा निसर्गदत्त आहे तो कोणाला चुकला नाही| त्याची अपरिहार्यता वर्णन करतांना ती खडे बोल सुनावते म्हणते|

देहासी विटाL म्हणती सकL È
आत्मा तो निर्मL शुध्द बुध्द È
देहीचा विटाL देहीच जन्मला È
सोवLा तो झाला कवण धर्म È
विटाLा वाचोनी उत्पत्तीचे स्थान È
कोण देह निर्माण नाही जगी ÈÈ

विटाL म्,हणता तो फक्त देहालाच आहे पण आत्मा तर शुध्द व बुध्दीवान आहे| विटाL अर्थात ज्यास आपण अशौच समजतो तो जन्मजातच आहे| असा कोणता मानवप्राणी आहे ज्याचे अंगी विटाL नाही| अशौच मानवाचे उत्पत्ती स्थान आहे| याशिवाय कोणता मानव देह निर्माण तरी झालाय का? 

शेवटी परिस्थितीनुसार संत चोखोबांना मंगLवेढयाच्या कील्ल्याच्या तटबंदीवर मजूराचे काम करावे लागले| काम करतांना देखिल मुखाने वि{ल नामाचा घोष चालूच होता|

तो एकादशीचा दिवस होता| दुर्दैवाने काम करतांना कील्ल्याची तटबंदी ढासLली| त्यात अनेक मजूरांसमवेत यांचा अंत झाला| त्यांचा शोध घेतांना फक्त अस्थिच सापडली परंतु ती चोखोबांची ओLखायची कशी| मरणउपरांत देखिल फक्त त्यांच्याच अस्थिंमधून “वि{ल व्{िल” असा नामाचा गजर ऐकू येत होता| ही अस्थि चोखोबांची असे जाणून ती सर्व अस्थि नामदेवरायांनी पंढरीत आणली| चंद्रभागेत विसर्जन केले व तिथे त्यांची समाधी बांधली|

देव चोहिकडे कोंडियला È चोखा म्हणे देव भावा चा बांधला È 

 

Go Back

Comment