Menu

पुनरारंभ

224924

राँग नंबर

Please Download here !!                                                                                                                                                                         

राँग नंबर

 

                दुपारी दोन अडीच वाजणेची वेL| नुकतेच दुपारचे जेवण उरकून थोडीशी वामकुक्षी करावी म्हणून कोचावर डोLे मिटून पहुडलो|  दुपारची वेL असल्याने सर्वदूर साधारण शांतता होती| घरातील सर्व जण आपापल्या कामाला गेलेले| मुले शाLेत गेलेली| रस्त्यावरून एकादे वाहन गेले तर त्याचा झालेला आवाज एवढाच काय तो अपवाद,|  बाकी सर्व शांत| अशा शांत वातावरणात थोडीशी डुलकी लागणे सहाजिकच नाही का Æ

 

                तितक्यात ट्रींग ऽ ऽ ट्रींग ऽ ऽ आवाज करित टेेलीफोन खणाणला| खरेतर झोपेची गुंगी इतकी चढली होती की उठून फोन उचलणे जरा जिवावरच आले होते| पण कोणीतरी काही तरी आपल्याशी जरूरीचे किंवा महत्वाचे काम असल्याशिवाय आपणास अशावेLी फोन करणार नाही या प्रामाणिक विचाराने फोन घेण्यासाठी उठलो| फोनजवL जाउन रिसीव्हर उचलण्याचे आतच फोन बंद झाला| परत येउन सोFयावर बसणार तितक्यात ट्रींग ऽ ऽ ट्रींग ऽ ऽ आवाज करित परत फोन खणाणला| न उचलावा तर सारखा आवाज चालू राहिल व आवाजाने झोप लागणार नाही शिवाय पलीकडे कोण आहे व त्याचे काय काम आहे हे समजल्याशिवाय चैन पडणार नाही या विचाराने फोन घेण्यास उठलो तर पुन्हा तीच पुनरावॄत्ती| रिसीव्हर उचलण्याचे आधीच फोन बंद| मनात फोन करणाराबद्दल संताप आला| जर एवढे जरूरीचे काम आहे तर पाच दहा सेकंद फोन उचले पर्यंत थांबता येत नाही काÆ निष्कारणच दुस–याला त्रास देण्याची प्रवॄत्ती| आता परत फोन आला तर एकतर उचलायचा नाही कींवा उचलला तर काही बोलायचे नाही असे मनाशी ठरविले व सोFयावर आसनस्थ झालो|  

     

अपेक्षे प्रमाणे परत टेलीफोनची घंटा वाजली| न राहवून व ठरविलेले सर्व विसरून  “ह^लो” म्हणत रिसीव्हर उचलला| पंधरा वीस सेकंद प्रतिक्षा करून पलिकडून कोणताही प्रतिसाद न आलेमुLे मी फोन ठेवला| म्हणाल तर घटना तशी करिकोL सर्व सामान्यांना नेहमी सामोरी जावी लागणारी| पण निष्कारणच मानसिक त्रास कीती Æ

 

                आजकाल टेलीफोन असणे किंवा मेाबार्इल बाLगणे चैनीची वस्तु नाही| ही आजकालच्या धकाधकीच्या जिवनात गरज झाली आहे| परंतु याचे महत्व ज्याला समजले तोच याचा वापर योग्य प्रकारे करतो बाकी सारे याकडे केवL चैनीची वस्तु किंवा शौक म्हणून वापरतो| टेलीफोन किंवा मोबार्इल ही संदेश दLण वLणाची साधने आहेत| आज आपण घर बसल्या साता समुद्रापार असलेल्या मित्राशी नातेवार्इकांशी टेलीफोन किंवा मोबार्इल वरील बटने दाबून थोडयाशा अवधित संपर्क करू शकतो| संकटकाLी एकमेकास संदेश देउा शकतो‚ संदेश घेउ शकतो| ही सर्वात महत्वाची व आवश्यक सुविधा|

 

पण आजकाल नुसता मिसका^ल देणे फ^शन झालीय| कां Æ तर म्हणे केवL संकेत म्हणून अथवा टेलिफोन वर होणारा खर्च वाचापा म्हणून|  बरे फोन केल्यावर किंवा आल्यावर महत्वाचे सोडून अन्य किंवा त्याच त्याच विषयावर तासन तास बोलत राहणे हे कितपत योग्य आहे Æ यात आपण आपला वेL व पैसा वाया घालवित आहेात असे वाटत नाही कां Æ  टेलीफोन केवL संदेश वहनाचे साधन आहे यात मोजके व महत्वाचे बोलणे याला फार महत्व आहे| नेमके याच वेLी जर अन्य तिसरी व्यक्ती उभयतांपैकी कोणाशीही  बोलू इच्छिल्यास बोलू शकत नाही| “आपण संपर्क करू इच्छिणारी व्यक्ती दुस–या अन्य व्यक्तीशी बोलत आहे| कॄपया प्रतिक्षा करा अथवा थोडयावेLाने प्रयत्न करा|” असा ध्वनिमुद्रित टेप ऐकत प्रतिक्षा करण्या पलिकडे पर्याय नसतो| पर्यायी महत्वाच्या कामास विलंब होतो|

 

                                                                                     

एवढेच नव्हे तर फोन वर बोलणारांची भाषा पण कित्येक वेLी असभ्यपणाची  असते| आपण सार्वजनिक ठिकाणी उभे आहोत व तेथून संभाषण चालू आहे| आपले संभाषण कLत न कLत इतरांचे देखील कानी पडते आहे याचे त्यांना भान नसते| आपली वाणी इतरांना ऐकण्यास गोड वाटावी याचे भान ठेवल्यास निश्चितच आपले बद्दल इतरांचे मनात आदर निर्माण होर्इल|

 

या बरोबर चुकीचे नंबर देखील वारंवार लागतात| याने देखिल मनस्ताप होत असतो| आपण दूरदर्शनवर आवडती मालीका अथवा चित्रपट पाहत असतो| पडद्यावरील कथा  रंगात आलेली असते| पुढील क्षणी काय होर्इल याची उत्सुकता लागलेली असते| मन एकाग्र झालेले असते| याचवेLी टेलीफोनची घंटी वाजते| रिसिव्हर उचलल्यावर समजते की‚े पलीकडील व्यक्तीला अपेक्षित व्यक्ती नसते किंवा चुकीचा नंबर लागला असतो| अशावेLी कार्यक्रम पाहण्याचा रसभंग होतो व रोष व्यक्त करण्यापलीकडे काहीच करू शकत नाही| जर डायल करणे पुर्वी फिरविणारा नंबर व्यवस्थित तपासला तर चुकिचा नंबर म्हणून पलिकडच्या व्यक्तीचा रोष ओढवून घेत नाही वेL पैसा व त्यावर खर्ची झालेले थोडेफार श्रम देखिल वाचतात|  

 

      पण कधी कधी असा चुकीचा नंबर देखिल मनास आनंद देउन जातो| या बाबतीत माझ्या बद्दल घडलेला अनुभव जरा मजेशीरच आहे| सकाLची वेL मी काम आटोपून वर्तमान पत्र वाचण्याचा आनंद घेत होतो| फोन खणाणला| तिकडून एक गोड बालमधूर आवाज आला “ह^लो”‚ मी स्वीटी बोलतेय‚ पिंकीतार्इ  आहे का Æ ” लहान मुलीचा गोड आवाज ऐेकून मला नवल वाटले| तिच्या आवाजावरून ती 4À5 वर्षाची लहान मुलगी असावी असा अंदाज आला| मी तिला बोलते करित सहजच म्हणालो “पिंंकी बाहेर गेली आहे| येर्इलच थोडया वेLाने काही सांगायचे काय तिला Æ ”  “ हो‚ काका ‚  परवा माझा वाढदिवस आहे| तिला म्हणावे तुला जरूर बोलावले आहे| मी तिची वाट पाहिन| तिला सांगा बर्थडे झाल्यावर आम्ही बागेत खेLायला जाणार आहोत|” इति स्वीटी| मी तिला तिचा नाव व पत्ता विचारला| “स्वीटी देशपांडे‚ पालीका बागेच्या मागे नागपूर”| तिचे बालमन नाराज होउ नये म्हणून मी तिचेशी बोलत राहिलो| मधूनच अगं स्वीटी कोण आहे Æ कोणाशी बोलते आहे Æ असा आवाज आला| मी तिला तिच्या आर्इला फोन देण्यास सांगितले| तिच्या आर्इला माझी ओLख करून देत हा चुकीचा नंबर असल्याचे सांगितले व सोबत स्वीटीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास विसरलो नाही| बोलता बोलता केवL तिचे बालमन नाराज होउ नये म्हणून मी तिचेशी बोललो याची त्यांना कल्पना दिली| यानंतर वाढ दिवस झालेवर आमचे सविस्तर बोलणे झाले व आज देखील अधून मधून होत असते| महत्वाचे म्हणजे मी या देशपांडे कुटुंबियांना प्रत्यक्ष पाहिले नाही किंवा भेटलो नाही त्यांनी पण मला प्रत्यक्ष पाहिले नाही किंवा भेटले नाही| केवL चुकिचा नंबर लागले मुLे आमची भेट झाली व मला चांगली एक बालमैत्रिण मिLाली| हे काय कमि आहे|  मी केवL चुकिचा नंबर म्हणत फोन ठेउन दिला असता तर माझ्या शुभेच्छा तिच्यापर्यंत पोचू शकल्या नसत्या| केवL शुभेच्छाने ती किती आनंदित झाली ते तिच्या बोलण्यावरून समजते|  आज मी एका लहान जिवाला आनंद दिल्याचाच फार मोठा आनंद मला पण मिLाला|                                                                                                                   

          

Go Back

Comment