Menu

पुनरारंभ

221771

मुंबर्इचा भिकारी

Please download here !!

प्रकाशन: दैनिक  सकाळ  मुक्तपीठ.

 

           मुंबर्इचा भिकारी

 

      सर्व साधारण भिकारी म्हटला म्हणजे एक वेगळीच प्रतिमा आपल्या डोLयासमोर उभी राहते| कLकट कपडे न विंचरलेले केस‚ हातात भिक मागण्यासाठी अ^ल्य्ुाुम्निियमचे चेपलेले भांडे‚ खांद्यावर अडकविलेली थोडीफार फाटकी कधी न स्वच्छ केलेली पिशवी वगैरे वगैरे| त्याच्या स्वभाव धर्माबद्दल बोलायचे झाल्यास लागट बोलणे व भिक मागणे हाच एकमेव स्वभाव| जो दुस–याकडे सदैव याचना करून स्वत:चे उदरभरण करतो त्याच्या कडून मदतीची किंवा सहकार्याची अपेक्षा करणे म्हणजे वावगेच ठरणार नाही काÆ पण या कल्पनेला माझे बाबतीत फार मोठी तडा गेली व चक्क सांगून सुध्दा विश्वास बसणार अशी अनपेक्षित घटना घडली|

 

      सन 1979 सालची गोष्ट| मी तत्कालीन विदेश संचार सेवाह्मैछश्)Àविदेश संचार निगम ल्ाििमटेड ह्मद्यश्ण्L) व वर्तमान टाटा कम्युनिकेशन्स(टाता छेम्) मथ्ये हेड क्लार्क पदावर कार्यरत होतो|  माझे पोस्टींग उत्तर प्रदेशात देहरादून येथे झाली होती| माझे आ^फिस देहरादून शहरात चक्राता रोडवर होते व आम्ही आ^फिस पासून साधारण चार पाच किलोमिटर अंतरावर हरिद्वार रोडवर धरमपूरला रहात होतो| वार शनिवार‚ महिना अखेरीचा दिवस होता| नुकताच पगार झाला होता| मुलांना शहरात फिरवावे या हेतुने मी पत्नीला दोन्ही मुलांना घेउन माझे शहर आ^फिसात संध्याकाLी चार वाजता बोलवले होते| आ^फिस सुटलेवर साडे पाच वाजता पलटण बाजार‚ घंटाघर हा भाग फिरत फिरत बघून खरेदी करून घरी जाणार होतो| असा प्रोग्रा^म आधीच ठरला होता| ठरल्याप्रमाणे ती दोन्ही म्,ाुलांना घेउन माझे शहर आ^फिसला आली| 

 

      त्या दिवशी स्वतंत्र उत्तरांचल मागणी साठी स्थानिक लोकांनी आंदोलन केले होते| याची मला कल्पना नव्हती| आंदोलकांनी दुकाने बंद करण्याकरिता उग्र रूप धारण केले होते| चौकात दुकाने फोडली जात होती| हल्ला केला जात होता| त्याच वेLी आम्ही फिरत फिरत पलटण बाजारमध्ये प्रवेश केला| सुरवातीला बाजारात गर्दी असतेच तशी ही गर्दी असावी असे गॄहित धरून आम्ही त्याच दिशेने वाटचाल करित होतो| आमचे आपसी बोलणे मराठी भाषेत चालू होते| आमचे बाजूलाच एक भिकारी उभा होता| त्याला आंदोलनाची कल्पना असावी| 

       आमचे मराठीतील संभाषण ऐकून तो पुढे आला व म्हणाला‚ “बाबूजी या गलीमधून जा|” सुरवातीला तो असे मराठीत बोलला याचे आश्चर्य वाटले व आम्ही त्याचे कडे बघतच राहिलो| तो परत तेच म्हणाला‚ “बाबूजी या गलीमधून जा|”  माझ्या खिशात पगाराची रकम होती याची मला जाणीव झाली| कदाचित आम्हास लूटण्याचा त्याचा विचार असावा अशी शंका मनी आली म्हणूनÊ मी त्याचे बोलण्याकडे दुर्लक्ष करित होतो| तो परत तेच म्हणाला‚ “बाबूजी या गलीमधून जा|”  मग मात्र न राहवून मी त्यास कारण विचारले| “बाबूजी पुढचे चौकात दंगा झाला तुमचे बरोबर या मार्इ (माझी पत्नी) व छोटे मुले आहेत|                                                                     

 

 खतरा आहे म्हणुन या गलीमधून जा|” तो बोलता झाला| समोर गर्दी दिसत होती पण त्याचेवर कीती विश्वास ठेवायचा हा प्रश्न होताच| “बाबूजी खरा सांगतो या गलीमधून जा|” असे तोडक्या मोडक्या मराठीत परत तो म्हणाला|

      शेवटी त्याचे बोलण्यावर विश्वास ठेउन आम्ही गल्लीमध्ये जातो न जातो तोच मागील दुकाने फोडल्याचा आवाज झाला| एकदोघांनी प्रतिकार केला म्हणून आंदोलकांकरवी त्यांना प्रसाद दिल्याचे देखिल दिसलेे| वेLीच त्या भिका–याकडून योग्य मार्गदर्शन मिLाल्यामुLे वाचलो अन्यथा आमचेवर दुर्धर प्रसंग ओढवला असता| एवढे करून तो सदगॄहस्थ थांबला नाही तर गल्ल्या संपून मुख्य रस्ता लागेपर्यंत (आराघरपर्यंत) आम्हास मार्गदर्शन केले| तो आमचे बरोवर असल्यामुLे मनात परत एकदा शंकेची पाल चुकचुकली होती|  वाटेत बोलता बोलता तो म्हणाला‚“बाबूजी मी मुंबर्इत लोकल मंधी धा (दहा) वर्स (वर्ष) भीक मागली म्हणून मला मराठी येते|”                                                  

      मुख्य रस्यास लागल्यावर मी कॄतज्ञतापूर्वक दहा रूपयाची नोट देउ केली पण “मुंबर्इमंधी अपघाता वेLी सगLे धावतात व मदत करतात तसेच मी पण केले ” म्हणत त्याने घेेण्याचे नाकारले| त्याचे ते वागणे बघून मला सिंह व उंदराची गोष्ट आठवली| छोटया उंदीरांनी जाLे कुरतडून सिंहाची सुटका केली| ‘इवले इवले जीवही येती मोठया मोठया कामाला’ या ओLींंची प्रचिती आली| पेशाने तो जरी भिकारी असला जाता जाता मानवतेचे दर्शन घडवून गेला व नंतर आम्हाला कधी दिसलाच नाही| 

Go Back

Comment