Menu

पुनरारंभ

199268

माझे आनंदी जीवन

Please download here !!

 

                                                              मी माझे जीवन आनंदी कसे केले  त्याची गोष्ट

          खरेतर जीवनात सुख दु:ख हे प्रत्येकालाच लागू आहे| सुख दु:ख हे जीवनाचा एक अनिवार्य भागच असे म्हणावयास हरकत नाही| याशिवाय जीवन परिपूर्ण होउच शकत नाही| रामदासांनी आपल्या मनाच्या श्लोकात म्हटलेच आहे “ जगी सर्व सूखी असा कोण आहेÊ विचारी मना तुची शोधून पाहे|” संतांनी देखिल म्हटले आहे “सुख पाहता जवापाडे Êदु:ख पर्वता एवढे|” जगात सुखी माणूस शोधून देखील सापडणार नाही| कदाचित यावरूनच सुखी माणसाचा सदरा ही गोष्ट तयार झाली असावी| याला मी तरी कसा अपवाद असणार| समाजात मजसमान अनेक दु:खी कष्टी व्यक्ती आहेत| त्यांचे दु:खी जीवनÊ त्यांनी भोगलेल्या व भोगत असलेल्या हाल अपेष्टाÊ त्यांच्या नशिबातील भोग पाहिल्यास मी स्वत:ला अनंत पटीने सुखी समजेन| मला तरी वाटते कीÊ दु:ख दु:ख म्हणून रडत कढत जीवन जगण्या पेक्षा दु:खातच सुख शोधित आनंदाने जीवन जगायचे व जीवन सुखी करायचे असते|

        स्वअनुभवा बाबतीत सांगावयाचे झाल्यासÊ बालपण जस जसे मागे पडत गेले व वय वाढत गेले तस तसे सर्वसाधारण सामान्य माणसा प्रमाणेच मी पण भावी जीवनाची सुख स्वप्ने पाहातÊ ती रंगवीत मोठा झालो| त्यावेLी नोकरी लागणे म्हणजे फार मोठे दिव्यच होते| कर्म धर्म संयोगाने नशिबाने मला साथ दिली| वयाच्या 18व्या वर्षीच नोकरीला लागलो| त्यावेLी मिLणा–या तुटपुंज्या तीन आकडी पगारातच स्वत:चा घरखर्चÊ गावी आर्इ वडिलांना करावयाची मदतÊ कधीकाLी उदभवणारे आजारपण या व्यतिरिक्त भविष्या साठी थोडीशी बचत इ|खर्च पाहता महिना आर्थिकदॄष्टया प्रचंड ताण तणावाखाली पार होत असे| अशाप्रकारे सर्व खर्च वजा जाता महिना पार करणे म्हणजे मोठे दिव्यच होते| महिना अखेरीस शेवटच्या आठवडयात तर फारच कुचंबणा व्हायची| बरोबरीचे सर्व सहकारी मित्रांची आर्थिक परिस्थीती पण मज समान यथा तथाच असल्यामुLे कोणाकडे याचना करणे पण योग्य नव्हते| यावर कोणी मदत केलीच तरÊ परत फेडीचा प्रश्न पण मोठा|

 

            कालांतराने उपाय सुचत गेले| दिनदर्शिकेचे पान उलटावे तसे दिवस पलटले| सुरवातीला आ^फिसमध्येच कामाचा व्याप वाढल्यामुLे संध्याकाLी ताशी तीन रूपया प्रमाणे ओव्हरटार्इम मिLत गेला| महिन्याकाठी पंचवीस तीस तास काम झाले की महिन्याला पंचाहत्तर ते नव्वद रूपयापर्यंतचा आर्थिक हातभार लागत गेला| स्वार्थ परमार्थ साधत वसाहतीतील मुलांच्या शिकवण्या घेउन काही अर्थार्जन केले| पत्नी सौ|रजनीनेे पोस्टाची महिला एजन्ट तसेच एका सहकारी बँकेची दैनंदिन ठेव योजनेसाठी एजन्टची कामे करून संसारास हातभार लावला| दरम्यान पोस्टाव्दारे मुक्तविद्यापिठाचा बालवाडीचा कोर्स करून खाजगी शाLे मध्ये बालवाडी शिक्षिकेची नोकरी केली| वसाहती मध्येच राहत्या घरी शालेय साहित्याची विक्री करून चार पैसे मिLविले| अशा एक ना अनेक विध प्रकारे तुटपुंज्या प्रकाराचा बाउ न करता संसाराचा गाडा सुरLीत चालविला|

          पुढे नशिबाने साथ दिली| लिपिक पदापासून सेवानिवॄत्ती पर्यंत अधिकारी पदापर्यंत पदोन्नती होत गेली| पदोन्नती मुLे पगारामध्येही वाढ होत गेली| सन 2004 मध्ये केलेल्या सेवेचा आन्ंाद घेत आनंदाने स्वेच्छानिवॄत्ती स्वीकारली|

                   यादरम्यान आमचा संसार बहरास आला| राम लक्ष्मण रूपी सदगुणी रितेश व निलेश या पुत्रांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले| दोघांना ब–यापैकी जा^ब मिLाले| कर्तव्य भावनेने दोघांचे विवाह केले| आपल्या कुवतीप्रमाणे व गरजेप्रमाणे पुण्यातच सदनिका खरेदी करून दोघे स्वतंत्ररित्या आपल्या संसारात रमलीत| त्यांचा संसार फुलला| वेलीवर फुल फुलले| मानवी मन फार लोभी आहे| सर्व काही असले तरी लोभ पिच्छा सोडत नाही| स्वभावधर्माप्रमाणे आमचा नातवावर व नातवाचा आमच्यावर जीव जडला| ओढ वाढत गेली| सर्वांनी एकत्र राहावे स्वत: जीवनाचा आनंद घ्यावा व इतरांना पण आनंद देउन सुखी करावे ही प्रामाणिक इच्छा| पण सद्यस्थितीतील युवक युवतींची बदललेली मानसिकताÊ काLाची गरज किंवा अन्य अनेक कारणांमुLे निर्माण झालेल्या विभक्तकुटुंब पध्दतीमुLे मुलेÊ सुना व नातवाची भेट होणे दुरापास्त होत गेले| ‘घरोघरी मातीच्या चुली’ या उक्तीप्रमाणे प्रसंगी कुटुंबात छोटेमोठे वाद विवाद घडले| वाद अधिक टोकास जाउ नयेत याची काLजी घेत सामंजस्याची भुमिका घेउन मनावर नियंत्रण ठेवत प्रसंग हाताLले| महिन्यातून एकाद वेLा सर्वांच्या भेटी होतात,| तोच दिवस आनंदी दिवस समजून त्यावेLी मिLालेला आनंद पुढील भेटीपर्यंत टिकून ठेवला जातो|

 

          निवॄत्तीनंतर वाढत्या वयाचा विचार करता केवL योगा समान शारीरीक व्यायामÊ संतुलित व योग्य आहाराचा आधार घेत सुखी जीवन जगण्या बरोबरचÊ चांगले मानसिकÊ कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्य देखिल तितकेच महत्वाचे आहे| याची जाण ठेवत निवॄत्तीनंतर रोज फिरावयास जाणे या सारख्या शारीरीक व्यायामबरोबरचÊ सेवेमध्ये असतांना वेLेअभावी अपूर्ण राहिलेले लिखाणाचे स्वप्न पूर्ण करण्याकडे कल देत कथाÊ कविता व लेख या सारखे लिखाण करून मानसिक व बौध्दीक स्वास्थ्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करित आहे| पहिल्या पासून थोडीशी समाजसेवेची आवड असल्यामुLे जमेल तसे समाज कार्यात सहभाग घेउन सामाजिक स्वास्थ पण टिकविण्याच्या प्रयत्नात आहे| द्रव्याचा लोभ न करता ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ या सॄजन वाक्यातील अर्थाप्रमाणे उपलब्ध द्रव्यात समाधानी आहे| कौटुंबिक जिवनात कुटुंबियांशी वेLेनुरूप आवश्यक तेवढाच विरोध दर्शवित प्रसंगी सामंजस्याचीÊ प्रेमाचीÊ सलोख्याची वर्तणुक देउन समतोल राखण्याच्या प्रयत्नात आहे|     

 

           संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ‘इवलेसे रोप लावीयले व्दारीÊ वेलू तयाचा गेला गगनावरी’ याप्रमाणे वयाची साठी उलटून 63कडे वाटचाल सुरू आहे| या जीवन प्रवासात अनेक सुख दु:खाचे प्रसंग पाहिलेतÊ अनुभवलेत| सुखामध्ये सुख भोगले तर दु:खामध्ये पत्नीच्या सहकार्याने व सहयोगाने कठिण प्रसंगांवर मात केली|

           माझ्या या सुखमय आयुष्या मध्ये तिचा पण फार मोठा मोलाचा वाटा आहे| रितेश व निलेश पुत्रांनी कोणत्याही प्रकारे कधी ह+ न करता परिस्थतीची जाण ठेवत परिस्थितीशी जुLवून घेउन शिक्षण पूर्ण केले| माता पितांवर कोणतेही ओझे न टाकता स्वत:च्या पायावर उभे राहिलेत| ही आमच्या दॄॄष्टीने फार मोठी अभिमानाची बाब आहे|

                 संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज देवा पुढे प्रसाद मागतांना पसायदानामध्ये म्हणतात ‘ जो जे वांछिल तो ते लाभो प्राणिज्यात’ हीच इच्छा मी प्रकट करित परमेश्वरास प्र्रार्थना करेन ‘सर्वेत्र सुखी न संतु ¦

सर्वे संतु निरामया ¦सर्वे भद्राणीपश्यंतु मा: कश्चीत दु:ख ना भवेत|’     

  

                                                                                                                                दि| 29|04|13|

श्री|पवन कुलकर्णी| यास स|न|

 

            मी रत्नाकर वाणी| 1971 साली पुणे जिह्मातÊ जुन्नर तालुक्यातील आर्वी शाखाÊ येथे तत्कालीन विदेश संचार सेवा मध्ये येथे निम्न श्रेणी लिपीक या पदापासून माझ्या करिअरला सुरवात झाली| पदोन्नती व्दारे निम्न श्रेणी लिपीकÊ उच्च श्रेणी लिपीकÊ प्रधान लिपीकÊ कार्यालय अधिक्षकÊ अधिकारी अशा विविध पदांवर आर्वी,पुणे व उत्तर प्रदेशात देहरादून शाखेमध्ये एकूण 34 वर्षे सेवा झाल्यावरÊ 2004 मध्ये तत्कालीन विदेश संचार सेवाÀविदेश संचार निगम लि|तथा हल्लीचे टाटा कम्य्ुानिकेशन्सÊ पुणे येथून अधिकारी(मा|सं|)या पदावरून सेवा निवॄत्त झालो| निवॄत्तीपश्चात मी पुण्यास खराडी येथे स्थायिक झालो आहे|

            

                 सेवेत असल्यापासूनच मला विविध प्रकारचे लिखाण करणे व वाचनाची आवड आहे| पण वेLेअभावी तो छंद मी मनापासून पूर्ण वेL देत जोपासू शकलो नाही| आता सेवानिवॄत्तीनंतर बराचसा वेL उपलब्ध झाल्यामुLे माझ्या या छंदास गती प्राप्त झाली| हे करत असतांनाच एके दिवशी दुपारी सहजच पडल्या पडल्या घडयाLा कडे नजर गेली| घडयाLातील काटे फिरत असल्याचे पाहून कविता सुचली|

                              ‘घडयाLाचे काटे स्वत:भोवती फिरतात

                     पLभर विश्रांती‚ थोडा थांबा हे शब्द त्यांचे गावीच नसतात Èथॄ,|È

           अशी ही माझी चार कडव्यांची कविता मला स्वत:ला व इतरंाना पण आवडली| तेव्हा पासून मला कविता करण्याचा पण छंद लागला|माझ्या अशा अनेक कविता अजून अप्रकाशित आहेत| निवॄत्ती नंतर मी नाकारलेली बायकोÊ कमLाÊ आर्इची शिकवणÊ आशिर्वादÊ  दिनूÊ गोड गुपितÊ माहेरचा सुगंधÊ पेरूवाल्याची पोरÊ योगायोगÊ गLतीची पानंÊ धाडसÊ जागरणÊ लडिवाLा अशा अनेक मराठी कथा लिहिल्यात| धाडसÊ जागरणÊ लडिवाLा या नुकत्याच लिहिलेल्या कथा सोडता सर्व कथा विविध दिवाLी अंकांमधून व दर महिन्यास प्रकाशित होणा–या मासिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत| त्याच प्रमाणे नातीगोतीÊ सावर रेÊ महिलंाचे 21व्या शतकातील स्थानÊ आनंदी दिवसÊ मुंबर्इचा भिकारीÊ हसावे की रडावेÊ मीच माझा झाले चोर असे अनेक स्वअनुभवावर आधारित व बोधप्रद लघुलेख देखिल प्रकाशित झाले आहेत| मला समाज सेवेची देखिल आवड आहे|

 

              स्वत:बद्दल फार सांगणे नाही पण यथावकाश उभयतांच्या सवडीनुसार भेटीची इच्छा आहे|

 

Go Back

Comment