Please download here !!
माझेही मत
दि|08|02|13च्या सकाL मधील मुक्तपीठ मधील श्री|शांताराम वाघ यांनी मांडलेली वॄध्दांच्या सद्य स्थितीतील ‘विस्कटलेलं समाज जीवन’ ही कैफियत वाचण्यात आली|
या बाबतीत अजून बोलायचे झाल्यास खरोखरीच सद्य स्थितीत बहुतांशी वॄध्द समाजातील विस्कटलेल्या जीवना नुसार वंचितांचे जीवन जगत आहेत| काही दुर्दैवाने अकाली जीवन साथी सोडून गेल्यामुLेÊ तर काही समाज रचित अडचणींमुLे| समाजरचित अडचणींना बहुतांशीÊ काही अपवाद वगLताÊ हल्लीची तरूणपीढी कारणीभूत ठरेल असे म्हटले तर वावगे ठरू नये| त्यांच्या लेखी घरातील वॄध्द म्हणजे एक प्रकारची अडगL| म्हणून नार्इलाजास्ताव वॄध्दांना वॄध्दाश्रमाचा आधार घ्यावा लागतो| अपवाद वगLताÊ त्यात महत्वाची भुमिका हल्लीच्या तरूणी पार पाडत असल्याचे दिसते| त्यांना घरात सासू सासरे वा सासरची मंडLी यांच्या पासून दूर राहण्याची मानसिकता निर्माण झालेली आहे| मी माझा नवरा व माझी मुले असा त्रिकोणी अथवा चौकोनी संसारातच त्यांना गोडी वाटतेे| घरात वॄध्दांकरवी आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडावेतÊ त्यांच्या जिवनातील चांगल्या वार्इट अनुभवांचा लाभ घेत आपले जीवन पण सुखी व्हावे असे त्यांना वाटतच नाही| प्रसंगी असे देखिल ऐकिवात येते कीÊ काही ठिकाणी त्यांच्या अशा स्वभावाला माहेरच्या मंडLींचा पाठींबा असतो व त्यांच्या कडून मिLत असलेल्या अथवा मिLालेल्या प्रोत्साहनमुLे ते एकत्र कुटुंबातुन निघून विभक्त होतात| या पुढचे पाउल म्हणजे एकाच शहरात असून देखिल आपल्या मुलांना आजी आजोबाचे प्रेम वा सहवास मिLू नये अशी सुप्त भावना निर्माण झालेली दिसते|
आज काल आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिLावे म्हणून इंग्रजी अथवा मराठी माध्यमाच्या नामांकित चांगल्या शाLेत दाखल करण्याची फ^शनच निघाली आहे व ते बालकाच्या भविष्याचा विचार करता योग्य आहे| शाLेत भरतीचे वेLी शाLा व्यवस्थापनाकडून पालक व बालक दोघांची मुलाखत घेतल्यानंतरच शाLेत प्रवेश दिला जातो हे पण चांगलेच आहे| परंतु मुलाखती दरम्यान घरात आजी आजोबा आहेत का असल्यास त्यांचा सहवास व प्रेम मुलांना मिLते की नाही याबाबत विचारणा होत नसावी| मला वाटते या बाबतीत तरूण तरूणीं मध्ये शाLांकरवी देखिल उदबोधन क रावे| शक्य झाल्यास त्यांच्यासाठी वेगLी कार्यशाLेचे आयोजन करून वॄध्दांसंबंधी त्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न व्हावा| अजून शक्य असल्यास शाLेमध्ये बालक पालक व आजी आजोबां समवेत बालक–पालकÊ आजी आजोबा दिवसाचे एकत्रित आयोजन करावे जेणे की आजी आजोबांना देखिल आपल्या नातवाच्या बाल क्रिडांचा आनंद उपभोगता येर्र्इल| या संदर्भात सरकार दरबारी नुसते कायदे करून काही होणार नाहीत तर तरूणांच्या मनी वॄध्दांविषयीची मानसिकता कशी बदलता येर्इल हा विचार फार महत्वाचा आहे|
रत्नाकर वाणी
खराडी, पुणे|
आम्ही विदेश संचार वासी
आम्हा विदेश संचार सेवाÀविदेश संचार निगम लिमिटेड च्या सेवा निवॄत्त कर्मचा–याचा स्नेह मेLावा म्हणजे आम्हासाठी पर्वणीच असते| दरवर्षी वर्षातून एकदा सर्वांनी एकत्र भेटायचे| गप्पा गाष्टी दौरान आपली वैयक्तिक तसेच कौटुंबिक सुख दु:खे एकमेका सांगत आपसात वाटून घ्यायची| जुन्या गोष्टींनाÀआठवणींना पुन्हा नव्याने उजाLा देत भुतकाLात रमायचे| एकत्रित स्नेह भोजनाचा आनंद घ्यायचा व दिवस आनंदात घालवायचा हा स्नेहमेLाव्याच मुख्य उद्देश असतो| सेवा काL दरम्यान बहुतांश कर्मचारी व अधिकारी आर्वी व दिघी येथील वसाहतींमध्ये एक कुटुंब या नात्याने राहीलेत| प्रत्येक घरातील सुख दु:खात सर्वांचा सहभाग हा असायचाच| केवL प्रेम व भेटीच्या उत्कट भावनेने या मेLाव्यास उपस्थित राहण्यास उत्सुक असतो|
या स्नेह मेLाव्याचे विशेष म्हणजे स्नेहमेLाव्याची निश्चित तारीखÊ वेL व स्थान समजल्यावर सर्वजण एकमेकास कर्तव्यभावनेने कLवितात| केवL एका संदेशावर पुणे परिसरातील तसेच जिल्ह्मातील सर्व अधिकारी पदापासून चतुर्थ श्रेणी कर्मचा–यापर्यंत सेवानिवॄत्त झालेले विदेश संचारवासीÊ आपला कितीही महत्वाचा व्यग्र दिवस असोÊ सर्व कामे बाजूला सारून वेLेवर नियोजित स्थLी पोहचतात व आनंदाने सहभागी होतात|
असा हा स्नेहमेLावा नुकताच दि|5 एप्रिल 2013 रोजी आLंदी येथे वडगाव रोड वर सिध्दीविनायक मंगल कार्यालयात संपन्न झाला| कार्यक्रमाचे आयोजन विदेश संचारचे माजी सेवानिवॄत्त कर्मचारी सर्वश्री|आर|जी|वाणीÊ एस|व्ही|उदासÊ अशोक कानिटकरÊ निजाम तांबोLीÊ एस|जी| सिन्नरकरÊ एस|एस|वेदपाठक तसेच एस|एस|बागल या उत्साही मंडLींनी केले| कार्यक्रमास फार छान प्रतिसाद मिLाला| सर्व सेवानिवॄत्त अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते| सर्व उपस्थितांचे गुलाब पुष्प देउन स्वागत करण्यात आले| व्यासपिठावर वयाची पंचाहत्तरी पार केलेले श्री|बी|व्ही|मोडकÊ व श्री|आचार्य तसेच पी|जी|सरपोतदारÊ बी|जी|पुजारीÊ आर|एम|कुंभार इ|अधिकारीगण उपस्थित होते| आपल्या भावना व्यक्त करतांना व्यासपीठाधिन अधिका–यांनी भूतकाLातील आठवणीनाउजाLा देतÊ त्यांना त्यांच्या कार्यकाLात सर्वांकडून कसे सहकार्य मिLाले व कार्यकाL गोड कसा झाला हे थोडक्यातÊ मुद्देसुद व रंजित करून सांगितले| अधिकारीपद भूषवितांना कित्येक वेLेस कधी कर्मचारी हितविरोधी तर कधी त्यांच्या हितावह निर्णय घ्यावे लागलेत| सेवा काLात आम्ही पदाधिकारी तर आपण सर्व कर्मचारी या रूपात होतो| परंतु सेवानिवॄत्तीनंतर आज या क्षणी अधिकारी कर्मचारी असा भेद नसून सर्व जण केवL सेवानिवॄत्त कर्मचारी आहोत| या स्नेहमेLाव्यात भेटीगाठी व गप्पांव्यतिरिक्त मिLणारे निवॄत्तीवेतन तसेच वैद्यकिय फायदे लाभ या विषयावर पण सविस्तर मार्गदर्शनपर चर्चा झाली| सर्वांनी दुपारी 2 वाजता स्नेहभेजनाचा आस्वाद घेतला| श्री|निजाम तांबोLी यांनी सूत्र संचालन केले|
कार्यक्रमाच्या दुस–या सत्रात इतर सर्व कर्मचा–यांची भाषणे झाली| यात त्यांनी आपल्यावर काय प्रसंग ओढवले व ते कसे हाताLले हास्यविनोद करित कथन केले|
या स्नेहमेLाव्याची एक वाखणण्या जोगी गोष्ट म्हणजे येथे उतारवयात पाचविल्या पुजलेल्या व्याधीÊ दु:खÊ वेदनाचा सर्वांना विसर पडतो| सकाLी काहीशा दु:खीÊ कष्टीÊ चिंतीत चेह–याने आलेली व्यक्ती संध्याकाLी कLी खुलावी किंवा शक्तीवर्धक डोस मिLाल्यावर चेहरा उजLावा तसा प्रसन्नÊ हसरा चेहरा घेउन परत पुढच्या स्नेहमेLाव्याला भेटण्याची उमेद ठेवत घरी परतले| वयाची साठी पार केलेले सर्व यंग सिनिअर्सना पाहून संत श्रेष्ठ श्री|ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या पंक्तीची आठवण होते| “ इवलेसे रोप लावियले द्वारी वेलू तयाचा गेला गगनावरी|”
माझेही मत
शनिवार दि| 27|07|2013 च्या सकाL मधील “ ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीमध्ये वाढ”वाचण्यात आले|
सद्य परिस्थितीत खरोखरीच वॄध्दांना वंचितांचे जिवन जगावे लागत असल्याचे जाणवते| काही दिवसांपुर्वीची गोष्ट| संध्याकाLी फिरून परततांना रस्त्याच्या डाव्या बाजुने सुरक्षिरत रित्या मार्ग क्रमण करित होतो| त्याच वेLी मागून मोटरसायकलवर तीन तरूण आले आणि माझ्या उजव्या हाताला धक्का देउन वेगात निघून गेले| यात माझी काही चूक नसतांना जाता जाता मला “ ए थेरडया नीट चालता येत नाही कायÆ” असे उपरोधिक दोन शब्द सुनावून गेले| आजची तरूण पिढी सुपात आहे उद्या त्यांना पण जात्यात जावे लागणार आहे याची त्यांना कल्पना नाही| अशा प्रकारे वॄध्दांना समाजाकडून तसेच काही प्रमाणात कुटुंबाकडून देखिल उपेक्षिले जात आहे| वॄध्दंाना मान मिLत नाही| त्यांच्या दॄष्टीने मान सन्मान ही पुढची गोष्ट पण तत्पूर्वी किमान या उतारवयात दैनंदिन जिवनामध्ये थोडातरी मानसिक आधारÊ कौटुंबिक प्रेम मिLावे अशी प्रामाणिक व वाजवी अपेक्षा|
माझे मतेÊ शासनाने वॄध्दांसाठी कितीही कायदे केले तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही| मुLात समाजामध्ये तसेच कुटुंबामध्ये वॄध्दांबद्दल आदरÊ प्रेमÊ जिव्हाLा कसा निर्माण होर्इल यावर भर असावा| समाजामध्ये कुटुंबामध्ये समाजपरिवर्तन घडावे यासाठी गावांमध्येÊ शहरांमध्ये वॄध्दांशी निगडीत प्रश्न घेउन त्यावर छोटे मोठे सेमिनारÊ परिषद व चर्चासत्रे आयोजित करून वॄध्दांनी त्यांच्या तरूण वयात तसेच शरीरात ताकदÊ उमेद असेपर्यंत कलेले कष्टÊ मेहनत मिLविलेले ज्ञानÊ व अनुभव याची जनजागॄती करावी| ज्याप्रमाणे कुटुंब नियोजनÊ एडसÊ मलेरिया निमुर्लन सारख्या शासकिय योजना राबवून त्यात यश मिLविले त्याच प्रमाणे वॄध्दांच्या गरजा त्यांची सुरक्षितता त्यांची समाजाकडून कुटुंबाकडून होणारी अवहेलना थांबविण्यासाठी शासकिय योजना राबवावी|त्याचा प्रचार व प्रसार वर्तमान पत्रे दूरदर्शन सारखया प्रभावी माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोचवावा|
“ सोमÊ मंगLÊ बुधÊ गुॄरू¦ ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवॄध्द हेच आमचे गुरू
शुक्रÊ शनीÊ रवि ¦ वयोवॄध्दांची अवहेलना थांबवायलाच हवी|”
अशा प्रकारची वाक्ये तयार करून यातायात करणा–या वाहनावर लिहावीत|
शाLंामध्ये पालक दिन साजरे केले जातातÊ तेथे वॄध्दांच्या अनुभवांचा उपयोग आपल्या जिवनात कसा करून घेता येर्इलÊ बालकांवर वॄध्दांकडून सुसंस्कार कसे घडतीलÊ त्यांचा आदर कसा करता येर्इल इ|विषयी उदबोधन करावे| आजकाल तरूणींमध्ये मीÊ माझा नवरा व माझी मुले याची मानसिकता झाली आहे| त्यामुLे कुटुंबे विभक्त झालीत| पर्यायाने काही ठिकाणी आवश्यकता म्हणून तर काही ठिकाणी नार्इलाजाने वॄध्दांना वॄध्दाश्रमात जावे लागते| नातÊनातू व आजी आजोबांचे हे नातेच वेगLे| दुधावरची साय म्हणून आजी आजोबा देखिल आपल्या नातवांवर मुलांपेक्षा जास्त प्रेम करतात| अशावेLी बालके आजी आजोबा असून देखिल त्यांच्या प्रेमापासून वंचित राहतात| याबाबतीत तरूणींचे देखिल उदबोधन व्हावे|
सध्या प्रत्येक शहरात व काही खेडयापाडयांमध्ये देखिल महिलाच्या तनिष्का गटाद्वारे नारी शक्ती मोठया प्रमाणात एकत्र झाल्याची दिसते| या महिला गटांनी दारूबंदीÊ पाणी प्रश्नÊ अवैध व बेसनदशीर कामे इ|सारखी विधायक कामे हाती घेतलीत व त्यांना त्यात यश देखिल प्राप्त झाले आहे| हा नारीशक्तिचा विजय आहे| त्यांचे यश प्रशंसनीय आहे| त्यांचा अशा विधायक कामासाठी गुण गौरव करावा तेवढा थोडाच आहे| या गटाने गावातÊ शहरात जिथे जिथे कुटुंबात वॄध्दांचा अनादर अथवा उपेक्षिताची वर्तणूक मिLत असेल तेथे त्या कुटुंबातील सदस्यांशी व संबंधित वॄध्दांमध्ये समुपदेशकांच्या सहाय्याने आपसात सुसंवाद घडवून आणावा| तसेच विभक्त कुटुंबांच्या सदस्यांना एकत्र कुटुंब पध्दतिचे महत्व समजावून देत उदबोधन केले तर त्यांच्या यशाच्या मुकुटमध्ये अजून एक मानाचा तुरा खोवता येर्इल|