Menu

पुनरारंभ

199212

माझा नातू माझी वंश वेल

Please download here  !!                                      

                     माझा नातू माझी वंश वेल

       वारसा हक्काने आपल्यात काही तरी गुण आलेला असतो| माझ्या नातवंडाना माझ्या बद्दल जास्त माहित नसेल| माझा वटवॄक्ष साधा सुधा असेल पण पुढील पिढीसाठी तो दिप स्तंभ असेल| माझी वंशावL किती छान आहे|  साखLी साखLीने त्यात गुंतून पडणे मला तरी खूप आवडते| जन्मजन्मातून मी वहात आहे, वाहत जाणार आहे हा परमेश्वराचा कॄपा आशीर्वाद आहे| स्त्रीला जन्मापासून अनेक भुमिकातून जावे लागते| बालपणी सुंदर लाडिक मुलगी, नंतर कर्तव्य तत्पर संसाराची जबाबदारी पेलणारी पत्नी, लाडक्या बाLावर सुसंस्कार करणारी त्याचे योग्य संगोपन करणारी माता व सर्वात सुंदर व प्रेमL *दयाची, हLव्या मनाची आजी| माझा लाडका, हुषार व खेLकर नातू आर्यन मुLे मी आजी झाले| त्याच्या बाललीला मध्ये मी माझ्या मुलांचे बालपण जे त्यावेLी कामाच्या व्यापामध्ये अनुभवायचे राहून गेले ते अनुभवते आहेे|

पूर्वी सहजच आजीपण अनुभवायला मिLायचे व आनंद घेता येत होता| आम्ही त्या काLी नोकरी निमित्त गावापासून लांब गेलो होतो|  सासरी माहेरी भरपूर गोतावLा असल्याने बरेचदा गावी जाणे व्हायचे तेव्हा व मुलांना आजी आजोेबांचे प्रेम मिLायचे, सहवास लाभायचा| प्रत्य्ेाक बालकाला आपले आजोL प्रिय असते| आज देखिल मुले आजी आजोबांच्या प्रेमL सहवासाची आठवण काढतात| पण हल्लीचा काL तर फारच बदलला आहे| नोकरी व्यवसाया निमित्त मुले खुप लांब परदेशी सुध्दा गेलीत| काही मनाने तसेच शरिराने पण दुरावलीत| त्यामुLे नातवंडेही लांब गेली|

सुदैवाने आमचा 3 वर्षाचा नातू आर्यन पुण्यातच आहे| त्याला शाLेमुLे आमचेकडे येणे जमत नाही| पण महिन्यातून 2्र3 वेLेस आमचे कडे येतो| जेव्हां जेव्हां येतो खूप दांडगार्इ करतो, खेLतो, आमचेकडून लाड करवून घेतो| आम्हाला त्याचेशी खेLण्यात खूप आनंद मिLतो| त्याचे कोड कौतुक करण्यास मिLते| आम्ही खूप खेLतो| तो आजी होतो मला आर्यन व्हायला सांगतो| घडीभर आजी होउन माझी नक्कल करतो, माझे लाड करतो| मी औषध घेतांना माझे हात धरत म्हणतो, “घाबरू नको| मी आहे तुझ्याजवL|” त्यावेLेस त्याच्या डोLयात माया प्रेम ओथंबून वाहत असते| मी पण आर्यनची भुमिका करते| मग आम्ही घरात जिन्यामध्ये बसुन शाLा शाLा खेLतो| नेहमी प्रमाणे कधी तो आर्यन मी टिचर तर कधी मी आर्यन तो टिचर होतो| शाLेतील सर्व घटना व शिकविलेले सांगतो व तसे सर्व माझेकडून करून घेतो| शाLा खेLून झाल्यावर जिन्यातच सर्व खेLणी व इतर वस्तू मांडतो व मा^ल म^ाल खेLतो| भाजी आणतो| सर्वांची किंमत त्याच्या भाषेत “टेन रूपीज” (दहा रूपये) सांगतो| आम्ही वस्तू घेतो व परत देतो असा लटका व्यवहार करतो| यात त्याला फार मजा वाटते|                                

मला 15वर्षापासून मधुमेह आहे पण त्याच्या थोडयाशा सहवासाने का होर्इना मला खूप फरक जाणवतो| त्याला पण आमचे सहवासात खूप आनंद मिLतो| जणू आम्ही एकमेकांसाठी टा^निकच आहोत| आजी आजोबांच्या सहवासात नातवंडे आनंदी व बुध्दीवान होतात| मनुष्य स्वभावच आहे जे सहजा सहजी प्राप्त होते त्याची किंमत नसते परंतु जे मिLत नाही त्याची खूप ओढ लागते| आर्यनला खराडीचे घर म्हणजे खराडीच्या आजोबांचे घर खूप आवडते| मला सारखे त्या घरी घेउन जा असे म्हणत असतो| आम्हाला त्याचा सहवास खूप कमि लाभतो| पण तो जेव्हां जेव्हां आमचेकडे असतो त्या काLात आम्हास खूप मोठा परम आनंद मिLतो| निघतांना त्याचे डोLे पाणावतात ते नेहमी माझ्या डोLयापढे येतात| तो गेल्यावर त्याने घरभर पसरलेली खेLणी आवरतांना ती खेLणी मला निर्जीव वाटायला लागतात| 

त्याचे आमचे जन्मजन्मांतरीचे नाते या घराशी जोडले गेले आहे| माझी वंशवेल अशीच बहरत राहो हीच प्रभु चरणी इच्छा|  

सौ| रजनी वाणी|

Go Back

Comment