Please Download here !!
प्रकाशन : अपोलो टार्इम्स दिवाळी अंक 2011| सकाळ दैेनिक मुक्तपीठ| शब्दगांधार दिवाळी अंक 2013
प्रेमाणे पहा
माझे पुणे नगर प्रवासा दरम्यान अनेक वाहने मला ओव्हरटेक करून गेलीत| प्रवासात टाइम पास म्हणून त्या वाहनांचे मागे लिहिलेली सूचना व बोधवाक्ये मी वाचत होतो| हम दो हमारे दो,‚ बुरी नजर वाले तेरा मुंह काला‚ हे असंच चालायचं‚ तात्यांची पुण्यार्इ‚ आर्इचा आशिर्वाद, ओ के फिर मिलेंगे‚ सार्इट मिलनेपर जगह दी जाएगी‚ जलो मगर दिपक जैसे‚ प्रेमाणे पहा वगैरे वगैरे| घडीभर माझी करमणूक झाली|
पण‚ प्रेमाणे पहा या सूचना वजा वाक्यात प्रेमाणे या शब्दात ‘ने’ च्या ऐवजी ‘णे’ हे अक्षर का वापरले यावरून मी विचार करू लागलो| कदाचित प्रेम या शब्दाकडे वाचणा–याचे लक्ष वेधून घेण्याकरिता अथवा प्रेम या शब्दाचे महत्व कLण्याकरिता असावे| खरोखरीच प्रेम ही अशी वस्तु आहे का की, जी बाजारातून खरेदी करून आणली व आता प्रेम करा व प्रेमाने पहा असा सल्ला दिला| प्रेाम हे आपणहून निर्माण झाले पाहिजे| दोन व्यक्ति एकमेकाचे सहवासात आल्यावर त्यांची मने‚ आचार‚ विचार जुLल्यास आपोआप एकमेकाबद्दल सहानुभुति निर्माण होते व ओघानेच प्रेम देखिल उत्पन्न होते| त्यावेLी त्यांना कोणी सांगत नाही की प्रेम करा किंवा प्रेमाने पहा|
खरोखरीच मानवी जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर प्रेम हे मोठे व महत्वाचे माध्यम मानता येइल| प्रोम घ्यावे प्रेम द्यावे प्रेमाने जग जिंकावे| प्रेाम प्रत्येकाच्या )दयात असते फक्त ते जागॄत करावे लागते| संत महंत आपल्या सत्संगातून प्रवचनातून अनेक विध उदाहरणे देउन समाजात जन जागॄतीचे व आपसी प्रेम उत्पन्न करण्यास प्रवॄत्त करतात|
माता बालकाचे प्रेम‚ पिता पुत्राचे प्रेम‚ मित्र प्रेम‚ तरूण वयात तरूणांनी एकमेकावर केलेले प्रेम असे प्रेामाचे विविथ अंग आहेत| सर्वांचा उद्देश एकच जिवनात आनंद मिLविणे| माता बालकाला भरविते, त्याचे संगोपन करते, कोड कौतुक करते| तिच्या या प्रेमL कॄतीने माता बालकामथ्ये आत्मीयतेचे नाते व विशेष भावना निर्माण होते| यालाच प्रेम म्हणता येइल| माता बालकाला स्तनपान करतांना त्याच्याकडे मायेने न्याहाLून पाहत असते, त्याला कुरवाLीत असते| यामुLे बालकामध्ये मातेच्या कुशीत सुरक्षिततेची भावना व मातेबद्दल प्रेम निर्माण होते| हीच परिस्थीती गाय वासराची| गाय पण वासरू दूध पित असतांना त्याला मायेने चाटत असते| ती पण आपल्या वासराप्रति प्रेमच प्रकट करित असते| ही जनावरांना पण निसर्गाने दिलेली निसर्गदत्त देणगीच नव्हे काय Æ
पिता पुत्रांच्या प्रेमाबद्दल बोलायचे झाल्यास, पिता देखील आपल्या पुत्रावर तेवढेच प्रेम करतो जेवढे माता करते| परंतु संगोपन करतांना पित्यास प्रसंगी कठोर व्हावे लागते| याचा अर्थ असा नव्हे की पित्याचे प्रेम कमी आहे किंंवा ते आटले|
दोन मित्र किंवा मैत्रिणी यांचे जेव्हां आचार विचार व मने जुLतात तेव्हां कLत न कLत ते आपल्या सुर्खदु:खाच्या, एवढेच नव्हे तर खाजगी गोष्टी सुथ्दा एकमेकास सांगतात| वेLेनुसार सहाय्य केले जाते‚ घेतले जाते व जिवा भावाचे मित्र म्हटले जातात| त्यांच्यात आपसात निर्माण झालेला जिव्हाLा, प्रेम यास मित्र प्रेम म्हणतात|
तरूण तरूणींचे तरूण वयातील आपसातील प्रेम हे सर्व साधारण असेच असते परंतु वयपरत्वे शारिरिक व अन्य कारणाने आकर्षित झालेल्या प्रेमास थोडासा वेगLाच रंग आलेला असतो| केवL शारिरिक आकर्षणाने निर्माण झालेल्या प्रेमास प्रेम म्हणता येत नाही|
असे म्हटले जाते “अनेक योनीतून जन्म गेल्यानंतर दुर्लभ असा हा मानव जन्म प्राप्त होता,े व पूर्व जन्मीच्या संचितानुसार जीवनात बरे वार्इट क्षण या जन्मात भोगत असतो|” जे असेल ते असो त्यावर कोणी कीती विश्वास ठेवायचा हे ज्याने त्याने आपापले ठरवायचे|
या सॄष्टीमध्ये मानव प्राणी हुषार समजला जातो| कारण, त्याला निसर्गाने विचार करण्याची शक्ती प्रदान केली आहे| काय चांगले काय वार्इट याचा तो पूर्ण विचार करू शकतो व सारासार विचार करून योग्य निर्णय घेउ शकतो| या दुर्लभ मानवी जिवनाचा, खरा आनंद उपभोगायचा असेल तर एकमेकांबद्दल प्रेम, आदर बाLगणे व प्रेमाने वागणे हे नितांत जरूरीचे आहे| हाच संदेश जाता जाता ते वाहन सर्वाना देत तर गेले नसेलना Æ भले त्यात व्याकरणिक दॄष्टया काही चूक असेल|