Menu

पुनरारंभ

199236

प्रातिक्रीया

Please download here !!

 

प्रातिक्रीया

एका दैनिकामध्ये तरूणीवर ओढवलेला बिकट प्रसंग वाचण्यात आला| एक तरूणी पाश्चिमात्य गोष्टीचे अनुकरण करित एका तरूणाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये काही वर्षे सहवासात होती पण काही करणास्ताव आपसातील मतभेदांमुLे त्या तरूणाने तिचा त्याग केला| तिच्यावर अत्याचार केलेत| तिला एकाकी सोडून दिले| तिच्यावर बिकट प्रसंग ओढवला| तिच्या कडून झालेल्या चुकिबद्दल तिला आता वार्इट वाटत होते| या मुद्दयास धरून तरूणीची व्यथा व त्यावरील समुदेशकाराने केलेले समुपदेशन पण वाचण्यात आले| त्या तरूणीवर ओढवलेल्या बिकट प्रसंगाबद्दल तिच्या प्रती पूर्ण सहानुभुती आहे| तिला या प्रसंगातून लवकरात लवकर योग्य मार्ग मिLो व तिचे उर्वरित जिवन सुखा समाधानाचे जावो| हीच सदिच्छा| असे प्रसंग समुपदेशाने लवकर सुटतील अXाी अपेक्षा| समुपदेशन झाले खरेÊ परंतु या पेक्षा त्या तरूणीवर हा प्रसंग का ओढवला व कसा ओढवला याचा विचार करणे देखिल तितकेच महत्वाचे ठरेल|

आजकालची तरूण पीढी सुशिक्षित व प्रगल्भ विचाराची व त्या अनुषंगाने आधुनिकतेचा विचार करीत अशा काही बेजवाबदार घटना त्यांच्या कडून होत असतात| यामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त पालकांकडून होणारे दुर्लक्षÊ म्हणून काही अंशी पालक देखिल कारणीभूत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये|

प्रेम हे पवित्र मानले जाते| ते )दयातून पाझरावे लागते| मनाने स्विकारून मनापासून केलेले असावे| ज्यावेLी दोन व्यक्ती एकत्र येतात त्यांची मनेÊ आचारÊ विचार जुLतात|त्यावेLी आपोआप एकमेकाबद्दल प्रेम व सहानुभुति निर्माण होते| अशावेLेला त्याच्यावर प्रेम करा असे कोणास सांगावयाची गरज नाही| यालाच खरे आंतरिक प्रेम म्हणता येर्इल्,ा| परंतु आजकालच्या पिढीमध्ये या अंातरिक प्रेमाची वाणवा असल्याची जाणीव होते|

हल्लीच्या तरूण पिढीची प्रेमाची भाषा व त्याचे तंत्र वेगLेच वाटते| केवL प्रथम भेटी मध्ये झालेली नजरानजरÊ त्यानंतर एकाद दूसरी कोठेे तरीÊ कशी तरी झालेली भेट यातच त्यांच्या प्रेम भावना उफाLून येतात व प्रेम जमतेे| अशा प्रेमाला शरीराच्या बाह्मरूपावर भाLून झालेले वरपांगी प्रेम म्हटले तर वावगे ठरू नये| प्रेमसंबंध वाढण्यापुर्वी अथवा वाढविण्यापुर्वी किमान समोरच्या व्यक्तिची मानसिकÊ बौध्दिकÊ वैचारिकÊ कौटुंबिक इ|परिस्थिती तसेच त्याचे विचारÊ आचार लक्षात घेणे फार गरजेचे आहे| अशा प्रेमात आंधLे झालेले प्रेमांध प्रेमीÊ समाजात वावरतांना रस्त्यावरÊ बागेमध्य्ेा अथवा सार्वजनिक ठिकाणी विनासंकोच मुक्त प्रेमाराधना करित असल्याचे सर्रास दिसते| आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत| आपल्या कडे अन्य कोणाचे लक्ष आहे याची त्यांना भ्राांत नसते| अशा बेजबाबदार वर्तणुकिमुLेच बलात्कारासारख्या घटनांना खत पाणी मिLते| यांच्या अशा वर्तणुकिची घरी पालकांना कल्पना असतेच असे नाही| यांच्यावर कोणाचा धरबंधपण नसतो| यदाकदाचित कोणी समंजस सामान्य व्यक्तिने समजाविण्याचा प्रयत्न केल्यास “आम्हाला अडविणारे तुम्ही कोण Æ” असा प्रतिप्रश्न करून समजाविणा–याची बोलती बंद केली जाते| प्रेमात विवाहाच्या आणाभाका घेतल्या जातात| आणा भाका घेण्यापुर्वी आपली कौटुंबिक परिस्थितीÊ आपले कुटुंबÊ आपले पालकÊ त्यांच्या आपल्या विषयी आशा आकांक्षाÊ तसेच ज्यांच्या समवेत आपण गेली 20–25 वर्षे घालविली त्यांचा जरा देखिल विचार केला जात नाही| सहाजिकच मनाचा मोठेपणा दाखवित व पाल्यांच्या ह+ापायी व आनंदाखातर नार्इलाजास्ताव पालक प्रेमविवाहास परवानगी देतात|

याशिवाय हल्लीच्या तरूण पिढीमध्ये पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करण्याकडे कल वाढल्ेाला दिसतो| आपण भारतीय आहोतÊ आपली भारतीय संस्कॄती थोर आहे या विचारांना तिलांजली देत लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या पाश्चिमात्य गोष्टीचे अनुकरण केले जाते| याचे परिणाम पण दिसून येतात| तात्पर्य प्र्रेम करतांना अथवा लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या पाश्चिमात्य गोष्टीचे अनुकरण करतांना तरूण तरूणींनी सारासार विचार करावा व पुढचे पाउल टाकावे| हिच प्र्रमाणिक अपेक्षा| यापुढे अजून कोणाची फसवणूक होउन कोणी बLीचा बकरा बनू नये म्हणून हा पत्र प्रपंच| 

Go Back

Comment