Please Download here !!
प्रकाशन : “दु:ख माझे मला” पुस्तक सप्टें. 2013.
दु:ख हे माझे मला.
सुख दु:ख हे मानवी जिवनाच्या पाचवीलाच पुजलेले आहे. सुख जवापाडे तर दु:ख पर्वता एवढे आहे. सुख–दु:खा विना जिवनास अर्थ नाही. जसे उन – सावली, दिवस–रात्री एक मेकास पुरक आहेत. जसे उन्हाशिवाय सावलीचे व दिवसा शिवाय रात्रीचे महत्व कळत नाही तद्वत दु:खा शिवाय सुखाचे महत्व कळत नाही. रात्रीच्या काळळोखाचा पडदा फाडून दिवस उगवतो व दिवस मावळून पुन्हा रात्र अवतरते. तसेच सुख दु:खाचे आहे. सुखा नंतर दु:ख व दु:खानंतर सुख असे हे कालचक्र्र अव्याहतपणे फिरत असते. सुखात हुरळून न जाणे व दु:खात गुरफटून न राहता जिवन जगत राहणे हीच खरी जिवनाची कला आहे. मी आता वयाची साठी पार करून आयुष्याची दुसरी इनिंग ख़ेळत आहे. इतरांप्रमाणे माझ्या आयुष्यात देखिल आज पर्यंत अनेक सुख दु:खाचे चढ उतार आले. वेळोवेळी प्रसंगानुरूप निर्णय घेउन जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करित आलो. कधी यश तर कधी अपयश पचवित आलो. अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधीत आलो. अपयश व अपूरी स्वप्नपूर्ति हेच माझे दु:ख.
१९६८ साली माध्यमिक शालांत परीक्शा पास झालो तेव्हा १६–१७ वर्षाचा तरूण असेन. भारतीय सेनेत सामिल व्हावे अशी माझी तीव्र इच्छा. सैन्यात भरतीसाठी शारिरीक क्षमता तसेच इतर अनेक चाचण्या पार करणे फार महत्वाचे. शारिरीक क्षमते मध्ये वजन, उंची, छाती फुगवून व न फुगवता अशा अन्क गोष्टी पाहिल्या जातात तर इतर चाचण्यामध्ये लांब उडी, उंच उडी, धावणे याची चाचणी घेतली जाते. मी भरतीच्या दिवशी सकाळी ७.३० वाजताच घोरपडी, पुणे येथे सैन्य भरती केंद्रामध्ये उपस्थित झालो. मजसमान अनेक इच्छुक तेथे उपस्थित हेाते. सर्वप्रथम शारिरीक क्षमतेसाठी सर्वांना अंगातील शर्ट काढून रांगेत उभे राहण्याची आज्ञा झाली. सैन्य अधिकारी रांगेतील प्रत्येकाची शारिरीक तपासणी करत योग्य उमेदवारास बाजूला करित मजपर्यंत आले. वयाच्या मानाने माझी छाती पूर्ण न भरल्यामुळे माझ्या छातीला मध्यभागी असलेल्या खडडयात हातातील पेन टोचत म्हणाले “ जाओ छाती भरके आओ” मला त्यांचे म्हणणे न उलगडल्यामुळे मी परत विचारले तर म्हणाले “ छाती पूर्ण भरली नाही, छातीवरील खडडा भरल्यावर नंतर पुन्हा या. ” पहिल्याच फेरीत अपयशी ठरल्याने नाराज झालो. ते माझे दु:ख आज देखिल माझ्या मनात सळत आहे. मजसमान अनेक दु:खी उमेदवार पण असू शकतील. पण माझे दु:ख ते फक्त माझे दु:ख यात कोणाचा सहभाग नाही.
यावर तरूण पिढीला मला एवढेच सांगावेसे वाटते की, मी निर्व्यसनी असून देखिल शारिरिक दॄष्टया अपात्र ठरलो. तरूण वयातच शरीर कमविता येते. कोणत्याही प्रकारची व्यसने करून शरीराचा नाश करू नका. आपल्या युवा शक्तीचा देशाला व समाजाला फायदा होउ द्या. माता पिता व घराण्याचे नाव उज्वल करा.
वैवाहिक जिवनात कार्यालयीन कामकाजातील व्यस्ततेमुळे अनेक वेळा कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले. वेळेचे बंधन, वाढती महागार्इ व महिना अखेरीस मिळणारा तुटपुंजा तीन आकडी पगार यामुळे पत्नीची व मुलांची हौस मौज व बालहट्ट पुरविण्यात काही अंशी कमि पडलो. याची खंत मनी आहे. हे माझे एकटयाचे वैयक्तिक दु:ख आहे. यात कोणाचा सहभाग नाही. या दु:खात सूख म्हणजे, एवढे असून देखिल माझ्या सर्व कुटुंबियांनी समजूतदार पणे माझ्या अडचणी व्यथा जाणून मला साथ दिली. अशी समजूतदार पत्नी व मुले सर्वांना मिळॊ.
परंतु आज कालची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. पैशाची किंमत वाढली आहे. रोजंदारी काम करणारा मजूर देखिल तीन आकडी रोज मिळवितो. सुशिक्षित व आय. टी. क्षेत्रात काम करणारी व्यक्ति दर महिन्याला किमान 25 ते 30 हजार रूपये महिन्याची कमार्इ करते. त्या प्रमाणात थोडीशी महागार्इ, बदलत्या जिवन शैलीमुळे वाढलेल्या दैनंदिन गरजा, जागतिकीकरणाच्या वाहणा–या वा–यांमुळे निर्माण झालेल्या स्पर्धेत स्वत:चे स्थान टिकविण्यासाठी करावी लागणारी शर्यत या गोष्टी अनुषंगाने आल्यात याची पण नोंद घ्यायला हवी. एवढे असून सुध्दा तरूणार्इला सांगावेसे वाटते की, कीतीही मोठे झालात, तरी कुटुंबाप्रती कर्तव्य भावनेने कुटुंबाला वेळ द्या. त्यांच्या गरजा लक्षात घेउन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणे की, पुढे जाउन तुमच्यावर दु:खी होण्याची वेळ येणार नाही.
पुर्वी सख्खे, सावत्र, चुलत अशी सर्व कुटुंबे एकत्रित प्रेमाने व गुण्या गोविंदाने नांदायची. एकाचे दु:ख ते सर्वांचे दु:ख, एकाचे सूख ते सर्वांचे सूख असायचे. एकत्रित कुटुंबपध्दतीमुळे एकमेकात संवाद असायचा. घरात सुख शांतता नांदायची. सर्वांना एकमेकाचा आधार असायचा. पण हल्ली बदलती जिवन शैली, बदलते जिवनमान, एकल कोंडा स्वभाव, क्वचित प्रसंगी काळाची गरज म्हणून एका क़ूटूबाची चार कुटुंबे झाली. नाते दुरावले. सुखाला पारखी झाली. एकाच शहरात, एकाच गावात पाच सात किलोमिटरच्या परिघात राहून एकमेकाच्या गाठी भेटी महागल्या. संवाद तुटला. आजी आजोबांवर निस्सीम प्रेम करणारी नातवंडे दुरावली. हे सर्वसाधारण सगळीकडे दिसणारे चित्र. याला मी कसा अपवाद असणार. हेच माझे दु:ख. यात माझे शिवाय अन्य कोणी सहभागी नाही.
आजच्या पिढीला सांगावेसे वाटते की, बाबांनो एकत्र या. कुटुंबाला प्रेम द्या. त्यांचे प्रेम मिळवा. सुखात रहा. अन्यथा पुढे जाउन तुम्हाला देखिल अशाच विभक्त कुटुंब पध्दतीच्या दु:खाशी सामना करावा लागेल. यात पण तुमचे दु:ख ते तुमचेच दु:ख असेल. यात कोणी भागीदार नसणार. या विषयास अनुसरून, मिळते जुळते मी केलेले काव्य. येणे प्रमाणे.
विभागणी
विभागणी‚ विभागणी‚ विभागणी ॥धृ॥
विभागणी होते मालमत्तेची
विभागणी होते जमिनजुमल्याची
विभागणी होते पैशा अडक्याची
विभागणीने ऐहिक सुख लाभते
परंतु मने दुभंगुन आपसी प्रेम लोपते ॥१॥
विभागत नाही झालेली शिक्षा
विभागत नाही शारिरिक दु:ख‚ पिडा
विभागत नाही मानसिक द:ख
शिक्षा‚ दु:ख हे ज्याचे त्यानेच भोगायचे असते
त्यात आर्इ‚ वडिल‚ भाउ‚ बहिण‚ बायको‚ मुले
कोणीच भागिदार नसते ॥३॥
विभागणीचे फायदे कमि‚ अधिकच तोटे
एक संघता यातच सुख आहे मोठे
एक काडी मोडते‚ मोळी मोडणारास मोडते
गोष्ट आहे सोपी समजणारास समजते
सुज्ञ मनवा तंत्र हे जाणून घे
एक संघ रहा हीच तुला विनवणी ॥४॥
परत थोडक्यात सांगायचे झाल्यास शारीरीक व मानसिक दु:ख हे ज्याचे त्यानेच भोगायचे असते. यात दुसरा कोणी भागीदार होउ शकत नाही.