Please download here !!
गोटीने केली खोटी
म्हणतात बाळ हट्ट‚ राज हट्ट व स्त्री हट्ट हे तीनही हट्ट पुरवावेच लागतात. त्यातलाच हा प्रकार केवळ बाळ रडतंय व त्याचा हट्ट तीच गोष्ट पााहिजे या हट्टापायी मातेचा पुनर्जन्म झाला. त्याची ही घडलेली करूण कहाणी. दरवर्षी श्रावणात नागपंचमीचा सण आला की हमखास आठवण येते ती या घटनेची.
साधारण १९६० सालची घटना. नगर जिल्हयात कोपरगांव तालुक्यात साकरवाडी येथे दि गोदावरी शुगर मिल्स लिमिटेड साखर कारखाना होता| तेथे आम्ही कंपनीच्या आवारातच कारखान्यातील कामगार व अथिकारी वर्ग यासाठी असलेल्या क्वार्टर्स मध्ये रहात होतो| आमच्या क्वार्टर जवLच कंपनीचे जुने गेस्ट हाउस होते| तेथे छोटया छोटया खोल्यांमध्ये कंपनीच्या हंगामात उत्तर प्रदेशमधून आलेले हंगामी कामगार हंगाम संपेपर्यंत एकएकटे रहात होते| गेस्ट हाउसला लागून एक पञ्याची खोली होती| खोलीजवL सांडपाण्यावर आLू ‚ पुदीना व गवती चहा फार छान पैकी जमला होता| त्या पञ्याच्या खोलीमध्ये 35 वर्षीय शांताबार्इ नामक परिस्थीतीने गांजलेली परित्यक्ता आपल्या 4 वर्षाच्या मुलासह रहात होती| घरो घरी धुणी भांडयाची कामे करून ती आपला उदरनिर्वाह करित होती|
श्रावण मास नागपंचमीचा आदला दिवस| संध्याकाLी सर्व घरांची कामे आटोपून ती घरी परतली व घरातील कामास लागली| आLूच्या बेटाजवLच ती भांडी घासण्यास बसली| बाजूला तिचा मुलगा पण काचेच्या गोटयांशी खेLत होता| खेLता खेLता गोटया आLूच्या बेटामध्ये गेल्या व बाL रडू लागले| आर्इने त्याची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला| दुसरे खेLणे दिले| पण त्याचे रडणे थांबेना| तो त्याच गोटयांसाठी ह+ धरून बसला| एवढया अंधारात गोटया सापडणे तर कठिणच होते| पण अंधुक प्रकाशात तिला दोन गोटयांसारखे चकाकणारे गोLे दॄष्टीस पडले| गोटया सापडल्याच्या समाधानात तिने त्या काढण्यासाठी हात घातला|
पण हाय रे देवाÑ गोटया तर दूरच राहिल्या पण एक मोठा फूत्त्कार टाकित झाडीमध्ये विराजमान झालेल्या नागराजाने एका क्षणात त्या मातेच्या हाताला डंख मारला| शांताबार्इ घाबरली| दररून घाम फूूटला| दुस–या क्षणी ती घाबरून जमिनीवर कोसLली| काय झाले ते तिलाच क्षणभर उमजेना| ती रडू लागली| ओरडू लागली| तिचे ओरडणे ऐकून जवLपासचे सर्व भय्ये जमा झाले| पाहतात तर काय एक भला मोठा 6 फूटी काLा नाग समोर फणा काढून बसला होता| त्याला मारण्याच्या आत जमा झालेली गर्दी व आवाजाने त्याने केव्हा पलायन के,ले ते कोणालाच कLले नाही|
इकडे शांता बार्इची प्रकॄति बिघडत चालली होती| तिचा हात काLा निLा पडत होता| हLू हLू नागाचे विष शरिरात भिनू लागले होते| हात पक्का बांधणे ‚ कडू निंबाचा रस पाजणे ‚ लेप लावणे असे अनेक इलाज जो तो आपल्या परिने करू लागला| दरम्यान ही बातमी वा–यासारखी सर्व दूर पसरली| कंपनीचे म^नेजर श्री|आठवले ज्यांचे घरी ती काम करित होती त्यांचेपर्यंत ही बातमी पोचली| त्या वेLी ते कार्यालयातच होते| तत्त्परतेने त्यांनी कारवार्इ करित कंपनीच्या गाडीने तिला जवLच श्रीरामपूर येथे कामगार हा^स्पिटल मध्ये भरती करण्याची आज्ञा केली|
तिथे जार्इ पर्यंत रात्रीचे न} वाजले होते| शरिरात विष चांगलेच भिनल्याचे समजले| डा^क्टरांनी परिक्षणा नंतर परिस्थीती गंभीर असल्याचे सांगीतले| काही तासांचा अवधि जाहीर करित परमेश्वराचा हवाला दे}न उपचार सुरू केले|
परमेश्वरी कॄपेने अवधि टLला व सुदैवाने शांताबार्इचे प्राण वाचले| सोबत गेलेल्या सर्वानी सुटकेचे श्वास सोडले व दुसरे दिवशी सकाLी 11 वाजता तिला परत घरी आणले|
निराधार शांताबार्इच्या केवL प्रेमL व विनयशील स्वभावामुLेच तिच्या मदतिला सर्व धावून आले| अन्यथा तिचे वर दुर्धर प्रसंग ओढवला असता|
कोणी आपल्या रक्ताच्या नात्याचे असो वा मानलेल्या नात्याचे केवL प्रेम विनयशीलता व सुस्वभावमुLे जग ज्ंिांकता येते|