Menu

पुनरारंभ

199262

योगायोग

Please download here !!

प्रकाशन: कुंभश्री दिवाळी अंक २०११  

योगायोग

            मंगलकार्यालय निमंत्रित, सगे सोयरे व नातेवार्इकांनी पूर्ण भरले होते.दाराशी सनर्इ चौधडयाचे मंगल सूर निनादत होते. करवल्या आणि बालचमू नविन कपडे घालून उगाचच इकडे तिकडे फिरत होते. आपसात दंगामस्ती करित होते. गादीवर उडया मारून लोळण घेत होते. बिछायत विस्कटेल,नविन कपडे खराब होतील, कुणी रागावेल याची त्यांना चिंता नव्हती. यजमान पाहुण्यांची स्वागत सरबरार्इ करण्यात गुंतले होते. अभिवादन करता करता मध्येच थोडीशी चेष्टा मस्करी पण चालली होती. एकंदरित सर्व वातावरण मंगलमय, उत्साहाचे व आनंदाचे होते. वरात वाजत गाजत कार्यालयाचे दाराशी आली.  सवाष्णींनी नवरदेवाचे औक्षण केले व तो बोहल्यावर चढला. भटजींनी मंगलाष्टके म्हणत विवाह सोहळ्यास सुरवात केली. प्रत्येक मंगलाष्टकाच्या शेवटी ‘शुभ मंगल सावधान’ हे शब्द उच्चारताच वधूवरांच्या डोक्यावर अक्षता पडू लागल्या. शेवटचे मंगलाष्टक ‘तदेव लग्नं सुदिनंच देव ताराबलं चंद्र बलंच देव’ गाउन झाले. भटजींनी “शुभ मंगल सावधान” हे शब्द उच्चारताच ‘वाजंत्री बहू गलबला न करणे’ हा आदेश धुडकावून लावित बँड पथकाने एकच जल्लेाष केला, फटाक्यांची आतीष बाजी झाली व मोठ्या जल्लोशात सकाळी ११.४०च्या सुमुहुर्तावर विवाह संपन्न झाला.  वधूवर स्टेजवर त्यांच्यासाठी मांडलेल्या आसनावर आसनस्थ झाले. निमत्रितांपैकी काहींनी वधूवरांना शुभेच्छा आशीर्वाद व अभिनंदन करण्या करिता रांगा लावल्या तर काहींनी जण खाली भोजन कक्षाकडे धाव घेतली. ज्याची त्याची आपली एकच घार्इ भोजनकक्ष लहान तर निमंत्रित जास्त असे व्यस्त प्रमाण असल्यामुळे मेळ बसत नव्हता.  घार्इने परतणा–यांसाठी बफे पध्दतीने जेवणाची वेगळी व्यवस्था केली होती.

             निळकंठ राव व नलिनीतार्इंना लग्न लावून लगेचच परतायचे असल्यामुळे बफे साठी रांग लावून जेवणाचे ताट घेतले. निळकंठराव जेवणाचे ताट घेउन जागेच्या शोधात असतांना कुणाचा तरी धक्का लागला ते पडता पडता सावरले. परंतु ताटातील गरम आमटी व भात पायावर सांडल्याने त्यांचा पाय भाजला शिवाय कपडे देखिल खराब झाले. अशातच एक पंचवीशीतील तरूण पुढे सरसावला व त्यांना आधार देत म्हणाला,

            “काका तुम्ही येथे बसा मी तुमचे ताट आणतो.” असे म्हणत त्याने त्यांचेसाठी ताट वाढून आणले.

ताट हातात देत त्याने विचारले “तुम्हाला काही इजा तर झाली नाही ना ?”

           “नाही, फक्त गरम आमटी सांडल्यामुळे पायाची बोटे भाजल्या सारखी वाटतात एवढेच ” निळकंठराव नी उत्तर दिले. तरूणाने ताबडतोब तांब्याभर गार पाणी आणून त्यांच्या पायावर ओतले व म्हणाला, “आता तुम्हाला बरे वाटेल बघा.”

          एवढे करून तरूण गर्दी मध्ये केव्हा दिसेनासा झाला ते कळलेच नाही. त्यामुळे त्याचे आभार मानण्याचे पण विसरले. निघतांना त्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी झाला. शेवटी त्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला पण मनात रूखरूख मात्र राहिली. कार्यालयापासून थोडे अंतर चालून गेल्यावर रस्ता पार करित असतांना चौकातच भर वेगात येणा–या एका टेंपोचा नलिनी तार्इंना जरासा धक्का लागला व त्या खाली पडल्या. सुदैवाने थोडीशी खरचट व मुकामार या पलिकडे मोठी दुखापत झाली नाही. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमा झाली. निळकंठराव मदतीच्या अपक्षेने सर्वांकडे पाहत होते पण कोणी पुढे येर्इना. टेंपोचालक टेंपोसह केव्हा पसार झाला ते कोणालाच कळले नाही. अशातच थोड्या वेळापूर्वी मंगल कार्यालयात त्यांना मदत केलेला तोच तरूण सुदैवाने तेथे आला.  त्याने ओळखले व कोठलाच विचार न करता लगेच रिक्षा बोलावून काकुंना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. निळकंठरावांची मनस्थिती घाबरलेली असल्याने त्या तरूणास ओळखले नाही. डॉक्टरांनी काकूंची तपासणी केली व कोणतीही गंभीर इजा नसल्यामुळे केवळ निरीक्षणासाठी एक दिवस हॉस्पिटल मध्ये रहाण्याचा सल्ला दिला. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर काकांच्या विषयी विचारपूस करून “आपल्या कोणी नातेवार्इकांना अथवा जवळच्या व्यक्तिला कळवायचे काय ? ” तरूणाने विचारले. निळकंठरावांनी खिशातील डायरी काढून आपली कन्या, मनिषाचा नंबर देत तिला बोलविण्याची विनंती केली. तरूणाने फोनवर आपला अल्प परिचय देत थोडक्यात सर्व हकिकत सांगितली. थोडीशी दुखापत या पलिकडे काही गंभीर दुखापत नाही याची कल्पना देत फोन ठेवला.

          मनिषा बँकेत आपल्या कामात मग्न होती. फोन वरील बोलणे ऐकून घाबरली व बॅंकेतील आपल्या सहर्कायासमवेत १५ — २० मिनिटातच हॉस्पिटल मध्ये हजर झाली. येताक्षणीच चौकशी कक्षाजवळ आर्इची चौकशी करू लागली. त्यावेळी तो तरूण तेथेच उभा होता. हिच मनिषा याची खात्री करित म्हणाला, “ मी अविनाश परचुरे मीच तुम्हाला फोन केला. घाबरू नका. तुमच्या मातोश्री दुस–या मजल्यावर खोली नं २०४ मध्ये आहेत व पूर्णतया ब–या आहेत.  काळजी करण्याचे काहीच कारण नाही.” त्याच्या बोलण्याकडे फारसे लक्ष न देता ती भराभरा जिना चढून वर गेली. आर्इला कधी भेटते न कधी नाही असे तिला झाले होते.

        आर्इला पाहताच तिच्या जवळ जाउन तिने अधिरतेने काळजीच्या सुरात प्रश्नांची सरबत्ती चालू केली. “आर्इ कशी आहेस तू? काय झाले तुला ? ठिक आहेस ना ?”  वगैरे वगैरे. मध्येच निळकंठरावांनी तिला थांबवत सर्व खुलासा केला व तिच्या प्रश्नांची उत्तरे दिली.  सर्व ठिकठाक झाल्याचे पाहून अविनाशने त्यांचा निरोप घेतला.  जातांना काकुंना “लवकर ब–या व्हा ! ” अशा शुभेच्छा देण्यास विसरला नाही.  आता पण तो जाण्या पूर्वी त्याची पूर्ण ओळख करून घेण्याचे निळकंठराव विसरले. दुसरे दिवशी अविनाश ने हॉस्पिटल मध्ये काकूंची तब्येतीविषयी विचारणा करणेसाठी फोन केला असता त्यांना सकाळीच डिस्चार्ज देउन सोडल्याचे समजले.

        आर्इची प्रकृति ठिक नसल्यामुळे मनिषा सुटीवर होती. दुपारी घरी निवांत असतांना तिचा मोबार्इल वाजला. तिकडून विचारणा झाली, “हा मनिषाचा नंबर आहे काय ?”

        “होय. बोलतेय. आपण कोण?” मनिषाचा प्रतिप्रश्न. 

        “मी अविनाश बोलतोय. सकाळी हॉस्पिटल मध्ये फोन केला होता.  काकूंना डिस्चार्ज दिल्याचे समजले. आता त्यांची प्रकृति कशी आहे ?”                                                                             

        “ठीक आहे. नुकतीच औषध घेउन झोपलीय.” मनिषाने उत्तर दिले.                                                                                   “ माफ करा. पण आपण कोण, मी आपल्याला ओळखले नाही. आपली ओळख ?” मनिषाचा प्रतिप्रश्न.

         “मी अविनाश परचुरे काल आपण हॉस्पिटल मध्ये भेटलो होतो. मी काकूंना हॉस्पिटल मध्ये दाखल केले व तुम्हाला कळविले.” इति अविनाश.

         “ असं होय. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. ” मनिषा म्हणाली.

          “अहो,त्यात काय एवढे माणसाने माणसाची मदत करायची नाही तर कोणाची. मी तर माझे एक कर्तव्य केले”. अविनाश पुढे गोष्ट वाढवित म्हणाला.  

         “अहेा तुमच्या मुळेच तर आर्इला वेळेवर उपचार मिळाले हे काय कमि आहे. ” मनिषा म्हणाली.

         विषयानुरूप गप्पा झाल्यावर घराचा पत्ता देत व घरी येण्याचे आमंत्रण देत मनिषा म्हणाली,  “या एकदा घरी.”  त्याने पण सवडी नुसार येण्याचे आश्वासन देत फोन ठेवला.

         त्यांचे संभाषण संपते न संपते तोच आईने घरातूनच आवाज दिला, “ मने, कोण आहे गं ? कोणाचा फोन आहे?”

         “ अगं, कोणी अविनाश परचुरे होते. तुम्हाला काल मंगल कार्यालयात भेटलेले. त्यांनीच तुला हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. तुझ्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी फोन केला. ” मनिषा म्हणाली.

        “ अगं, मग घरी बोलवायच त्यांना.” आई म्हणाली.

        “ हो सांगितलं. येतील सवडी नुसार.” मनिषा म्हणाली.

        अविनाशचे गोड बोलणे व सहकारी वॄत्ती मनिषाला आवडली.  नंतर त्यांचे अनेकवेळा फोनवर संभाषण होत राहिले. भेटी झाल्या व एकमेकात केव्हा व कसे गुंतत गेले ते उभयतांना पण कळलं नाही.  दिवसा गणिक चंद्राच्या कले प्रमाणे त्यांच्या प्रेमाला बहर येत गेला. आपसी भेटी वाढत गेल्या. पण याची उभयतांच्या कुटूंबाला कधी जराशी देखिल कुण कुण पण लागली नाही.  

         एके दिवशी संध्याकाळी एकत्र जेवणास बसले असता मनिषाच्या लग्नाचा विषय निघाला. बोलता बोलता सांगून आलेल्या स्थळांबाबत चर्चा झाली. परंतू मनिषाने त्यामधे भाग घेतला नाही किंवा प्रतिक्रीयाही दिल्या नाहीत. फक्त अविनाशचा फोन येउन गेल्याचा म्हणाली. त्यावेळी निलीमा तार्इं आपल्या भावना मनमोकळ्या करित म्हणाल्या, “ खरोखरीच अविनाश छानच मुलगा आहे. किती मदत केली आपल्याला. असाच हुषार, होतकरू, सुशिक्षित व सुस्वभावी जावर्इ मिळाला तर कीती बरे होर्इल नाही.”

       “ मिळेल, जरूर मिळेल, तिच्या भाग्यात असेल तर असाच जावर्इ मिळेल.  या योगा योगाच्या गोष्टी आहेत. योग जुळून आल्यावर सर्व काही सुरळीत होर्इल. काळजी करण्याचे कारण नाही. फक्त योग यायला पाहिजेत. ” निळकंठरावांनी पुस्ती जोडली.    

               या घटनेला एकाद वर्ष लोटले असेल. असेच एका रविवारी निळकंठराव सकाळी पेपर वाचत असतांना फोनची घंटी वाजली. निळकंठरावांनी फोन उचलला.  तिकडून आवाज आला “हॅलो मी नाशिकहून केशव परचुरे बोलतोय ओळखले कां? ”

              “कोण परचुरे ?” निळकंठरावांचा प्रतिप्रश्न.

              “अरे, आपण नाशिकला गोदावरी कॉलेजमध्ये बरोबरच शिकत होतो. आठवते का ? ” पलिकडून पत्युत्तर आले.

            जुन्या स्मृती चाळवल्या गेल्या. त्याला उजाळा देत निळकंठ राव भारावले. भावूक होउन हर्षोल्हासाने फोनवर त्यांच्याशी एकेरी भाषेतच म्हणाले,”अरे हो केशा कसा आहेस तु? आणि एवढया वर्षांनंतर कशी काय आठवण झाली रे ?”

            “मी ठीक आहे”.  कालच मला यशवंत फडके कडून तुझा हा नंबर मिळाला.  तु पुण्यास असल्याचे समजले. माझा पुतण्या पुण्यास सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याला भेटावयास पुढच्या महिन्यात पुण्यास येण्याचे म्हणतो. म्हटले बघू हा फोनवर तरी भेटतोय का ?” इति केशव.

              “हो, ये ना. येण्यापुर्वी फोन करून ये. म्हणजे मी त्यावेळी काठे जाणार नाही” निळकंठरावांनी आपला मोबाईल नंबर व पत्ता देत फोन ठेवला.  

              साधारण महिना भराने सकाळी 10चे सुमारास दारावरची बेल वाजली.  मनिषाने दार उघडले. दारात पांढरा नेहरू शर्ट व पायजमा घातलेला पन्नाशीचे गॄहस्थ सपत्निक उभे होते.

              “निळकंठ कुळकर्णी येथेच राहतात काय ?” गॄहस्थांनी विचारले.

               “होय,”मनिषाने उत्तर दिले.

               “मी केशव परचुरे नाशिकहून आलोय.”  गॄहस्थ म्हणाले.

         मनिषाने दार उघडले. सोफ्याकडे अंगुली निर्देश करित म्हणाली, “या नं बसा” असे म्हणत घरात गेली व बाहेर केशव परचुरे आल्याची बाबांना वर्दी दिली.  

              काही क्षणातच निळकंठराव बाहेर आले. केशवला पाहत विस्मय करित म्हणाले, “अरे केशवा तू? , कधी आलास? येण्या आधी फोन तरी करायचास की.”

             “मी काल सकाळीच आलो. माझा पुतण्या येथे आहे, त्याच्या घरी होतो” केशवने उत्तर दिले. थोडयाच वेळात नलिनीतार्इ व मनिषा हातात पाण्याचा ग्लास घेउन प्रवेश करते झाले. निळकंठरावांनी मनिषा व नलिनीतार्इंची ओळख करून देत म्हणाले “या आमच्या सौ. व ही माझी एकुलती एक कन्या मनिषा.”

             तव्दत केशवरावांनी देखिल आपली व पत्नी सौ.निर्मलाची ओळख दिली. मनिषाला बँकेत जाण्याची घार्इ असल्यामुळे ती निघून गेली. गत आठवणी व काही कौटुंबिक विषयावर गप्पा झाल्या. बोलता बोलता केशवराव सहजच म्हणाले “  मनिषाच्या लग्नाबद्दल काही विचार झालाय का नाही.” “होय, काही स्थळे आली होती पण काही ठिकाणी पत्रिका जुळत नाही, शिक्षण कमि, वयात बसत नाही अशा एक ना अनेक कारणे लांबत चाललंय. पण योग जुळुन आल्यास लगेच उरकून टाकू.” इति निळकंठराव. थोडयाफार गप्पाटप्पा झाल्यावर केशवरावांनी निरोप घेतला. जसजसा उभय घरांचा घरोबा वाढत होता तसतसे अविनाश व मनिषाचे प्रेमप्रकरण बारसे धरत होते.

              रविवारी निळकंठराव व नलिनीतार्इंच्या लग्नाची 30 वी वर्ष गाठ असल्यामुळे त्यांना जेवणाचे निमंत्रण देण्यास मनिषा शनिवारी बँकेतून परस्पर केशवकाकांचे घरी गेली. केशव काका व काकू कामानिमित्त बाहेर गेले होते. अविनाश एकटाच घरी होता. दारावरची बेल वाजल्यावर अविनाशने दरवाजा उघडला. मनिषाला दारात पाहून विस्मयचकित होत म्हणाला “ अरे,मनिषा तु इकडे कशी?”                                                  |                                         

             अविनाशला पाहून मनिषा पण विस्मयचकित झाली. ती पण तोच प्रश्न अविनाशला करित  म्हणाली, “ आणि तु पण इथे कसा ?”                                  

             “केशव परचुरे माझे काका आहेत व मी त्यांचा काका पुतण्या” अविनाशने नाते    स्पष्ट करून तिचा संभ्रम दूर केला.

             “अरे वा! काय सांगतोस काय? ” म्हणत तिने प्रतिसाद दिला.

             “बरं कसे येणे केले अचानक?” अविनाशने विचारले.

          “ अरे, उद्या आर्इ बाबांच्या लग्नाचा ३० वा वाढदिवस आहे म्हणुन तुम्हाला निमंत्रण द्यायला आले होते. ”

          “अभिनंदन.” अरे! पण अशी दारात का उभी. आत येना! “ अविनाश तिला घरात बोलावित म्हणाला.

           “ अरे हो. पण तू दारातून थोडा बाजूला सरकशील तरच मी आत येउ शकेल ना!” मनिषा हातवारे करित म्हणाली.  अविनाशची चूक लक्शात येताच तो बाजूला सरकला. ती  घरात आली व खुर्चीत स्थानापन्न झाली.  उभयतांच्या गप्पा रंगल्या. ती निघणार इतक्यात काका आणि काकू आले.  मनिषा कडे पाहत काकूनी विचारले, “इकडे कसे येणे केले अचानक.”

         “उद्या आर्इ बाबांच्या लग्नाचा ३० वा वाढदिवस आहे, म्हणुन तुम्हाला निमंत्रण द्यायला आले होते. उद्या सकाळी तुम्ही तीघांनी घरी जेवायला या. ” निमंत्रणाचे सोपस्कार झाल्यावर जाता जाता “काकू नक्की या हं! येते मी. “ म्हणत मनिषा निघाली.

        “हो नक्की येउ.” निमंत्रण स्विकारत व येण्याचे आश्वासन देत काकू म्हणाल्या.

        रविवारी सकाळी केशव परचुरे कुटुंबिय वेळेवर निळकंठरावांकडे आले.  त्यांचे सोबत आलेल्या अविनाश कडे विस्मयचकित नजरेने निळकंठराव व निलिमा तार्इ पाहतच राहिले. त्यांना  एक वर्षापूर्वी भेटलेल्या तरूणाची व त्याने केलेल्या मदतीची आठवण झाली. तो हाच तर नाही ना असा संभ्रम त्यांचे मनी आला. त्यांचे चेह–यावरील विस्मयचकित भाव पाहून,  त्यांचा   संभ्रम दूर करित, अविनाशची ओळख करून देत केशव परचुरे म्हणाले, “हा अविनाश माझा पुतण्या येथेच एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. ” “वर्षापूर्वी आम्ही यांना वर्षापूर्वी एका मंगल कार्यालयात भेटल्या सारखे वाटतंय. तदनंतर सौ. स झालेल्या छोटयाशा अपघाता वेळी यांनीच आम्हाला मदत केल्याचे पण आठवते.” निळकंठराव म्हणाले.

         “होय काका मीच तो.” अविनाशने पुस्ती जोडली. “ त्यावेळी माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी मी तेथे आलो होतो.”

         “अरे, सहसा ‘तो मी नव्हेच’ म्हटले जाते आणि तु प्रामाणिक पणे चक्क मीच तो असल्याचे म्हणतोस”

           “होय काका खरंय, मीच तो.” अविनाश उत्तरला.

            दुपारी जेवणे आटोपल्यावर थोड्याशा वामकुक्शी नंतर सर्वजण गप्पा मारत असतांना मनिषाच्या लग्नाचा विषय निघाला. केशवराव पण आपला पुतण्या अविनाशसाठी वधू संशोधन करित असल्याचे म्हणाले. निर्मला काकूंना मनिषा पाहता क्षणीच आवडली होती.  त्यांनी मनिषासाठी अविनाशचा प्रस्ताव मांडला. अविनाशचा मॄदुल स्वभाव व सोज्वळ वर्तणूक आधीच निळकंठराव व नलिनी तार्इंना आवडली होती. नलिनीतार्इंच्या तोंडून सहजच शब्द निघाले “जर अविनाश व मनिषाची पसंती असेल तर आमची काहीच हरकत नाही. ” या वाक्यावर समोर बसलेले अविनाश व मनिषा यांचे मनासारखे होत असल्यामुळे दोघांच्या मनी आनंदाचे लाडू फुटले. काही न बोलता दोघांनी खाली मानेने आपली मूक संमति प्रदर्शित केली.  निळकंठराव व नलिनीतार्इंनी नजरेनेच मनिषाकडे तिच्या सहमतीच्या दॄष्टिने तिरपा कटाक्ष टाकला. मनिषा लाजली.  तिचे गाल लाजेने लाल झाले व काही न बोलता घरात पळून गेली.  सर्वांनी काय ते त्यांच्या मनातले ओळखले. त्यानुसार बोलणी झाली. जवळचा मुहुर्तपण काढला गेला व योगायोगाने त्याच कार्यालयात उभयतांचे लग्न लागले.  सर्वकाही व्यवस्थित पार पडले. मनिषा सासरी गेली.

           आठवडया भराने गप्पा मारत असतांना निळकंठराव नलिनीतार्इंना मागील बोलण्याची आठवण करून देत म्हणाले, “आठवतंय तुम्हाला, मी म्हणालो होतो ना, मिळेल, जरूर मिळेल, तिच्या भाग्यात असेल तर असाच नवरा मिळेल. या योगा योगाच्या गोष्टी आहेत. योग जुळून आल्यावर सर्व काही सुरळीत होते. काळजी करण्याचे कारण नाही. ” 

Go Back

Comment