Please download here !!
अऺकुर
“ए विशू बस्स झाले. उठ की आता. किती वेळ विचार करत बसशील. देश चालवणारे अर्थमंत्री पण देशाचे अंदाज पत्रक बनविताना एवढा विचार करित नसतील. बापूंचा फोन आला आणि तु इतका विचारात पडला. हे घर आपल्या दोघांचे आहे ना ! मग आपण दोघे विचार करून प्रश्न सोडवू. उठ आता कपडे बदल तोंड धू. मी मस्त पैकी खाण्यासाठी गरमा गरम भजी बनविते व गरम वाफाळलेला आले घालून चहा बनविते. बाहेर कसे छानसे पावसाळी मंद धुंद वातावरण आहे. पहिल्या शिडकाव्याने मातीचा छानवा सुगंध सुटलाय बघ !” असे म्हणत श्वेताने विश्वासला हात धरून उठविले.
सहजा सहजी ऐकेल तो विश्वास कसला. तो जाउन कॉटवर बसला व परत विचारात गुंतला. श्वेता पण त्याच्या शेजारी बसली. विशूने श्वेता चा हात आपल्या हातात घेतला. क्षणभर श्वेता मोहरली. आनंदली. रोमांचित झाली. श्वेताचा हात हळुवार पणे कुरवाळीत विशू बोलता झाला. अगं बापू आर्थिक अडचणीत आहेत. पेरण्या जवळ आल्यात. शेत तयार करायला. बी आणायला पैसा पाहिजे त्याविना पेरणी होणार नाही. पेरणी न झाल्यास वर्ष कोरडे जार्इल. अनेक समस्या निर्माण होतील. आपल्याला काहितरी करायला पाहिजे. गेले दोन महिने आपणच आर्थिक विवंचनेत असल्यामुळे बापुंना पैसे पाठवू शकलो नाही . वाट पहात आहेत आपल्या मदतीची. म्हणून फोन केला. हे ऐकून श्वेता थोडी धीर गंभीर झाली. तिचा रोमान्स मावळला. धीर देत म्हणाली, “ तु म्हणतोस ते सगळ खरंय. पण असे हतबल होउन चालणार नाही. माझे तुझ्यावर व तुझ्या सर्व कु्टुंबियावर प्रेम आहे. त्यात बापुंवर जास्तच. त्यांनीच घरचा कर्ता पुरूष म्हणून सर्वांचा विरोध डावलत आपल्याला समजून घेत आपल्या विवाहास मान्यता दिली व मला सुन म्हणून स्विकारले.
विश्वास व श्वेता एकाच गावातले, एकच शाळा व एकाच कॉलेजातून पदवी संपादन केलेले विद्यार्थी. विश्वास शेतकयाचा मुलगा. गावात बापू शेतकरी म्हणून ओळखले जात होते. बापू मेहनती शेतकरी. श्वेता त्याच गावातील सुसऺस्कॄत घरातील, सरकारी अधिकारी भगवानराव यांची मुलगी. दोघेही एकुलते एक. श्वेता आठवी इयतेत असतांना भगवानरावांची बाभूळगावी, जिथे बँक. शाळा, कॉलेज, दवाखाना, अशा प्राथमिक सुसज्ज सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी बदली झाली. श्वेता व विश्वास दोघे अभ्यासात हुषार होते. नेहमी त्यांचा पहिल्या 5 क्रमांकामध्ये आलटून पालटून नंबर असायचा. सहाजिकच दोघांमध्ये वह्मा, पुस्तके देणे घेणे वरून मैत्री झाली. दोघेही स्नेहसंमेलन व विविध खेळण्याच्या स्पर्धेत हिरीरीने सहभागी होत. त्यात त्याची मैत्री दॄढ होत गेली व मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. कधी कॉलेजच्या व्हरांडयात तर कधी खेळाच्या मैदानावर, झाडाखाली दोघे गप्पा मारतांना दिसत. दोघेही पदवी परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांचे प्रेम प्रकरण फडतरे प्राध्यापिके शिवाय कोणाला माहित नव्हते. कॉलेजमध्ये झालेल्या कम्ँपस इंटरव्ह्यूत विश्वासची निवड झाली व शहरामध्ये त्याची नियुक्ती झाली.
वर्ष सहा महिने लोटले तसे उभयतांच्या घरात विवाहाचे वारे वाहू लागले. श्वेता साठी वर संशोधन सुरू झाले. श्वेताला चांगली स्थळे सांगून आली. पण तिला फक्त विश्वासशीच विवाह करावयाचा होता म्हणून ती चांगली स्थळे असून देखिल नाकारत होती. तिचे विश्वासवर नितांत प्रेम होते. ती त्याच्याशिवाय अन्य कोणाचा विचारच करू शकत नव्हती. आपल्या मनातले आर्इ वडिलांना सांगायचे कसे हा मोठा गहन प्रश्न तिच्या समोर होता. तिने या गोष्टीची विश्वासला देखिल कल्पना दिली
. एके दिवशी आर्इने श्वेताला तिच्या अपेक्षां व अडचणी जाणून घेण्यासाठी मन मोकळे तिच्याशी चर्चा केली तेव्हा श्वेताने आपले प्रेम प्रकरण व विश्वासविषयी सर्व माहिती आईला सांगीतली. ते ऐकून तिच्या पायाखालची वाळू सरकली. भूकंपाचे जोराचे हादरे बसावे असे तिला झाले. ती खूप रागावली. अबोला पण धरला. पण आर्इचे हॄदय ते एक दिवस पाघळले. तिने हिमतीने श्वेताच्या वडिलांकडे ही गोष्ट काढली. वडिलांनी देखिल राग राग केला. इकडे विश्वासच्या घरी देखिल काही फारशी वेगळी परिस्थिती नव्हती. दोन्ही कुटुंबांकडून या प्रेम विवाहास विरोध होता. विश्वासने आपल्या कुटुंबियांना समजाविण्याचा खूप प्रयत्न केला. पण विरोध कमि होत नव्हता.
दरम्यान सुटीवर आलेल्या विश्वासची फडतरे प्राध्यापिकेशी भेट झाली. गप्पांच्य़ा ओघात लग्नाचा विषय निघाला. कुटुंबियांच्या विरोधा बद्दल सांगितले. दोन्ही कुटुंबियांची पण भेट घडविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे पण त्याने सांगितले. फडतरे मॕडमचॆ मनात त्याच्या विषयी सहानुभूती जागॄत झाली. त्यांनी विश्वास व श्वेता दोघांची एकत्र भेट घेउन दोघांचे विचार ऐकले उभयतांना समजाविले.
दोघांचे एकमेकांवरील निस्सीम प्रेम व एकमेकाशिवाय राहणार नसल्याचे लक्षात आल्यावर मध्यस्धी करण्याचे ठरविले. उभयतांच्या कुटुंबियांना भेटून सत्य परिस्थीतीची कल्पना दिली. समुपदेशन केले. दोघेही सज्ञान आहेत. हुषार आहेत. गेली सहा वर्षे एकमेकास चांगले ओळखतात. त्यांचे एकमेकावर निस्सीम प्रेम आहे. सामंजस्याने दोघांचा संसार सुखी होउ शकतो. वळबरीने मनाविरूध्द विवाह जमविल्यास सुखी संसाराची निश्चिती नाही. हल्लीच्या प्रगल्भ विचाराच्या व सुशिक्षित तरूण पिढीतील मुला मुलींच्या बदलेल्या मानसिकतेने प्रेम विवाह ही सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. काही अंशी समाजाने देखिल या प्रेम विवाहाच्या प्रथेस कालमाना नुसार काळाची गरज समजून अंगिकारले आहे. अनेक प्रेम विवाह सुखाने संसार करित असल्याची उदाहरणे आहेत. असा सारासार विचार करता विश्वास व श्वेता यांचा प्रेम विवाह काही अपवाद ठरणार नाही. कदाचित असंतुष्ट नातेवार्इक, आप्तेष्टांच्या रोषाला सामोरे जावे लागेल पण काही काळापुरते. जसजसे दिवस जातील तसा रोष मावळेल व ते पुन्हा आपल्यात मिसळतील. शिवाय मी विश्वास व श्वेतास चांगली ओळखते. त्यांच्या वर्तणुकीने दोन्ही कुटबांच्या घराण्याच्या इभ्रतीला कदापि तडा जाणार नाही याची उभयता काळजी घेतील असा विश्वास आहे . विवाह प्रसंगी आपण आपल्या समाजातील रीती रिवाज व चालीरीती देखिल पार पाडू शकता. अशा अनेक प्रकारे उभय कुटुंबियाना फडतरे मॅडमने समुपदेशन करित समजाविले. दोघेही एकुलते एक असल्याने बाल हट्टापुढे त्यांना माघार घ्यावी लागली. विश्वास व श्वेताचा विवाह संपन्न झाला. दोघे संसाराला लागली.
आपल्या सीमीत पगारातून देखिल विश्वास नित्य नेमाने यथाशक्ती आपल्या कुटुंबियांना अर्थिक मदत करत होता. पण गेली दोन महिने काही अपरिहार्य कारणास्तव त्याला मदत करणे शक्य न झाल्याने नियमात खंड पडला. पेरणी पाण्याचे दिवस होते. पेरणी करणे आवश्यक होते. न केल्यास संपूर्ण वर्ष कोरडे जाण्याची भीती होती. बापुने आजतागायत कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता सात बारा कोरा ठेवला होता. यावेळी बापुंचा हात फारच अडचणीत आला म्हणून नार्इलाजास्तव विश्वासला फोन करावा लागला. चार वर्षापूर्वी देखिल अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने बापुने स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला होता. याची विश्वासला तीव्रतेने आठवण आली. त्यावेळी विश्वासची आर्इ व विश्वासने त्यांना खूप समजावले व अनर्थ टळला. त्याची पुनरावॄत्ती घडू नये अशी भितीयुक्त शऺका विश्वासचे मनात आली. शेतीमध्ये कष्ट फार तर उत्पन्न कमि अशी स्थिती आहे. शेतक-याचा मुलगा असल्याने शेतक-यांच्या विविध समस्यांशी चांगला अवगत होता बाजारात शेतमालाला भाव नाही, खते, बी बियाणे, शेतीची अवजारे यांची कमतरता. अशा एक ना अनेक कारणांनी शेतकरी राजा गांजला जातो.
कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ, कधी नैसगिक आपत्ती, तर मानव निर्मित समस्या. शेतीत काम करणा-या मजूरांची वाणवा आणि मिळालेच तर वाढती मजूरी. हे कमि की काय म्हणून याची कल्पना विश्वासने श्वेताला दिली. श्वेता जे आजपर्यंत केवळ बाहेरून ऐकत आली ते स्वत: अनुभवू लागली. तिला बापूंच्या फोनचे गांभीर्य कळले. पैसा कसा उभा करायचा असा उभयतां पुढे मोठा यक्ष प्रश्न उभा ठाकला. मन चिंताग्रस्त झाले.
रात्री श्वेताच्या वडीलांचा फोन आला त्यावेळी सर्व हकिकत व बापूंच्या अर्थिक अडचणी बद्दल सांगितले. “बाबा तुम्ही काही तरी कराना! ” अशी हक्काची लडिक विनंती केली. एक कष्टाळू व प्रामाणिक शेतकरी ज्याने उभ्या आयुष्यात कधीही कर्ज घेतले नाही, अडचणीत आल्याचे ऐकून त्याना वार्इट वाटले. मदत करण्याचे त्यांनी मनोमनी ठरविले. सकाळीच तलाठी ऑफिसमध्ये जाउन तलाठयांची भेट घेतली व सविस्तर माहिती देत मदतीची अपेक्षा केली. तलाठयांनी सर्व शहानिशा करून मदत करण्याचे आश्वासन दिले. आठवडया भरातच बापूना तलाठी कार्यालयात पाचारण करण्यात आले. त्यांचे बँक अकाउंट नऺबर, आधार कार्ड नऺबर व आवश्यक कागदपत्राची पुर्तता करून घेण्यात आली व त्यांच्या अकाउंटला 25,000/- रूपयांची रकम त्वरीत सहाय्य म्हणून जमा करणेत आली.
बापुंची चिंता मिटली. बी, बियाणे व खते खरेदी करून वेळेत पेरणी झाली. पण कोणासही न सांगता किंवा न भेटता हे कसे झाले याचे बापूंना कोडे पडले. विश्वासकडे चौकशी करता सुन, श्वेता व व्याही भगवानराव यांच्या सहयोगाने मदत मिळाल्याचे समजले व कोडे उलगडले. बापूंनी सूनेचे कौतुक करित आभार मानले. यावर श्वेता अदबिने म्हणाली,”हे हो काय बापू. आभार कसले मानता. मी या घरची सून आहे. मोडकळीस जाणारे घर सावरणे व कुटुंबातल्या प्रत्येकाची काळजी घेणे हे माझे आद्य कर्तव्यच आहे. ते मी केले व करित राहीन. यासाठी माझ्या बाबांची मदत घेतली एवढेच.”
आठवडया भरातच शेतातील कामे संपवून बापू व विश्वासची आर्इ नर्मदाताई भगवान रावांचे आभार मानण्यास त्याच्या घरी भेटीसाठी गेले. भगवानराव व श्वेताची आर्इ लता तार्इंनी त्यांचे स्वागत केले. चहा पाणी फराळ झाला तसे नर्मदातार्इ म्हणाल्या. “ तुमचे लर्इ उपकार झाले बघा. न्हाय तर या साली पेरणी झालीच नसती बघा. वरीस फुकट वाया गेलं असतं. ” भगवानराव मध्येच त्यांना अडवित म्हणाले, “ अहो, ताई यात उपकार काय आणि आभार मानण्यासारखे तर काहीच नाही. मी मुलीच्या सांगण्यावरून मजपरीने सामाजिक काम केले. मुलीचा संसार सावरणे हे बाप म्हणून माझे कर्तव्य आहे. तिने कल्पना दिली नसती तर मला समजले पण नसते व मी काहीच केले नसते. सीमेवर जवान आणि शेतात शेतकरी यांच्या जोरावरच देशातील सर्व सामान्य जनता सुखाने जगते आहे. शासनास दोघांची काळजी आहे. शेतकरी म्हणजे आम्हा सर्वांचा अन्नदाता. तो शेतात राबला व धान्य पिकविले तरच या जनतेस दोन वेळ जेवावयास मिळेल अन्यथा उपाशीच रहावे लागेल. भाविक व ष्टाळू शेतकरी व्याही म्हणून माझ्या मनात तुमचे बद्दल व तुमच्या कुटुंबियां बद्दल नितांत आदर व प्रेम आहे. तुमच्या सारखे व्याही मिळाले हे आमचे भाग्यच समजतो. आपले प्रेम असेच कायम राहो व नाते दॄढ होत जावो ही परमेश्वराजवळ प्रार्थना.
पेरण्या झाल्या. पाउस वेळेवर पडला. शेतकरी सुखावला. रोवलेली बीजे अंकुरली. मातीच्या कुशीतून डोके बाहेर काढून डोकावू लागली. आठवडया भरातच पिके चांगली तरारली. आपल्या हिरव्या गार दोन कोवळया पानांनी हवेच्या मंद झुळुकी सोबत मजेत डोलू लागली. मन हरकले. नेञ सुखावले.
बापूंनी भगवानराव व लता तार्इंना हिरवी गार झालेली शेती पाहण्यास बोलाविले. कोणतेही आढेवेढे न घेता सबबी न सांगता दोघेही रविवारी सकाळी शेतावर हजर झाले. नजर जार्इल तेथपर्यंत निसर्गाने अंथरलेला हिरवीगार गालिचा पाहून मन आनंदले. नेत्र सुखावले.
एवढयात ‘फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तु वेडा कुंभार’ गाण्याची धून गात बापूंचा मोबार्इल वाजला. बापुंनी ‘जय हरी’ म्हणत फोन उचलला
‘बापू मी विश्या बोलतोय’ तिकडून विश्वास चा आवाज आला.
‘हां बोल बाळा कसे हायती तुमी ? बापूंचा प्रश्न.
‘आम्ही चांगले आहोत. तुमची अन् मायची तब्येत कशी आहे ? विश्वासच प्रश्न.
‘आमी बी ठीक हाय. आता आमी शेतावर आलोया. संग तुझे सासू सासरे बी हायती. पेरल्याल समदं बीज अंकुरल हाय. लर्इ झॅक हिरवगार दिसतया. ’ बापू मोठयाने ओरडून सांगत होते.
बापू तुम्हाला पण एक खूप आनंदाची बातमी द्यायची आहे. असे म्हणत त्याने फोन श्वेता कडे देत म्हणाला. ‘घे तु सांग’ . श्वेता नाकारत म्हणाली ‘नाही तु सांग’ विश्वास परत म्हणाला, ‘नाही तु सांग.’ अशाप्रकारे दोघांमध्ये 3/4 वेळा ‘तु सांग’ चा संवाद बापुच्या कानावर पडला. ’तु सांग’ चे पुढे गाडी जार्इना म्हणून बापू लटक्या रागाने म्हणाले, अरे काय चाललंय ‘तु सांग’ कुणीबी सांगा पण लवकर सांगा की.
शेवटी श्वेताने फोन घेतला अन् लाजत म्हणाली, “बापू तिकडे शेतात बी रूजलं अंकूर फुटला तसा आमच्या कडे पण आमच्या प्रेमाला प्रेमांकुर फुटलाय.”
“काय म्हटली पोरी मला काय बी उमजना. परत सांग .” बापू म्हणाले.
श्वेता परत तेच म्हणाली, “बापू आमच्या प्रेमाला प्रेमांकुर फुटलाय.”
काहीच न कळल्यामुळे “वार्इच थांब जरा” म्हणत फोन लतातार्इंकडे देत म्हणाले, “ताई ही पोरगी काय म्हणतेय मला काय बी कळत नाहीय. बघा जरा. “घे पोरी तुझ्या मायशी बोल. ”
आर्इकडे फोन दिल्यावर तिने लाजतच आर्इला सांगीतले. “आर्इ आमच्या प्रेमाला प्रेमांकुर फुटलाय. लवकरच तुम्ही सगळे आजी आजोबा होणार आहात”. लता तार्इंनी आनंदाच्या भरात फोन बंद न करता सर्वांना ही गोड बातमी दिली. बापु व नर्मदातार्इंचे अभिनंदन केले. शेतात बीयांना फुटलेला अंकुर व श्वेताच्या उदरात त्यांच्या प्रेमाला फुटलेला प्रेमांकुर या मुळे सर्वजण सुखावले. चेहयावर तेज आले.
नर्मदातार्इ म्हणाल्या, “त्यास्नी म्हणाव आता लर्इ जपाव लागन. कुठ घार्इ गर्दी करू नग. आराम कराया गावाकड चालली ये. आमी समदे हायती तुझी काळजी घ्याया.” मोठयाने बोलल्यामुळे नर्मदातार्इंचा सल्ला श्वेताला न सांगता ऐकू गेला. तिने “हो” म्हणून होकार दिला व फोन बंद केला.
आभाळ झाकाळले. आकाशात काळया ढगांनी गर्दी केली. मेघराजाने कोवळया अंकुरावर प्रेमाची वॄष्टी केली आणि सर्व मंडळी घरी परतली.