Please download here !!
प्रकाशन: वसुधा दिवाळी अंक २०१४
मोहिम फत्ते
गावापासून दूर रस्त्याच्या आडबाजूला शेतामधले शत घर. शेत घराच्या सभोवताली डोक्यापेक्षा उंच वाढलेली उसाची व मक्याची शेती. मक्याच्या प्रत्येक ताटास कणसे लगडलेली. शेतघर पूर्ण पिकांनी झाकलेले. शेताच्या बांधाला लागून घराकडे जाणारा एकमेव धूळीने माखलेला एकमेव बैलगाडीचा कच्चा रस्ता. रात्रीची वेळ. दहाचा सुमार. दिवसभरातील शेतातील अंग मेहनतीची कामे उरकून नारायण आणि सखूबार्इ थकून भागून नेटकीच पडली होती. आजू बाजूला निरव शांतता. मधूनच टीटीव ऽऽ टीव, टीटीव ऽऽ टीव असा आवाज काढीत टीटवी इकडून तिकडे उडत होती. सभोवताली अंधाराचे साम्राज्य पसरले होते. खुराडयात कोंबडया शांतपणे पहुडल्या होत्या. घराच्या मागील बाजूस गोठयात अधून मधून जनावरांच्या गळ्यातील घंटेचा आवाज येत होता. कोठे एखादा कु्ञ्याचा भुंकण्याचा आवाज तर हवेने हलणा–या अथवा सरपटणा–या प्राण्यांच्या हालचाली मुळे होणारी पानाची सळसळ शांतता भंग करित होती. नारायण आणि सखुबार्इना या अशा नेहमीच्या चित्र विचित्र आवाजाची सवय असल्याने ते नेहमीप्रमाणे अशा भितीमय वातावरणात देखिल बिनधास्त निवांतपणे झोपी गेले होते.
नेहमीप्रमाणे अवती भावती पाळीव ५ – ६ कुञ्यांच्या भुंकण्याचा पहारा वजा धुडगुस चालूच होता. परंतु आज कुत्रयांचा आवाज वाढला होता. त्यामुळे सखुबार्इची झोपमोड झाली. परंतु हे नेहमीचेच असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष करित पुन्हा झोपी गेली. कुञ्यांचे भुंकणे जरा जास्तच वाढले ते थांबेना. काहीतरी अवचित घडत असल्याचा सखुबार्इना अंदाज आला तसे तिने नारायणाला हाक दिली. त्याला उठवित म्हणाली, “ अवं, उठा लवकर उठा. कवाधरनं दारा म्होर कुत्रं लर्इच भुंकत्यात. कंदी दाराजवळ तर कंदी दूर रस्त्याच्या कडला. मला कायतरी ईपरीत वाटतया. ”
नारायण फार थकला असल्याने त्याकडे दुर्लक्ष करित तो अर्धवट झोपेतच म्हणाला, “ काय नाय. या कुञ्यास्नी जरा काय वाटलं तरी भुंकत्यात. त्यांची सवय हाय ती. तु झोप आपली गुमान. ” नार्इलाजास्तव सखुबार्इ परत अंथरूणावर पडली. पण तिला झोप येत नव्हती. डोळ्याला डोळा लागत नव्हता. तिचे सर्व लक्ष कुञ्यांच्या भुंकण्याकडे लागले होते. कुञ्यांच्या भुंकण्याचा आवाज वाढू लागला तशी तिची छाती भितीने धडधडू लागली. खुराडयात कोंबडयांची खुडबुड स्पष्ट जाणवू लागली. गोठयातील जनावरांची अस्वस्थता वाढू लागली. तिने न राहवून घाबरतच परत नारायणाला आवाज दिला, “ अवं उठा की. कुत्रे लर्इच भुंकत्यात. जनावर बी अस्वस्थ झाल्यात. मला तर बार्इ लईच भ्या वाटतया. ”
एव्हाना नारायणाची पण झोपमोड झाली होती. तो थोडा सावध झाला. “एवढया रातच्याला आडवाटाला कोण आलं हित मरायला” असे मनाशीच पुटपुटत तो दाराकडे जाउ लागला तसा सखूबार्इने आवाज दिला, “ अवं थांबा की, असं कुठ चालला घार्इ घार्इ. चोर दरोडेखोर असतीन तर तुमास्नी मारतीन. त्यांच्याकडं हत्यार असत्यात म्हन. एकदम दार उघडू नका. ” सखूबार्इच्या या सल्ल्याने ता माघारी फिरला. आता कुञ्यांचे भुंकणे थोडे कमि झाले तसा नारायणाने अंदाज बांधला. कदाचित बिबटया, तरस किंवा रानमांजर सारखे जंगली जनावर आले असणार व कुत्रयांच्या भुंकण्याने पळून गेले. एवढयात दारावर टक् टक् असा दार ठोठावण्याचा व ” दार उघडाऽऽऽ दार “ असा दरडावणीचा आवाज आला. बाहेरून कोणी तरी दार उघडण्याचे सांगत होते. सुरवातीला नारायण आणि सखुबार्इ दोघेही घाबरले. परंतु धीर न सोडता नारायण दाराच्या फटीतून बाहेर कोण असल्याचा अंदाज घेउ लागला. बाहेर दिव्याचा प्रकाश पुरेसा नसल्याने काहीच अंदाज येर्इना. दारावर परत टक् टक् करत दार ठोठावण्याचा व दार उघडा असा आवाज आला.
“कोण हाय? एवढया रातच्याला काय पायजे? ” नारायणाने धीर करित विचारले.
“ आधी दार उघडा” परत असा दरडावणीचा सूर ऐकून सखूबार्इ पूरती घाबरली व मधल्या खोलीत जाउन दाराआड लपली. नारायणाने हिमतीने दार उघडले. दारात पोलीस इन्स्पेक्टर व दोन तीन पोलिस पाहून त्याला घामच फूटला. दबल्या आवाजात नारायणाने पुन्हा “काय पायजे?” तोच प्रश्न पोलिसांना केला.
त्याच्या प्रश्नाला उत्तर देत पोलीस इन्स्पेक्टरने खुलासा केला. “ मी पोलीस सब इन्स्पेक्टर मंगेश धायगुडे, डोळसवाडी पोलीस स्टेशनहून आलोय. मागील काही दिवसांपासून समोरच्या रस्त्याने रात्री ये जा करणा–या वाटसरूना दरोडेखोरांकडून गाडया अडवून लुटण्याचे प्रकार होत आहेत. आज रस्त्याच्या कडेला उसाच्या फडात काही दरोडेखोर लपून बसल्याची खात्रीशीर वर्दी आम्हास मिळाल्यावरून त्यांच्या बंदोबस्तासाठी व तुम्हाला सावध करण्यासाठी आलोय. सावध रहा. ”
पोलिसांचे म्हणणे ऐकून नारायणाच्या पायाखालची वाळूच सरकली तर सखूची बोबडीच वळाली. त्यांची ती अवस्था पाहून सब इन्स्पेक्टर म्हणाले, “घाबरू नका. तुम्हाला काही त्रास होणार नाही. आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत. ” पोलीसांनी असे सांगितल्यावर त्यांच्या जीवातजीव आला.
नारायणाने त्यांना घरात बोलावले व बसावयास घोंगडी टाकली. सब इन्स्पेक्टर त्यांचे आभार मानत घोंगडी वर स्थानापन्न झाले|सोबतचे शिपार्इ बाहेरच पहारा देत उभे राहिले| सखूने त्या सर्वांना पाणी पिण्यास दिले|थोडे स्थिरस्थावर झाल्यावर त्यांच्या गप्पा रंगल्या दरम्यान सखूला चहा ठेवण्यास सांगितले|
बोलण्याच्या ओघात नारायणाने सहजच बाLबोध प्रश्न केला| “ ते दरोडेखोर 7À8 जन तरी असतीन| त्यांच्या जवL तलवारीÊ भाले किंवा बंदूका बी असतीन| तवा तुम्ही तिघे जण कसे हो पूरे पडणार त्यास्नी Æ”
“नाही नाही तसे काही नाही| आमची एक सशस्त्र पोलीसांची तुकडी रस्त्याच्या बाजूला दबा धरून आहे शिवाय गस्ती वरच्या पोलीसांची नेहमीची गस्त आहेच| फारच झाले तर तुमची पण मदत मिLेलच की|” सब इन्स्पेक्टर खुलासा करित म्हणाला|
एवढयात सखू चहा घेउन आली| गप्पात रंग भरत चालला होता| बोलता बोलता कौटुंबिक विषय केव्हा कसा निघाला ते त्यांना कLलेच नाही| कौटुंबिक विषयावर बोलतांना सब इन्स्पेक्टर आपली ओLख करून देत म्हणालेÊ “ मी मुLचा तामसवाडीचा सर्जेराव धायगुडे पाटलाचा लहान मुलगाÊ सूर्यकांत|” सर्जेराव पाटलाचे नाव काढताच नारायण खुश झाला व म्हणालाÊ “ त्यांची बायको सोयराबार्इ माझ्या आर्इची चुलत बहीण| म्हणजे माझी मावशी” | म्हणजे आपण मावस भाउच आहोत की|” सब इन्स्पेक्टर विस्मयचकित होत म्हणाले
इतक्या जवLची ओLख निघाल्यामुLे नारायणराव व सखुबार्इ आनंदले| त्यांच्या चेह–यावरचा आनंद रात्रीच्या धिम्या प्रकाशात देखिल उजLून दिसत होता| सब इन्स्पेक्टर सूर्यकांत पण भरत भेटीप्रमाणे भाउ व वहिनीच्या भेटीने भारावले| घरगुती गप्पांना अजून रंग चढला| सूर्यकांत आपला पूर्वेतिहास थोडक्यात कथन करता झाला| “मी 10वी पास झाल्यावर तामसवाडी सोडून सांगलीला काकांकडे पुढच्या शिक्षणा करिता गेलो| मला पोलीस दलात जाण्याची पहिल्या पासून फार हौस होती| बी|ए| ची पदवी पाप्त केल्यावर नगरला पोलीस दलात भरती झालो| नाशिकÊ तLेगाव वगैरे ठिकाणची ट्रेनिंग संपल्यावर माझी नेमणूक सातारा पोलीस मुखयालयात झाली| रोजचे काम करता करता मी पोलीस खात्यातील विविध परिक्षा पास करित गेलो|
शेवटी पी|एस|आय| ची परिक्षा पास झाल्यावर सहा महिन्यानंतर माझी डोLसवाडी पोलीस स्टेशनल नियुक्ती झाली| 15 दिवसांपुर्वीच मी स्टेशन इन्चार्ज म्हणून रूजू झालोय|
माझ्या कारकीर्दीतील ही पहिलीच कामगिरी| पहिल्या वक्तालाच रातच्याला आमच्या घरला आलाय| बसा मी चा करते|” चहाचे आधण ग^सवर ठेवता ठेवता सखू म्हणालीÊ “भावजी एक इचारू का तुमस्नी रागवनार तर न्हाय Æ”
“नाही| विचारा|” सुर्यकांतने सहामति दिली|
“भावजी तुमचं लगीन झालं का नाय अजूनÆ” सखुने थोडे भीत भीतच विचारले|
नारायण तिला मध्येच अडवित म्हणालाÊ “हे कायÊ काय पण इचरतीयÆ”
“नाहीÊ नाही बोलूद्यात त्यांना माझी मोठी भावजयी आहे| हक्क आहे त्यांचा|” सूर्यकांत म्हणाला व एक क्षण भराची विश्रांती घेत उत्तर दिले| “ नाही अजून एकटाच आहे| इतक्या लवकर लग्न करून काय करायचे|”
सूर्यकांतच्या हातात चहाचा कप देत सखूबार्इने परत विचारलेÊ “भावजीÊ जेवले का न्हाय अजून| पोलीसांना कंदी कंदी जेवायला बी येL नसतो म्हणत्यात| म्हणुन इचारले|”
“नाही अजून|” सूर्यकांतने थोडक्यात उत्तर दिले|
“अवं रातचे दहा वाजलेत|अजून बी जेवले न्हाय|” सखुने परत आश्चर्य केले|
“त्याच काय झालंÊ संध्याकाLी पाच वाजता कंट्रोलरूमवरून वायरलेस संदेश आला कीÊ इकडे उसाच्या फडात काही दरोडेखोर लपले असून ते वाटसरूवर हल्ला करण्याची शक्यता आहे| त्यांचा बंदोबस्त करा| लगेच योजना आखणेÊ हत्यारांची जुLवा जुLव करणेÊ जादा कुमक मागविणे इ| कामात सगLा वेL गेला| ते झाल्यावर ताबडतोब फौजफाटयांसह इकडे येण्यास निघालो| जेवण्यास वेLच मिLाला नाही|” सूर्यकांत ने खुलासा केला|
“ अगं ताबडतोब डाL भाताचा कुकर लाव अन् चपात्या भाज|” नारायणाने सखुला जेवण बनविण्याची आज्ञा केली|
“ नको नको| मला केव्हाही मोबार्इलवर संंदेश येउ शकतो व संदेश आल्यास ताबडतोब निघावे लागणार|” सूर्यकांत म्हणाला|
सखू आपली तत्परता दाखवित होकार नकाराची वाट न पाहता स्वयपाकाची तयारी करीत म्हणालीÊ “ भावजीÊ वार्इच थांबा| आता डाL भात करतेÊ चपात्या लाटते अन् अंडयांची भाजी बनवते|”
आपला सुगरणपणा दाखवितÊ थोडयाच वेLात सखूने सूर्यकांत व त्याच्या सोबतचे तीन पोलीस शिपायांना जेवण वाढले| संदेश आल्यास केव्हाही अर्धे जेवण सोडून जावे लागेल अशा दडपणाखाली सर्वांनी सखूच्या स्वयंपाकाचे गुणगाण करित जेवणाचा आस्वाद घेतला| जेवण आटोपून हातावर पाणी टाकतात न टाकतात तोच संदेश आला| सूर्यकांत नारायण आणि सखूबार्इचा निरोप घेउन निघणार तसे सखूबार्इच्या तोंडून पोटतिडीकन दरोडेखोरंाविषयी अपशब्द फुटलेÊ “जLले मेले त्या दरोडेखोरांचे मढे| भावजी सौताची काLजी घ्याÊ दरोडेखोरांशी सामना करताय| तुुमच्या मदतीला वरल्या वस्तीवरल्या शंकरअणाÊ कैलास भाउÊ तानाजी मामा व सैयद भार्इंना पण बेालाविते| ”
“नाही वहिनी सध्या त्याची गरज नाही| तुम्ही इकडे स्वत:ची काLजी घ्या|” सूर्यकांत म्हणाला|
“ भावजीÊ तुमी कायबी काLजी करू नका| आमी हितं फडाच्या मागं हायती| समजा चुकून एकादा दरोडेखोर इकड आलाच तर मुडदाच पाडते मेल्याचा| माझ म्हाएरच नांव लक्ष्मी हाय| कडक लक्ष्मी म्हणत्यात मला| आन् सब इन्स्पेक्टरची भावजय पण हाय| शुबेच्छा का काय म्हंत्यात नाÊ त्या शुबेच्छा तुमाला| आमी हाय तुमच्या संग|तुम्ही व्हा म्होरं ” सखुबार्इ धीर देत म्हणाली|
सखुच्या आत्मविश्वासात्मक बोलण्यावर सूर्यकांत व त्याचे सहकारी खुश झाले|तिचे धन्यवाद करित सर्वजण आपल्या कामगिरीवर निघाले| सर्वांनी माहिमेतील आपापल्या जागा संाभाLल्या| आखलेल्या योजने प्रमाणे साध्या प्रवासी वेशातील सशस्त्र पोलीस असलेली बंद टाटा सुमो गाडी मार्गस्थ झाली| अपेक्षेप्रमाणे गावठाणाच्या बाहेर उसाच्या फडाजवLच रस्त्यावर झाडाच्या फांद्या आडव्या टाकून दरोडेखोर हल्ला चढवतील असा अंदाज खरा ठरला| दरोडेखोर हल्ला चढविणारÊ त्याच क्षणी कडेला दबा धरून बसलेले सूर्यकांत व त्याच्या सहकारी पोलीसांनी प्रतिहल्ला चढविला| समोरून विरूध्द दिशेने कुमक असलेली पोलीस व्ह^नने वाट अडवून दरोडेखोरांना कैद केले|पोलीसांची योजना सफल झाली| मोहिम फत्ते झाली|
आठवडयाभराने सूर्यकांत मोटार सायकलवर दुपारचे सुमारास नागरी वेषात आला| सखू जवLच विहिरीजवL कपडे धुत होती| त्यांच्याकडे पाहुणी म्हणून आलेली सखूची लहान बहिण सरला त्याला सामोरी गेली| सरला जिल्ह्माच्या ठिकाणी एम|ए|च्या दुस–या वर्षात शिकत होती|
“कोण हवयंÆ” सरला चा प्रश्न|
“नारायण दादा आहेतÆ” सूर्यकांतचा प्रतिप्रश्न|
“नाही ते गावी गेलेत| माझी तार्इ आहे| बोलाविते तिला| बसा आपण|” असे म्हणत तिने बसावयास खुर्ची दिली व सखुस बोलविण्यास गेली|
काही वेLातच सखू आली| सूर्यकांतला बघून आश्चर्य करित म्हणाली “ भावजी तुमी कवा आलातÆ”
“ हे काय आताच आलो| तामसवाडीला घरी आर्इ बाबांना भेटावयास निघालोय| जाता जाता थोडावेL तुमची भेट घ्यावी व परवाच्या मोहिमेमध्ये तुम्ही सर्वांनी पोलीसांना केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद मानावेत म्हणून वाकडी वाट केली|”
“लर्इ बेस केलं| सरलाकडे बोट दाखवित तिची ओLख करून देत म्हणालीÊ ही माझी धाकली भन सरला| आमच्या घरात लर्इ हुशार म्हणून बा न तिला का^लेजात शिकायला धाडलं| सांगलीला कला वाणिज्य महाविद्यालयात शिकते| एम|ए|च्या दुस–या वर्साला हाय| दोन दिस सुटी हाय म्हणून आलीया भेटीला| बसा वार्इच| मी चहा करते|” असे म्हणून सखू माजघरात गेली|
बाहेर पडवीत सरला व सूर्यकांत दोघेच गप्पा करित बसले होते| दोघेही सांगलीला एकाच का^लेजमध्ये शिकल्याचे समजल्यावर गप्पांना अजूनच रंग चढला| सखू चहा घेउन केव्हा आली ते त्यांना कLलेच नाही| “चहा घ्या” हे सखूचे दोन शब्द कानी पडताच दोघे आपल्या गप्पांमधून भानावर आले|चहाचे घोट घेत सखूशी थोडयाशा गप्पा टप्पा झाल्यावर सूर्यकांत जाण्यास निघालाÊ तेेव्हा दोघांमधले निरोपाचे स्मित हास्य व नजरेतील भाव सखूच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही|
“भावजीÊ दरोडेखोरांच्या माहिमे परमाने आमच्या सरलाच्या पिरमाची बी मोहिम जिंकलेली दिसतीया|” सखूच्या या टिपणी वर सरला लाजली तर सूर्यकांत मूक संमति देत मोटर सायकलला किक मारून गेला ते त्यांना कLलेच नाही|