Menu

पुनरारंभ

199263

आईची शिकवण

Please download here !!

प्रकाशन: सौभाग्यवती दिवाळी अंक २०११ 

आर्इची शिकवण

                श्रीकांत एक हुषार, तल्लख बुध्दीचा व गरीबीतून वर आलेला उमदा तरूण. वयाच्या ५ व्या वर्षीच पित्याचे छत्र हरविले.   एकुलता एक असल्याने पित्याचे प्रेम देत व योग्य मार्गदर्शन करित आर्इने त्याला वाढविले.  त्याला काही कमि न करता पदवी पर्यंतचे शिक्षण दिले व मोठे केले.  स्वत:ची अक्कल हुषारी, शिक्षणाची तळमळ आर्इचे संगोपन व योग्य मार्गदर्शन या गोष्टी श्रीकांतला पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यास फार मोलाच्या ठरल्या.  आर्इ सावित्री बार्इ, एक व्यवहारी गॄहकॄत्यदक्ष सामान्य गॄहिणी.  लहान वयातच विवाह झाल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. स्वत:स शिक्षण पूर्ण न करता आल्याचे शल्य त्यांचे मनात बोचत होते, ते त्यांनी मुलाला पदवीपर्यंत शिक्षण देउन पूर्ण केले. पतीच्या निधना नंतर त्यांचा जुनाच स्टेशनरी कटलरी दुकानाचा व्यवसाय मुत्सद्दीपणे सांभाळत श्रीकांतला लहानाचे मोठे केले.  गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एक साधारण स्टेशनरी व कटलरीचे दुकान.  अधिक फायदा न घेता रास्त दरांमध्ये वस्तू विकून थोडीफार शिल्लक टाकत उदरनिर्वाह करणे व ग्राहकास देव मानत व्यवसाय करणे हेच त्यांचे ध्येय.       

       त्या दिवशी दुपारी नित्याप्रमाणे सावित्रीबार्इ दुकानात बसल्या असतांना श्रीकांतचे नावे एक पाकीट पोस्टमन देउन गेला.  पाकीट उघडून पाहिल्यावर श्रीकांत व सावित्री बार्इंच्या आनंदाला पारावार राहिला नाही.  श्रीकांतला तहसील कचेरीत कनिष्ठ कारकूनाची नोकरी लागली होती व १५ दिवसात त्याला सर्व प्रमाणपत्र व वैद्यकिय चिकित्सा पूर्ण करून जवळच्या तालुक्याच्या गावी हजर राहण्याचे आदेश दिले होते.  सावित्रीबार्इंच्या एका डोळयात श्रीकांतला सरकारी नोकरी लागल्याचे आनंदाचे आश्रू तर दुस—या डोळयात एकुलता एक मुलगा आता आपल्या पासून दुरावणार म्हणून दु:खाचे आश्रू, अशा संमिश्र भावना तरारत होत्या.  दुरावला तरी तो जवळच्याच तालुक्याच्या गावी असल्यामुळे महिन्यातून एक दोनदा तरी भेट होणारच याचे समाधान होते.

                     पहिल्या दिवशी प्रथमच कामावर रूजू होतांना श्रीकांत आर्इच्या पाया पडला तेव्हां आर्इ शुभ आशिर्वाद देत म्हणाली, “सुखी रहा, यशस्वी हो, उन्नती होउ दे, स्वत:चे व कुटुंबाचे नाव उजागर हाउ दे.  गैर व्यवहारां पासून दुर रहा.           

                       श्रीकांतने पहिला पगार झाल्यावर पगारामध्ये आर्इ साठी छानशी साडी व एक श्री गणेशाची इलेक्ट्रीक माळ असलेली फोटो फ्रेम भेट आणली.  त्याची ही भेट सावित्रीबार्इंना फार आवडली.  अल्पावधीतच श्रीकांतने आपला प्रेमळ स्वभाव व सहकारी वॄत्तीने सर्व अधिकारी व सहर्कायांची मने जिंकून घेतली.  त्याच्या कार्यपध्दतीवर सर्व वरिष्ठ अधिकारी खुश झाले.  कार्यालयीन काम सांभाळीत त्याने पदव्युत्तर एम.ए.चे शिक्षण पण पूर्ण केले तसेच विभागीय परिक्षा चांगल्या मार्कांनी पास झाला.  चार पाच वर्षातच त्याची कर्तव्य तत्परता, हुशारी पाहून विशेष विभागाची कामगिरी त्याचेवर सोपवित, त्याची बदली शेजारच्या तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आली. सरकारी आदेश पाळत कोठलीही सबब अथवा आडकाठी न करता पदोन्नती स्विकारत नविन जागेचा, नविन पदाचा कार्यभार त्याने स्विकारला.

                 एव्हाना सावित्रीबार्इंनी श्रीकांतसाठी वधू संशोधन सुरू केले.  थोडयाच अवधित योग्य स्थळ आले व  सुसंस्कॄत, सुशिक्षित व सुशील अशा सुवर्णाशी विवाह संपन्न झाला. तो संसारात रममाण झाला. आता त्याच्या वर कार्यालयीन जवाबदारी सोबत कौटुंबिक जवाबदारी पण वाढली. सुरवातील दोनही जवाबदा—या पार पाडत असतांना त्याला थोडेसे अवघड जात होते.  पण आईचे मार्गदर्शन आणि पत्नी सुवर्णा यांच्या सहकार्याने तो संसारात चांगलाच रूळला.  कळत न कळत एके दिवशी त्याच्या हुषार व प्रामाणिक या स्वभाव धर्माला कसे ग्रहण लागले ते त्याला कळले नाही.  त्याची ओळख तेथे नुकत्याच बदलून आलेल्या एका सहकार्याशी झाली.  एका छोटयाशा घटनेमुळे तो आर्इ, सावित्रीबार्इंच्या नजरेत कलंकित ठरला.

                         तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ति गैर मार्गाने सरकारी अनुदान मिळविण्याच्या प्रयत्नात फार दिवसांपासून होता. परंतु प्रत्येक वेळी या ना त्या कारणाने आवश्यक कागदपत्रां अभावी त्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडून नामंजूर केला जात असे.  श्रीकांतच्या सहकारी वॄत्तीचा व त्याचे वरील वरिष्ठांच्या मर्जीचा फायदा घेत त्याचेशी संगनमत व  काहीसे गोड बोलून,  त्याला चुकिचे मार्गदर्शन करीत त्याने श्रीकांतकरवी यथायोग्य प्रस्ताव तयार करून वरिष्ठांच्या मंजूरी साठी पाठविला. या कामासाठी श्रीकांतचा सहकारी व ती व्यक्ति यांचेमध्ये आधीच देवाण घेवाणाची तडजोड झाली होती याची श्रीकांतला जरा देखिल कल्पना नव्हती.  प्रस्ताव मंजूर होत असल्याची कुणकुण लागताच ठरल्याप्रमाणे काही रकम श्रीकांत व त्याच्या सहर्कायास दिली.   विनाशकाले विपरीत बुध्दी या उक्तीप्रमाणे श्रीकांतची मति बदलली. त्याने त्या रकमेतून प्रथम आर्इंसाठी किमती साडी खरेदी केली.  संध्याकाळी त्याने साडी सोबत एक पेढयाचा पुडा पण आर्इच्या हाती ठेवला.

                            “हे काय रे श्रीकांत अजून पगार आलेला नाही  मग अचानक मध्येच ही साडी आणि पेढे कशासाठी रे ?  काही प्रमोशन वगैरे झाले की काय? आणि सुवर्णाला आणायची सोडून मलाच कशासाठी? ” सावित्रीबार्इंनी विचारले.

                            “अगं काही नाही गं! असेच वाटले म्हणुन आणली आणि सुवर्णासाठी पण आणेल न परत कधीतरी.” श्रीकांत म्हणाला.

              श्रीकांतच्या या उत्तरावर सावित्रीबार्इंचे समाधान झाले नाही. त्या मनोमनी त्याचे उत्तरावर खुश नव्हत्या.  पण त्याने प्रथमच न सांगता आणली म्हणून त्यांनी त्याचा मान ठेवित साडी स्विकारली.  काहीतरी  कोठेतरी चुकतयं याची मनात शंका आली.  पण त्या तात्त्पुरत्त्या गप्प राहिल्या.  रात्री जेवण आटोपल्यावर त्यांनी परत त्या विषयाला हात घालीत त्याचे कडून सत्य ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. बराच उहापोह झाल्यावर श्रीकांतने खरी हकिकत कथन केली. “म्हणजे तु लाच घेतलीस आणि त्या पैशातून माझेसाठी साडी आणली?  स्वत:ला विकलंस रे विकलं.  तु विकला गेलास.  आज माझी मान तु शरमेने खाली घातलीस.  हरामाचा पैसा तो किती अंगी लागणार, किती दिवस पुरणार?  आणि याच साठी का बापाच्या पश्चात तुला मोठे केले?  हिच शिकवण दिली काय तुला? आज सारा गाव तुझ्याकडे अभिमानाने पाहत आहे.  त्यांना पण फसविलेस तु.” सावित्रीबार्इ पोट तिडकिने बोलत होत्या. त्यांच्या रागाचा पारा चढत होता. यावर श्रीकांत एकही अक्षर न बोलता खाली मान घालून ढम्मपणे सर्व ऐकत उभा होता.      राग अनावर होउन रागाने साडी त्याच्या अंगावर भिरकावली व अचानक जमिनीवर कोसळल्या. श्रीकांत घाबरला. आर्इ ऽऽ आर्इ म्हणत त्यांना उठविण्याचा प्रयत्न करू लागला.  त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडले.  पण व्यर्थ. त्यांची शुथ्द हरपली होती. श्रीकांत कडून झालेली चूक त्यांना सहन न झाल्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढला होता. गडबड गोंधळ ऐकून शेजारची मंडळी धावत आली. त्यांनी लगेचच सावित्रीबार्इंना जवळच्या हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केले. वेळीच सर्व उपचार मिळाल्या मुळे त्यांची प्र्रकॄति स्थिरावली.

                 इकडे श्रीकांतचे होश उडाले होते.  आर्इ शुध्दीवर आल्याचे पाहून त्याचा जीवात जीव आला. त्याने आर्इची माफी मागीतली. पुन्हा आयुष्यात अशी चूक करणार नाही अशी शपथ घेतली. दुसरे दिवशी सकाळी लवकरच कार्यालयात जाउन वरिष्ठांना सर्व प्रकार सांगितला.  अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल सर्वांची माफी मागीतली व त्या बनावट कागद पत्रांच्या आथारे प्रस्तुत केलेल्या प्रस्तावास मंजूरी न देण्याची विनंती केली.

                                वरिष्ठांनी त्यास झालेल्या पश्चातापाची कदर करित, प्रस्ताव फेटाळून लावत म्हणाले, “तुझ्या आर्इने तुला शिकवण दिली, तशीच केलेल्या चुकीची शिक्षा पण दिली.  एवढी शिक्षा तुला पुरेशी आहे.” 

Go Back

Comment