Menu

पुनरारंभ

199229

आमचे वाडा घर

         

Please download Here !

आमचे वाडा घर 

न्न‚वस्त्र‚निवारा हे मानवी जिवनातील आवश्यक घटक. जिवनात अन्न व वस्त्रास जेवढे महत्व तितक्याच महत्वाचा निवारा पण.  दिवस भर उद्योग‚ काम धंदा करून थकल्या भागल्या जिवाला संध्याकाळी शीण घालविण्यास कुटुंबासमवेत सुख दु:खाच्या गोष्टी वाटून त्यांच्या सोबत  प्रेमाने चार घास खाउन निवांत सुखाची निद्रा देणारे चार भिंती व डोक्यावर छप्पर असलेले घर अर्थात निवारा. भोवतालच्या चार भिंती सुरक्षेसाठी तर आकाशातून येर्णाया संकंटांपासून संरक्षण करण्यासाठी डोक्यावर छप्पर अशी घराची संकल्पना. कुण्या कविने म्हटले आहे.

             घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती

             माणसे असावी जिव्हाळयाची, प्रेमाची नकोत नुसती नाती

             भवती असावा बाग बगिचा नकोत नुसती झाडी

             छाया संगे फळा फुलांनी बहरावी अबोल अशी प्रिती

       ही जरी कवि कल्पना असली तरी माझे बाबतीत सत्यात अवतरलेली व प्रचिती अनुभवलेली आहे.  

          अहमदनगर जिल्हयात कोपरगाव तालुक्यातील तत्कालीन दि सोमैय्या साखर कारखाना‚ साकरवाडी‚कामगार वसाहत.  वसाहतीच्या मध्यावधी भागातील चाळीत स्वयंपाकघर‚ माजघर व बैठक अशी रचना असलेले, एकमेकास मधून जोडलेली दोन छोटी संयुक्त घरे म्हणजेच आामचे सहा खणी वाडा घर.  भोवताली वाडयाचा भाव आणणारी कुंपणाची तटबंदी. घराच्या पुढे व मागे एैसपैस जागा.   मागील दारी नळकोंडाळा भोवती धुणी, भांडी करण्यासाठी बांधलेला वर्तुळाकार ओटा| नळा शेजारी सांडपाण्यावर जगणारी आळूची बेटे, काही फूल झाडे व कुंपणा वर चढार्इ करून गेलेले दोडका‚ भोपळा‚ घोसाळे आदि फळ भाज्यांच्या वेली| बेटामध्ये काळी दांडी व काळसर हिरवे चविष्ट आळूची लहान मोठी पाने वार्याच्या झोताबरोबर डौलाने डुलत होती.  त्या पानांवर पाणी पडले की‚ ते पाण्याचे थेंब मोत्याप्रमाणे छान चमकत. काही मोती खाली घरंगळून जात तर काही पानावरच राहून यथावकाश वाहून जात.  पान पुन्हा कोरडे.  या नैसर्गिक क्रीये द्वारे ती पाने जणू सर्वांना संदेश देत होते की‚ आयुष्य बरे वार्इट अनुभव, ताण तणावाने भरले आहे|.  ताण तणाव, वार्इट अनुभव, सुुख दु:ख, जिवनातील अपरिहार्य घटक आहेत.  ते कोणी टाळू शकत नाही.  दु:खद घटना मनात धरून आयुष्यभर कुरवाळत न बसता वेळीच मजप्रमाणे सोडून द्या व हसत मुखाने हलत डुलत, आनंदाने जिवन जगत रहा.  पुढच्या अंगणात वयाची शंभरी पार केलेले महाकाय कडू लिंबाचे झाड ‘परोपकाराय इदं शरीरं’ या ब्रीद वाक्याप्रमाणे परोपकाराचा धर्म पाळत तेधील रहिवाशांना व येणा-या जाणा-या वाटसरूंवर मायेची सावली करित अजूनही दिमाखात उभे आहे.                                                                                                          

          दोन्ही हाताच्या कवेत मावणार नाही एवढा मोठा याच्या बुंध्याच परिघ आहे.  याच झाडाच्या सावलीत कित्येक उन्हाळे पावसाळे खात याच्या आशीर्वादाने लहानाचे मोठे झालो. पिकलेल्या पिवळ्या गोड लिंबोळ्या चवीने खाल्ल्या. उन्हाळ्याच्या दिवसात सुकल्या झडलेल्या पानांची होळी करून डासांना पळवून लावत रात्री या झाडाखाली निवांत सुखद निद्रा घेतली. याच्या छायेखाली खेळलो बागडलो. ज्या वॄक्षाने आमच्या डोक्यावर मात्या पित्या प्रमाणे छत्रछाया केली आमचे उन पावसांपासून संरक्षण केले, अशा महाकाय वॄक्षास रक्षकाची उपमा दिल्यास वावगे ठरू नये.  केवळ हेच झाड नाही तर आमच्या वाडा घराचे अंगणात शेवगा‚ डाळींब‚ मुळा‚ मेथी‚ कोथिंबीरीने आमचे अन्न गोड केले| झेंडूच्या पारिजातकाच्या फुलांनी आमच्या वाडा रूपी घरास शोभा आणली.  मात्या पित्याच्या प्रेमळ संगोपनासोबत या वॄक्ष वेलींनी पण आमचेवर अगाध प्रेम केले.             

            याला कोणी आगगाडीचा डबा म्हणो की काही म्हणो.  आम्हाला मात्र सुख देणारी स्वर्गमय वास्तुच ती. गमतीने सांगावयाचे झाल्यास दारी येणारा याचक दोन वेग वेगळी घरे समजून दोन्ही दारात उभा राहून याचना करित असे.  दोन्ही

 

:: 2 ::

 

आमचे वाडा घर

र एकच असल्याचे त्याला सांगावे लागत असे.  माझ्या आठवणी प्रमाणे एकही याचक विन्मुख गेल्याचे आठवत नाही.          

या छोटयाशा राजवाडयात आम्ही 9 भावंड लहानाची मोठी झालोत. पित्याचा वचक व प्रसंगी आर्इची डाट फटकारत दिलेली शिकवण आज आमचे जिवन आनंदी करित आहे. आज आम्ही भावंडांनी साठी पार केली पण आमचे छोटेसे वाडा. रूपी घर आंगण जिथे बालपण मजेत आनंदात गेले, ज्या वास्तुने आमच्यावर अगाध माया केली, भले ते भाडयाचे असो वा त्यावर आमचा काही हक्क किंवा स्वामित्व नसो, तरी ती वास्तू व त्यातील चिरआनंददायी रहिवास विसरता विसरणार.. वयाची 65 ओलांडली सत्तरी गाठली तरी, सासर वाशीणीला जसे आपल्या माहेराचे आकर्षण तसेच आम्हाला आमच्या जन्म भुमिचे व वाडा रूपी घराचे आकर्षण. प्रवास करतांना माहेरच्या वाटेवर असलेली काही जशीच्या तशी स्थळे तर काही बिकसित झालेली स्थळे पाहून मन भूतकाळात हरवले.  वय वाढले तरी जन्मगावाची व जन्मस्थळाची ओढ कायम होती. वसाहतीत प्रवेश करण्यापूर्वी दोन कि.मी. आधी कान्हेगाव रेल्वे स्टेशन जवळ असलेली माझी माध्यमिक शाळा व प्रवेश करताच प्राथमिक शाळेचे दर्शन घडले. माध्यमिक शाळेचे जसेच्या तसे, तेच ते दंगा मस्ती केलेले, प्रार्थना म्हटलेले, दर शनिवारी शारिरिक शिक्षणाच्या तासाला घातलेले सूर्य नमस्कार व केलेल्या कवायतीचे मोठे मैदान.                     पान 3 पहा

          वसाहतीच्या मध्यभागी गांधी मैदान नामक भव्य पटांगण जिथे खाली जमिनीवर पोत्यावर बसून पाहिलेली नाटके सिनेमे व अन्य अनेक कार्यक्रम. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जागा पकडण्यासाठी तासभर आधी केलेली धडपड, वाद विवाद सर्व स्मॄती चाळवल्या. आमचे वाडा घर व जन्मस्थळाला भेट देउन अविरत आनंद झाला.  धन्य झाल्या सारखे वाटले. नोकरी नंतर शहरामध्ये स्वकष्टाने बांधलेल्या बंगल्यापुढे बालवयात मोठे वाटणारे घर छोटे वाटू लागले. या एवढयाशा छोटया घरात आपण 9 भावंडे कशी राहिलो याचे आश्चर्य वाटले. मधल्या खोलीत एका लाकडी कपाटात आम्हा भावंडांना प्रत्येकी एक कप्पा वाटून देण्यात आला होता. प्रत्येकाने आपले कपडे व सर्व साहित्य आपआपल्या कप्प्यातच ठेवावे हा वडिलांचा वचक, या पासून वस्तू जागेवर ठेवण्याची मिळालेली शिकवण, शनिवारी दुपारी शाळा सुटल्यावर स्वहस्ते प्रत्येकाने आपला शाळेचा पोषाख धूउन दिलेला स्वावलंबनाचा धडा, आळीपाळीने झाडांना पाणी देणे अशी नियमितता अशा अनेक गोष्टी आम्ही याच आमच्या वाडा रूपी घरात शिकलो. 

              आम्हास शेजार पण छान मिळाला.  नातेवार्इकांपेक्षा जास्त प्रेम देणारे, सहकार्य करणारे शेजारी. दरवर्षी सर्वांकडचे लिंबाचे, कैरीचे वाटी वाटी भरून लोणचे हमखास यायचे. शिवाय बनविलेली भाजी, कढी गोळे, सणावाराला गोड धोड अशा अनेक पदार्थांची देवाण घेवाण तर नेहमीच होत असे.   बाहेर गावी जातांना निर्धास्तपणे शेजा-यांच्या भरवशावर घर सोडून जात असू.  दुपारी कामे आवरून सर्व महिला मंडळाचा ठिय्या लिंबाच्या झाडाच्या छायेत असायचा गप्पा टप्पा, वसाहतीतील नवी जुनी याचेवर चर्चा असायची. नवनविन बेत ठरायचे.                             

               एवढे बाकी खरे आम्ही कितीही मोठे झालो, आता बंगल्याचे, फ्लॅटचे मालक झालो तरी त्या आमच्या वाडा रूपी घराची सर या कोणत्याही वास्तूला येणे अशक्य. मी परमेश्वराजवळ एकच मागणे मागेन “ बाल पण देगा देवा, संगे वाडा रूपी घराचा ठेवा.” माता पित्याच्या आशिर्वादा सोबत त्या वाडा घराचे आशिर्वाद सदैव आमच्या व आमची मुले सुना व नातवाच्या पाठीशी राहोत.

 

Go Back

Comment