Please Download File Here !!
विभागणी
विभागणी‚ विभागणी‚ विभागणी ॥धृ॥
विभागणी होते मालमत्तेची
विभागणी होते जमिनजुमल्याची
विभागणी होते पैशा अडक्याची
विभागणीने ऐहिक सुख लाभते
परंतु विभागणीने मने दुभंगुन आपसी प्रेम लोपते ॥१॥
विभागत नाही झालेली शिक्षा
विभागत नाही शारिरिक दु:ख‚ पिडा
विभागत नाही मानसिक द:ख
शिक्षा‚ दु:ख हे ज्याचे त्यानेच भोगायचे असते
त्यात आर्इ‚ वडिल‚ भाउ‚ बहिण‚ बायको‚ मुले
कोणीच भागिदार नसते ॥२॥
विभागणीचे फायदे कमि‚तोटे अधिकच
एक संघता यातच सुख आहे मोठे
एक काडी मोडते‚ मोळी मोडणारास मोडते
गोष्ट आहे सोपी समजणारास समजते
सुज्ञ मनवा तंत्र हे जाणून घे
एक संघ रहा हीच तुला विनवणी ॥३॥