Please Download File Here !!
वाघरू
पल्याडल्या वावरात वाघरू दिसलं गडया
धोंडया सांगे, कोंडयाला आता खर नाय गडया ॥धृ॥
परवाच्याला म्हणे दगडयाची दोन मेंढरं नेली
सदा औताडाची म्हस पण नेली
वाघरू लय चपळ हाय
पंचक्रोशीत त्याचा बोलबाला हाय
वस्तीवरल्या मान्सांच्या त्याने वळखल्या नाडया
शिकारीच्या जागा पण त्याने हेरल्या गडया ॥१॥
जंगल वाल्यास्नी कळवाया हवं
मेंढरास्नी संरक्षण द्यायाला हवं
गाववाल्यास्नी सांगू पाहारा ठिवा
भारनियमन गेलं खडडयात
रातभर दिवा बत्ती चालू ठिवा
भिउ नको म्या बी तुझ्यासंग हाय गडया ॥२॥
यात वाघराची काय बी चूक न्हाय
मानूसच लर्इ वंगाळ हाय
जंगलं समदी तोडून टाकली
वाघराला –हायाला जागा नाय –हायली
मंग तो बी काय करीन, तुच सांग गडया ॥३॥
आताच म्या एक बातमी ऐकली
वाघरू बिघरू काय पण नाय
मेंढरं न म्हस चोरली हाय
खरं सांगू गडया माह्यबी यक बकरू न्हाय
चोरं पल्याडल्या गावातलाच हाय
घावला त करीन त्याला दे धरणी मला ठाय ॥४॥