Menu

पुनरारंभ

224924

भूत कथा

Please Download File Here !!

        भूत कथा

भूतांच्या वाडयात भूते राहतात

भूत कथा ऐकून भूतेच घाबरतात   ॥धृ॥.

 

भूतनाथानी टी. व्ही, उघडला

सनसनाटी बातमी आली

आग्रा बसडेपोमध्ये भूते संचारली

भूतबाधेने देान मॄत्युमुखी पडली

वाहक चालकांची झोप उडाली

बाकी सारे एकदम चपापले

काम सोडून होम हवनी बसले  ॥१॥

दूस-या दिवशी दुजी वार्ता

म्हणे दिल्लीला सोसायटीत भूते संचारली

छतावर भूते नाचली

घरांमध्ये भांडी पाडली, अन् रस्त्यावर सायकल चालवली

दिल्ली वासी बेहद हादरले‚ मांत्रिकाला पाचारण केले

भूत क्रीडा पाहून मांत्रिकाचीच टरकली

तोंडातली बोटे तोंडातच राहिली   ॥२॥

यमसदनी संमेलन भरले

भूत‚ हडळ?‚ पिशाच‚ चेटकिण एकत्र आले

थय थय करूनी नाच नाचली‚ गरमा गरम चर्चा झाली

म्हणे आम्ही येथे असता अवनीवर गेले कोण?

बोलवा त्यांना वर‚ धाडा एस एम एस‚ करा फोन

समिती बसली‚चौकशी झाली

भूत पिशाच काहीच नव्हते‚ सर्व मानव निर्मित थोतांड होते  ॥३॥

 

भूत पिशाच सारेच सावरले

सूटकेचा श्वास सोडून निवांत झाले

आता प्रश्न ठाकला संमेलनाचा खर्च उचलणार कोण?

झालेल्या खर्चाची भरपार्इ देणार कोण?

प्रास्ताव पास झाला सरकारशी चर्चा करू या !

मंत्री महोदयास उदघाटनास बोलवू या !

खर्चाची रक़म भरून काढूया !

मंत्री महोदय आले, नित नियमित पोकळ आश्वासन दिले

मंञ्याचे उल्टे पाय पाहून भूतच घाबरले    ॥४॥

Go Back

Comment