Please Download File Here !!
दोन विमांनांची भेट
दोन विमानांची आकाशी होते भेट
एक म्हणे दूस-य़ाला
सातासमूद्रा पलीकडे दूर माझी मजल
देशांतग॔त सेवा एवढीच तुझी शकल
पंख माझे थकले मला मागून रेट ॥धृ॥
माझी मजल फार दूर सातासमुद्रा पलिकडे
तुझा मुक्काम इथल्या इथे समुद्राचे अलीकडे
सागर पार करता जीव जातो
हवेतील अंतर कापता नाकी नउ येतो ॥१॥
दुसरा म्हणाला उंच आकाशी उडतो
ॻह ता-य़ाशी बोलतो
दिवसाची रात्र रात्रीचा दिवस पाहतो
इंधन भरण्या जमिनीवरच येतो
मग अहंकार करोनी मातीला का विसरतो ॥२॥
उंची गाठली, गगन गवसले
वृथा अभिमानी होउ नको
अभिमान तुझा जाईल वाया
मातीमोल होईला काया
जाणूनी घे यातील मेख
पंख माझे थकले मला मागून रेट म्हणू नको ॥३॥
तुला मी सांगतो
भुतळी गगनचुंबी इमारती
आभाळाशी त्यांची दोस्ती
भरभक्कम सिमेंटच्या भिंती
दोलायमान होता खाली कोसळती
माती होउनी मातीत मिसळती ॥४॥