Menu

पुनरारंभ

2 4 6 2 3 5

ते माझे घर

Please Download File Here !!

               ते माझे घर

 

ते माझे घर,  तेथे मी राहतो   ॥धृ॥

 

ते माझे घर,  मनाचे अंतरी

ना आप ना पर भाव

ना रंक ना राव

नांदतो जिथे सदैव सदभाव  ॥१॥ ते माझे घर तेथे मी राहतो

 

ते माझे घर सदहृदयी

वसे जेथे प्रेमभाव

 

द्रोह, विद्रोहा नाही वाव

सर्वांप्रति बंधू भाव ॥२॥  माझेघर तेथे मी राहतो

 

ते माझे घर सत्याच्या पोटी

जिथे नाही वॄथा व्यर्थ गोष्टी

नांदे केवळ सत्य सचोटी

हिच खरी जीवनाची कसोटी ॥३॥ ते माझे घर तेथे मी राहतो|

 

ते माझे घर प्रांजल अंगणी

चो–या  मा–या  लांडया  लबाडया

पळून जाती सर्वजणी

जेथे फक्त प्रामाणिकांची वरणी  ॥४॥ ते माझे घर तेथे मी राहतो

 

ते माझे घर अनुशासन दारी

बेशिस्त  गैरवर्तणुकीला नाही थारा

स्वच्छ पारदर्शी प्रशासन

जणू कोहिनूर हिरा ॥५॥ ते माझे घर तेथे मी राहतो

Go Back

Comment

Protected by Mathcha