Menu

पुनरारंभ

224924

ओरड चिताग्नीची

Please Download File Here !!

               ओरड चिताग्नीची

 

सांजवेळी, नदीकिनारी, चिताग्नी भडकली होती

ज्वाळा गगनी भिडल्या होत्या, चहूकडे निरव शांतता होती

रामनाम सत्य है, सत्य बोलो सत्य है, ओरडून सांगत होती ¦धॄ ¦

न जाणे कोण होता तो नरदेह

यातना त्याने किती सोसल्या

भोगली कर्माची फळे

आनंदे नाचला,  दु:खे, कष्टी झाला असेल

त्याचे त्याला कधी न कळले

एक दिवस असा उगवेल

आत्म्या परमात्म्याची भेट घडेल

अन् जिवनयात्रा अशी संपेल

चिताग्नी रामनामाचा जप करेल

रामनाम सत्य है, सत्य बोलो सत्य है, ओरडून सांगेल ¦1¦ सांजवेळी

सगे सोयरे आले असतील

कटू गोड आठवणी जाहल्या असतील

दोन अश्रू ढाळून गेले असतील

कोण आले, कोण गेले, ते नच त्याला कळले

कारण, कारण आत्मा परमात्म्यात विलीन झाला होता

उरला होता तो फक्त निर्जीव नरदेह

चितेवर पडून सांगत होता

रामनाम सत्य है सत्य बोलो सत्य है  ¦2¦ सांजवेळी 

संपले वादL, थांबला वारा

निजली झाडे, निजल्या वेली

पक्षी गणांची चिव चिव थांबली

दिवे मालवूनी, कोटरे निजली

अंधार पांघरूनी सॄष्टी निजली

परि न शमली दाह चित्याची

जपूनी माL रामनामाची

तम सारूनी पहाट झाली

चिताग्नीची दाह संपली

विरले दु:ख, विरली माया

रामनामाची उदघोषणा अनंतात विरली ¦3¦ सांजवेLी

Go Back

Comment