Menu

पुनरारंभ

224924

आजीचे देव दर्शन

Download this file here!!

             आजीचे देव दर्शन

 

नातू विचारी आजीला देव कधी असतो का?

कधी कुणाला दिसतो का ?                  ॥धृ॥

आजी म्हणे चल आपण तिर्थयात्रेला जाउ

तिथे तुला देव दाखवू

भोळी भाबडी आजी तिर्थयात्रेला निघाली

देवाची गासोडी काखेला मारली

चालता चालता गासोडी पडली

नातू म्हणे आजीला, आजे देव तुझा साॱडला

आजी म्हणाली कारण तु काल त्याच्याशी भांडला  ॥१॥

 

राउळी भक्तांची भाउ गर्दी

आजीची तेथे लागेना वर्दी

वाट सापडेना, देव दिसेना

आजीने कळसाचेच दर्शन घेतले

दूरूनच दोन्ही हात जोडले

चल बाळा घरी जाउ

गावच्या देवळातच देवाचे दर्शन घेउ॥२॥

 

नातवाने घरी इंटरनेट जोडले

संगणकावर श्रीरामाचे चित्र उघडले

बघ आजे तुझा देव सापडला

कसा हळूच येउन संगणकात बसला

देव दर्शने आजी खूष झाली

नातवाला प्रसादाची रेल चेल झाली            ॥३॥

Go Back

Comment