Download this file here !!
अभिनव संमेलन
एक अभिनव संमेलन भरले
लेखक, कवि, वक्ते एकाच व्यासपिठावर आले
10ला सुरू होर्णाया संमेलनाचे १२ वाजले ।धृ ।
कवि महाशय उभे राहिले आपली कविता वाचू लागले
कवितेचे स्वरूप विनोदी होते ज्याला कळले तेच हसले
बाकी सारे गप राहिले , एकाने प्रश्न केला
यात विनोद कोणता होता ? कवि महाशय उत्तरले
विनोद खन्ना एक अभिनेता होता ।।१।।
कविनंतर वक्ता उठला
तावातावाने हातवारे करित भाषण देउ लागला|
तालसूर मिळेना, भाषण त्याचे कळेना
श्रोता म्हणाला हातवारे करू नका उगाच तारे तोडू नका
आपले म्हणणे थोडक्यात सांगा
नाहीतर पकडा बिन घोडयाचा टांगा ।। २ ।।
वक्ता म्हणाला हातवारे करणे जरूरीचे आहे
चिकुन गुणिया साठी डासां पासून वाचणे गरजेचे आहे
लेखक महाशय उठते झाले भरभरा लेख वाचू लागले
लेख माझे आटोपशीर शांतपणे ऐकाल तर म्हणाल वाहरे वीर
कवि म्हणाले भंकस बाजी करू नका उगाच बोअर करू नका
नका आणू उधारीचा आव
सडके अंडे नासके टमाटेच करतील तुमचा भाव ।। ३ ।।
कविची टिपणी जिव्हारी लागली मंचावरच दोघांची जुंपली
संयोजकाची पंचार्इत झाली
समजावीता समजेना जो तो आपल्या र्तोयात
द्वंद्व पाहून संयोजक आले गोत्यात
एक नामी युक्ती सुचली
खोटया नोटांची पुडकी देउन दोघांची बिदागी केली
शांत जनता शांत मंडप सारे काही शांत जाहले
१० ला सुरू होर्णाया संमेलनाचे १२ वाजले ।। ४ ।।