Menu

पुनरारंभ

 

प्रिय  रसिक वाचक मित्र  हो,    

              आज   ही माझी  जीवनातील  प्रथम   वेबसाईट ( संकेत  स्थळ )  www.rajratna.co.in  आपल्यासाठी  प्रकाशित  करण्यात  अत्यानंद  होत  आहे .  मानवी  जीवनात  प्रत्येक  मानवाचे  एक  आपले  ध्येय  उद्दिष्ट  असते . ते  गाठण्यासाठी   मानव  प्राणी  आपल्या  सर्वतो  परीने प्रयत्न  करीत  असतो व  आपले  जीवन  सुखी  बनविण्याचा  व   जिवनातील  आनंद  मिळविण्याचा  प्रयत्न  करीत  असतो .  सर्वजण  आपल्या  ध्येयाची,  उद्दिष्टाची  उघडपणे वाच्यता  करतोच  असे  नाही.  रस्त्यावरील भिकारी  सुद्धा  आपला  आजचा  दिवस  सुखाचा  जावा  हे  उद्दिष्ट  ठेउन   लोकांकडून  जास्तीत  जास्त  भीक  मिळविण्याच्या  प्रयत्नात  असतो, .मी देखिल माझ्या अनेक ध्येय उद्दिष्टां  पैकी  एक उद्दिष्ट पूर्ण  करण्याचा प्रयत्न करीत आहे.

              या  संकेत  स्थळबाबत  सांगावयाचे  झाल्यास  यातील  कथा , लेख , कविता  या  प्रबोधनपर  आहेत. .  “ नाकारलेली  बायको , आईची शिकवण , आशीर्वाद , गळतीची  पाने , कमळा ” आदी  कथा ,  “प्रेमाने पहा , सावर  रे !”, आदी  लेख  तसेच  “वाट , हे  असेच  चालायचे ” आदि  कविता .यात  मी  माझे  विचार  प्रकट  केले  आहेत .

                मी . २००४  मध्ये  सेवानिवृत्त  झाल्यावार  पहीली   २/३  वर्षे  भटकंती  करणे , आप्तेष्टांच्या   गाठी  भेटी  व सेवाकाळ  दरम्यान  अपुरी  राहिलेली  कामे  पूर्ण   करण्यात  गेली . पुढे  दिवस  जाता  जाईना,. भेटी  दरम्यान  भेटलेले  इतर  सहकारी  विचारत ,” काय  प्रकृती  कशी  आहे ? हल्ली  काय  उद्योग  धंदा  चालू  आहे ? वगैरे  वगैरे  मला वाटते , जर  मन इतर कामामध्ये  व्यस्त  असेल  तर  वृद्धापकाळी सुध्दा होणाऱ्या  शारीरिक  त्रासाकडे  लक्ष   जाणार  नाही . शिवाय  वेळ  पण  जाईल..    आपले  छंद, आपली  आवड  जी  सेवाकाळ  दरम्यान  पूर्ण  होऊ  शकली  नाही  ती  पूर्ण  करण्यासाठी उत्तम संधी.समजून , मला  लीखाणाचा  छंद  होता . तो  पूर्ण  करण्याचे  ठरविले .

         २००८  पासून  लेखनास  सुरवात  केली .सुमारे  २०  कथा , लेख  व  कविता  चे   आजतागायत  लीखाण  केले . वर्तमान  पत्र , नियत कालिके , दिवाळी अंक या  मध्ये  प्रकाशनास  पाठवली.  संपादक  / प्रकाशकास  माझे लीखाण आवडले . प्रकाशित  झाले . वाचकांना  देखील आवडले . ई  मेल , पत्र  व  फोन व्दारे   भरभरून  प्रतिसाद  मिळाला . वाचकांनी  दिलेली  दाद  म्हणजे  माझ्या  यशाची पावती व ते  एक  प्रकारचे  प्रोत्साहन  समजुन  व  पाऊलखुणा  जपत वाटचाल सुरू केली..  माझ्या  लीखाणास  अधिक  धार  येऊ  लागली .

        पुस्तक छापून DTP सारखा  खर्च   करावा . शिवाय  पुस्तक  विकत  घेण्यासाठी  वाचकांना  देखील  भुर्दंड  बसू  नये .व  माझे  लिखाण  केवळ महाराष्ट्र  पुरते मर्यादित  न  ठेवता जगभर  देश  विदेश  कोणी  कोठेही  असो  त्यास  ते  वाचावयास मिळाले पाहिजे . तेथपर्यंत पोचले पाहिजे . असा  विचार  मनात  आला .  आजच्या   २१व्या शतकाकडे    वाटचाल  करतांना  माहिती  व  तंत्रज्ञान  सारख्या  प्रगत शैलीचा  वापर  करीत  संकेत  स्थळ  उघडण्याचे  ठरविले.  माझी   दोन्ही मुले,  रितेश  वाणी  व  निलेश  वाणी   दोघेही  या  क्षेत्रात  कार्यरत असल्याने , त्यांचे  बहुमुल्य  सहकार्य  मिळाले व  हे  संकेत  स्थळ  उदयास  आले .माझी पत्नी सौ.रजनी जिेने मला माझ्या वैवाहिक जिवनात माझ्या सुख दु:खात साथ दिली तिच्या नावाचे इंग्रजी स्पेलींग Rajani  मधील प्रथम ३ अक्शरे raj व माझे नावाचे इंग्रजी स्पेलींग Ratnakar मधील  प्रथम ५ अक्शरे ratna वरून rajratna असे नामकरण करण्यात आले.

         मला  खात्री  आहे  कि , आपणा  सर्वांना  ही  वेबसाईट ( संकेत  स्थळ )  आवडेल  व   आपणा  पण  भर भरून प्रतिसाद  द्याल .  आपल्या  कोणत्याही  प्रकारच्या  प्रतिक्रियांचे  स्वागत  केले जाईल.  तर  मग  जरूर  पहा  वाचा  rajratna.co.in  चा  आनंद  घ्या . प्रतिक्रिया  देण्यास  विसरू नका ..

 

            

                   स्वकीय‚ स्वकमायी यातील स्व, स्व अर्थात स्वत: मी, रत्नाकर गंगाधर वाणी. www.rajratna.co.in या संकेत स्थळाचा मालक. एक भारतीय ज्येष्ठ नागरिक. अहमद नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात तत्कालीन दि गोदावरी सुगर मिल्स लि. साकरवाडी, माझे जन्मगाव. ०३.०६.१९५१ माझी जन्मतारीख. एका मध्यम वगी॔य क़ुटुंबात जन्म झाला. बालपण प़़ाथिमक व माध्यमिक शिक्शण साकरवाडीला प़़ाथिमक विद्यामंदीर व सोमैय्या विद्यामंदीर येथे झाले. मोठे क़ुटुंब तसेच आथि॔क परिस्थिती बेताचीच असल्यामुळे‚ १९६६ मध्ये शालांत परिक्शा उत्तीण॔ केल्यावर जवळच बेलापूरला लघूलेखन व टंकलेखनाचा कोस॔ केला. माझा स्वभाव संयमी तसाच सहनशील.  

               १९६९ मध्ये पुण्यात येउन चिंचवड येथे टल्को व एल्प्रो मध्ये सेवा केली. १९७१ मध्ये जुन्नर तालुक्यात आवी॔ला तत्कालीन विदेश संचार सेवा/ विदेश संचार निगम लि. वत॔मान टाटा कम्युनिकेशन्स सेवेत रूजू झालो. २००४ मध्ये विदेश संचार निगम लि. पुणे येथून अधिकारी (मा.सॱ) या पदावरूऩ सेवानिवृत्त झालो.  सामजिक सेवेची आवड असल्यामुळे चितोडे वाणी समाज प्रगति प्रतिष्ठान,पुणे  या समाज संस्थेचा उपाध्यक्श तसेच काय॔कारीणी मध्ये काय॔कारी पदावर १२ वषे॔ समाजसेवा   केली.    निवृत्तीपश्चात पहिली २ वषे॔ भटकंती सेवाकाळ दरम्यान अपूण॔ राहीलेली क़ामे पूण॔ करण्यात गेली. वेळ जाता जाइना.  सुरवाती पासूनच लीखणाची आवड होती पण सेवेत असतांना पूर्ण  होउ शकली नाही.त्याची संधी आता प्राप्त झाली. या वेळेचा सदुपयोग करुन घेण्याचे ठरविले व  लीखणास सुरवात केली. प्रथम मी माझ्या सेवेतील स्वानुभवावर आधारित लघु लेख लिहिले व दैनिक वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यास पाठवले. त्याचे प्रकाशन झाले. मला वाचकांचे आवडल्याचे व अभिनंदनाचे  फोन आलेत.  मला लीखाणास हुरूप आला. मी  आजुबाजुच्या घडलेल्या, पाहिलेल्या,  दिसलेल्या घटनांवर विविधरुपी लेखन केले. कथा, कविता व लेख दिवाळी अंकासाठी पाठवले. ते पण प्रकाशित झालेत. माझा आत्मविश्वास वाढत गेला. माझ्या आजतागायत विविध विषयास धरुन २० कथा, लेखकविता आहेत. अनेक कथा, कविता व लेखस्पधे॔मध्ये सहभाग घेउन यशस्वी ठरलो. या यशाबरोबर अनेक मिञ पण मिळाले. सोबतच मैञी करणे, मैञी वाढविणे व जोपासणे या छुप्त छंदास चालना मिळाली.

           सव॔ स्वलिखीत कथा, कविता व लेख याचे पुस्तक छापण्यापेक्षा, स्वत:चे  एक संकेत स्थळ असावे.असे वाटले. यात माझ्या दोन्ही मुलांची रितेश व निलेश यांची, जे माहीती तंत्र ज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांची साथ लाभली. व संकेत स्थळ उदयास आले.  मला याकामी माझ्या सर्व कुटुंबियांकडून फार मोलाचे साहाय्य मिळाले.    मला  खात्री  आहे  कि , आपणा  सर्वांना  ही  वेबसाईट ( संकेत  स्थळ )  आवडेल  व   आपणा  पण  भर भरून प्रतिसाद  द्याल .  आपल्या  कोणत्याही  प्रकारच्या  प्रतिक्रियांचे  स्वागत  केले जाईल.  तर  मग  जरूर  पहा  वाचा  rajratna.co.in  चा  आनंद  घ्या .

                          मुख॔  लॊकांचे प्रकार सांगतांना संत एका ठिकाणी म्हणतात “आपुली आपण करी जो स्तुती, तो एक  मुख॔. ” तर मी स्व   ला जास्त महत्व न देता माझे स्वपूराण आटोपतो.

               नमस्कार जयहिंद जय महाराष्ट्र !!

 - रत्नाकर वाणी | ratnakar.wani@rajratna.co.in |  संपर्क

 

208148

पुरस्कार

250;250;6ff7e5b92a37ee57c4dcf3a652aa3f58466357c0250;250;3bfaf04030ce2c8699e127071e0c869482be3f47250;250;d34223785c725bc0b160cebe2a8027fd5be5e653250;250;a6b082138081e21856842ca1224be2199c1b16aa250;250;3438a7a1823135cd2aaf8da9968d4f33770d6555250;250;f8159f25db6048017a22ddb7e4a26b9ae34de137